IPL 2022 : प्लेऑफमधून चेन्नईचा पत्ता कट, या तीन स्टार खेळाडूंच्या कामगिरीचा फटका
IPL 2022 Marathi news : चेन्नईचा हा आठवा पराभव होता. या पराभवासह चेन्नईचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेय. चार वेळा आयपीएल चषकावर नाव कोरणाऱ्या चेन्नईचे साखळी फेरीतच आव्हान संपलेय.
IPL 2022 Marathi news : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सचे आव्हान संपुष्टात आलेय. गुरुवारी झालेल्या सामन्यात मुंबईने चेन्नईचा पराभव केला. चेन्नईचा हा आठवा पराभव होता. या पराभवासह चेन्नईचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेय. चार वेळा आयपीएल चषकावर नाव कोरणाऱ्या चेन्नईचे साखळी फेरीतच आव्हान संपलेय. चेन्नईला 12 सामन्यात फक्त चार विजय मिळवता आलेत. चेन्नईचा संघ 8 गुणांसह गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर आहे. चेन्नईच्या निराशाजनक कामगिरीची अनेक कारणे असू शकतात...त्यापैकीच महत्वाचं एक कारण... तीन स्टार खेळाडूंचं निराशाजनक प्रदर्शन होय...
रवींद्र जडेजा -
आयपीएल 15 व्या हंगामाआधी चेन्नई सुपर किंग्सने रवींद्र जाडेजाला कर्णधार केले होते. रवींद्र जाडेजाच्या नेतृत्वात पहिल्या आठ सामन्यात चेन्नईला सहा सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. रवींद्र जाडेजा कर्णधारपद सांभाळण्यात अपयशी ठरलाच... त्याला वैयक्तिक कामगिरीही चांगली करता आली नाही. फलंदाजी आणि गोलंदाजीत तो अपयशी ठरला. जाडेजाला 10 सामन्यात 19 च्या सरासरीने फक्त 116 धावाच करता आल्या. तसेच गोलंदाजीत फक्त पाच विकेट घेता आल्या... दुखापतीमुळे जाडेजा सध्या आयपीएलमधून बाहेर गेलाय.
ड्वेन ब्रावो -
चेन्नईचा आणखी एक अष्टपैलू अनुभवी खेळाडू ड्वेन ब्राव्हो यंदा लयीत दिसला नाही. फलंदाजी आणि गोलंदाजीत निराशाजनक कामगिरी केली आहे. दहा सामन्यात ब्राव्होला फक्त 23 धावा करता आल्या.. तर गोलंदाजीत 16 विकेट घेतल्या.
अंबाती रायुडू -
चेन्नई सुपर किंग्सचा अनुभवी फलंदाज अंबाती रायडूची यंदाची कामगिरी चढउतारांनी भरलेली राहिली. अंबाती रायडूला कामगिरीत सातत्य राखता आले नाही. रायडूला 12 सामन्यातील 10 डावात 27 च्या सरासरीने आणि 124 च्या स्ट्राईक रेटने फक्त 271 धावाच करता आल्यात.. अंबाती रायडूला फक्त एक अर्धशतक झळकावता आले.
या खेळाडूंचे दमदार प्रदर्शन -
आयपीएलच्या इतिहासात दुसऱ्यांदाच चेन्नई साखळी फेरीतून बाहेर पडली आहे. याआधी 2020 मध्ये चेन्नईचे आव्हान साखळी फेरीत संपले होते. यंदा चेन्नईच्या काही खेळाडूंसाठी चांगला हंगाम गेलाय. यामुळे मुकेश चौधरी, सिमरजीत सिंह, शिवम दुबे आणि ड्वेन कॉन्वे यांनी सर्वांनाच प्रभावित केलेय.