एक्स्प्लोर

T20 World Cup : विराट-सूर्या नव्हे, हे दोन खेळाडू जिंकवतील वर्ल्डकप, रवी शास्त्रींचा विश्वास

T20 World Cup 2024 :  आगामी टी20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची जोरदार तयारी सुरु आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील 15 जणांच्या चमूची घोषणा झाली, त्यानंतर नुकतीच वर्ल्डकप जर्सीही लाँच करण्यात आली.

T20 World Cup 2024 :  आगामी टी20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची जोरदार तयारी सुरु आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील 15 जणांच्या चमूची घोषणा झाली, त्यानंतर नुकतीच वर्ल्डकप जर्सीही लाँच करण्यात आली. विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह सारख्या अनुभवी खेळाडूंचा विश्वचषकाच्या संघात भरणा आहे. त्यांच्या जोडीला स्टार सूर्यकुमार यादवही आहे. प्रतिस्पर्धी संघाचा फोकस याच खेळाडूकडे जास्त असेल. पण रवि शास्त्री यांच्या मते विराट,रोहित, बुमराह अथवा सूर्या नाही तर शिवम दुबे आणि यशस्वी जायस्वाल यांच्यावर भारतीय संघाची मदार आहे. हेच दोघे भारताला विश्वचषक जिंकून देतील. 

भारताचे माजी क्रिकेटपटू रवि शास्त्री यांनी विश्वचषकाबाबत मोठं भाष्य केलेय. ते  म्हणाले की," टी20 विश्वचषक स्पर्धेत शिवम दुबेच्या उत्तुंग षटकार मारण्याच्या क्षमतेमुळे भारताला मोठी धावसंख्या उभारण्यास मदत होईल. त्याच्यासह यशस्वी जायस्वाल याच्यावरही टीम इंडियाची मदार असेल.  दोन्ही डाखुरे फलंदाज पहिल्यांदाच टी20 विश्वचषकात खेळत आहेत. यशस्वी जायस्वाल यानं इंग्लंडविरोधात शानदार कामगिरी केली. तो नीडरपणे खेळतो. " यशस्वी जायस्वाल आणि शिवम दुबे यांना पहिल्यांदाच विश्वचषकाच्या संघात स्थान मिळाले आहे. दोन्ही डावखुरे फलंदाज आहेत. यशस्वी जायस्वाल सुरुवात दणक्यात करु शकतो. तर मधल्या षटकात दुबे फटकेबाजी करण्यात तरबेज आहे. 

मधल्या फळीत शिवम दुबे मोठे फटके मारु शकतो. तो आक्रमक फलंदाज असून मच विनर आहे. तो फक्त मजेसाठी षटकार ठोकते. फिरकीविरोधात तो अधिक आक्रमक फलंदाजी करतो. वेगवान गोलंदाजांचाही समाचार घेतो. पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावरील त्याची भूमिका महत्वाची ठरणार आहे, असे रवि शास्त्री म्हणाले.

दोन जून पासून टी20 विश्वचषकाच्या थराराला सुरुवात होणार आहे. भारताला या स्पर्धेच्या विजयाचा प्रबळ दावेदार म्हटले जातेय. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताचा अनुभवी संघ उतरवण्यात आला आहे. त्याला अनुभवी खेळाडूंचा तडखा लावण्यात आला आहे. भारताचा पहिला सामना पाच जून रोजी आयर्लंडविरोधात होणार आहे. तर 9 जून रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आमनासामान होणार आहे. आयपीएलनंतर भारतीय खेळाडू विश्वचषकात उतऱणार आहेत. विश्वचषकात शिवम दुबे आणि यशस्वी जायस्वाल शानदार कामगिरी करतील, असे प्रसिद्ध समालोचक रवि शास्त्री यांनी सांगितलं. हे दोन्ही खेळाडू विश्वचषकात टीम इंडियाचे हुकमाचे एक्के असतील, असेच त्यांनी म्हटलेय.

आणखी वाचा :

T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचं सावट, पाकिस्तानातून मिळाली धमकी 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर
मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली
हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

CM Eknath Shinde यांच्या मुख्यमंत्रीपदाला कुणाचा विरोध होता? मुद्दा पुन्हा का चर्चेत आला?ABP Majha Headlines : 10 PM : 19 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPandharpur Vitthal Mandir : विठ्ठल मंदिराचे काम पूर्ण, मूर्ती काचेच्या पेटीबाहेरLok Sabha Elections 5th Phase Special Report : मुंबईतल्या 6 जागांवर कोण वरचढ ठरणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर
मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली
हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली
अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं
अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं
मुंबईकरांनो घराबाहेर पडा, मतदान करा; उद्योगपती रतन टाटाचं आवाहन, नेटीझन्सचाही भरभरुन रिप्लाय
मुंबईकरांनो घराबाहेर पडा, मतदान करा; उद्योगपती रतन टाटाचं आवाहन, नेटीझन्सचाही भरभरुन रिप्लाय
पावसाने राजस्थानचे टेन्शन वाढवले, अखेरच्या सामन्यात काय होणार?
पावसाने राजस्थानचे टेन्शन वाढवले, अखेरच्या सामन्यात काय होणार?
अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक, हेनरिक क्लासेनची फटकेबाजी, हैदराबादचा पंजाबवर 4 विकेट्सने विजय
अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक, हेनरिक क्लासेनची फटकेबाजी, हैदराबादचा पंजाबवर 4 विकेट्सने विजय
Embed widget