Yuvraj Singh : टेस्ट क्रिकटचं भविष्य धोक्यात, युवराज सिंहने सांगितलं कारण
Test Cricket : क्रिकेटचं सर्वात जुना प्रकार असणाऱ्या कसोटी क्रिकेटच्या सामन्यांचं प्रमाण आधीच्या तुलनेत बरच कमी झालं आहे. अलीकडे टी20 क्रिकेट मोठ्या प्रमाणात खेळवले जात असतात.

Yuvraj Singh On Test Cricket : टेस्ट क्रिकेटचं भविष्य धोक्यात आहे, ही चर्चा मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात होत आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे क्रिकेट प्रेमींमध्ये मागील काही काळात टी20 क्रिकेटची वाढलेली लोकप्रियता हेच आहे. संपूर्ण जगभरात नवनवीन टी20 लीगचा जन्म होत असून आयपीएलची लोकप्रियता तर जगभरात आहे. दरम्यान टी20 क्रिकेट वाढले असले तरी कसोटी क्रिकेटला यामुळे काही धोका नाही असं अनेक क्रिकेटर्सचं म्हणणं आहे. पण भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंहने मात्र याबाबत मोठं विधान करत टी20 क्रिकेटमुळे टेस्ट क्रिकेट धोक्यात असल्याचं म्हटलं आहे. युवराजने यामागील कारण देखील दिलं आहे.
'टी20 क्रिकेटमध्ये अधिक पैसा'
युवराज सिंहचं म्हणण्यानुसार सध्याचे क्रिकेटप्रेमी टी20 क्रिकेटला अधिक पसंद करत आहेत. त्यामुळे टेस्ट क्रिकेटमधील रोमांच कमी होत आहे. आजकाल अनेकांना टी20 क्रिकेट खेळणं आणि पाहणं अधिक आवडतं. त्यात टी20 क्रिकेट सामन्यांमध्ये पैसाही मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने अधिक क्रिकेटर्स या क्रिकेट फॉर्मेटमध्ये अधिक रस घेत आहेत. टेस्ट आणि टी20 ची तुलना करताना का कोणता खेळाडू 5 लाखांसाठी 5 दिवस खेळणं पसंद करेल असंही युवारज म्हणाला, या तुलनेक टी20 मध्ये कोट्यवधी रुपये खेळाडूंना मिळत आहेत.
युवराज सिंहने पुढे बोलताना सांगितलं की, सद्यस्थितीला सर्व दिग्गज खेळाडू जे भलेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळत नाहीत, पण टी20 क्रिकेट खेळून कोट्यवधी कमवत आहेत. टेस्ट क्रिकेट खेळणाऱ्या अनेक देशांची स्वत:ची टी20 लीग देखील आहे. युवराजच्या मते ज्या वेगाने टी20 क्रिकेट वाढत आहे, त्यामुळे टेस्ट क्रिकेटच नाही तर एकदिवसीय क्रिकेटही धोक्यात आहे.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
