एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

IPL 2022, SRH vs RR: राजस्थानचा हल्लाबोल! संजूची विस्फोटक फंलदाजी, चहलचा भेदक मारा, हैदराबादचा 61 धावांनी पराभव

IPL 2022, SRH vs RR : संजू सॅमसनची विस्फोटक फलंदाजी आणि यजुवेंद्र चहलच्या भेदक माऱ्याच्या जोरावर राजस्थान संघाने हैदराबादचा 61 धावांनी पराभव केला.

IPL 2022, SRH vs RR : संजू सॅमसनची विस्फोटक फलंदाजी आणि यजुवेंद्र चहलच्या भेदक माऱ्याच्या जोरावर राजस्थान संघाने हैदराबादचा 61 धावांनी पराभव केला. या विजयासह राजस्थान संघाने आयपीएलच्या 15 व्या हंगामाची विजयी सुरुवात केली आहे. राजस्थान संघाने दिलेले 2011 धावांचे आव्हान हैदराबादच्या फलंदाजांना पेलवलं नाही. हैदराबादने निर्धारित 20 षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात 149 धावांपर्यंत मजल मारली.

राजस्थान संघाने दिलेल्या 211 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात निराशाजनक झाली. केन विल्यमसन दुसऱ्याच षटकात माघारी परतला. विल्यमसनला आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. विल्यमसन फक्त दोन धावा काढून बाद झाला. त्यानंतर अभिषक शर्मा (9), राहुल त्रिपाटी (00), निकोलस पुरन (00) आणि अब्दुल समद (4) झटपट माघारी परतले. त्यामुळे हैदराबादची अवस्था दैयनीय झाली होती. हैदराबाद संघाला पहिल्या दहा षटकांत फक्त 37 धावा करता आल्या. यामध्ये अर्धा संघ तंबूत परतला होता. राजस्थानच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला. राजस्थानच्या गोलंदाजापुढे हैदाराबादची फलंदाजी कमकुवत वाटत होती. हैदराबाद संघ 100 धावांपर्यंत तरी मजल मारणार का? असा सवाल उपस्थित झाला होता. पण मार्करन, वॉशिंगटन सुंदर आणि शेफर्ड यांच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर हैदराबाद संघ सन्मानजनक धावसंख्यापर्यंत पोहचला. मार्करनने 41 चेंडूत 57 धावांची खेळी केली. तर वॉशिंगटन सुंदरने 14 चेंडूत 40 धावांचा पाऊस पाडला. शेफर्डने 18 चेंडूत 24 धावांची खेळी केली. राजस्थानच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासून भेदक मारा केला. प्रसिद्ध कृष्ण आणि बोल्ट यांच्या माऱ्यापुढे हैदराबादची फलंदाजी ढेपाळली. उरलीसुरली कसर युजवेंद्र चहलने पूर्ण केली. चहलने मध्यक्रम मोडून काढला. चहलने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तर प्रसिद्ध कृष्णा आणि बोल्टला प्रत्येकी दोन दोन बळी मिळाले.

दरम्यान, हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विल्यमसनाचा हा निर्णय राज्यस्थानच्या फलंदाजांनी चुकीचा ठरवला. कर्णधार संजू सॅमसन, देवदत्त पड्डिकल आणि शिमरोन हेटमायर यांच्या विस्फोटक फंलदाजीच्या जोरावर राजस्थान संघाने निर्धारित 20 षटकांत सहा गड्यांच्या मोबदल्यात 210 धावा केल्या.  हैदराबादकडून उमरान मलिक आणि नटराजन यांना दोन विकेट मिळाल्या. तर शेफर्ड आणि भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.

प्रथम फलंदाजी करताना यशस्वी जयस्वाल आणि बटलरने धावांचा पाऊस पाडला. दोघांनी 41 चेंडूत 58 धावांची सलामी दिली. जॉस बटलरने 28 चेंडूत 25 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान बटलरने तीन चौकार आणि तीन षटकार लगावले. जयस्वाल याने 16 चेंडूत 20 धावांची खेळी केली. संजू सॅमसन याने कर्णधारपदाला साजेशी फलंदाजी केली. संजू सॅमसन याने विस्फोटक फलंदाजी करत संघाची धावसंख्या वाढवली. संजूने 27 चेंडूत 55 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान संजूने पाच गगनचुंबी षटकार लगावले तर तीन चौका लगावले. जोस बटलर आणि यशस्वी जयस्वाल यांच्या दमदार सुरुवातीनंतर कर्णधार संजू सॅमसन आणि देवदत्त पड्डिकल यांनी महत्वाची भागिदारी केली. दोघांनी विस्फोटक अंदाजात फलंदाजी केली. पड्डीकलने 29 चेंडूत 41 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान पड्डिकलने दोन षटकार आणि चार चौकार लगावले. संजू आणि पड्डिकल यांनी 41 चेंडूत 73 धावांची भागिदारी केली. कर्णधार संजू सॅमसन बाद झाल्यानंतर सर्व सुत्रे शेमरॉन हेटमायर याने आपल्याकडे घेतली. हेटमायरने अखेरच्या षटकात धावांचा पाऊस पाडला. हेटमायरने अवघ्या 13 चेंडूत 33 धावांचा पाऊस पाडला. या खेळीदरम्यान हेटमायरने 3 षटकार आणि दोन चौकार लगावले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Bhor on Eknath Shinde : एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करा, शिवसेनेच्या पठ्ठ्याने कारण सांगितलंRashmi Shukla Maharashtra Police | रश्मी शुक्ला यांची पुन्हा राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्तीRashmi Shukla Maharashtra Police | रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्तीRajkiya Shole | 57 जागा जिंकणाऱ्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद मिळणार का? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Embed widget