KKR vs RR: राजस्थानविरुद्ध आंद्रे रसल खास विक्रम रचण्याची शक्यता
KKR vs RR: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 47 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स आमने सामने येणार आहेत. मुंबईच्या वानखेडे मैदानावर हा सामना खेळला जाणार आहे.
KKR vs RR: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 47 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स (Kolkata Knight Riders Vs Rajasthan Royals) आमने सामने येणार आहेत. मुंबईच्या (Mumbai) वानखेडे मैदानावर (Wankhede Stadium) हा सामना खेळला जाणार आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत कोलकाताच्या संघ आठव्या क्रमांकावर आहे. तर, राजस्थानचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. प्लेऑफच आव्हान टिकवण्यासाठी कोलकाताच्या संघाला राजस्थानविरुद्ध चांगली कामगिरी करून दाखवावी लागणार आहे. तर, पुढील दोन सामने जिंकून प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करण्याचं राजस्थानच्या संघाचा प्रयत्न असेल. राजस्थानविरुद्ध सामन्यात कोलकात्याचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसल नव्या विक्रमाला गवसणी घालण्याची शक्यता आहे. आयपीएलमधील 2000 धावांचा टप्पा गाठण्यापासून आंद्रे रसल फक्त 73 धावा दूर आहे.
आयपीएलमध्ये आंद्रे रसलनं आतापर्यंत 93 धावा केल्या आहेत. ज्यात त्यानं 1 हजार 27 धावा केल्या आहेत. आयपीएलच्या कारकिर्दीतील 2000 धावांचा टप्पा गाठण्यासाठी त्याला 73 धावांची गरज आहे. या स्पर्धेत आंद्रे रसलनं 10 अर्धशतक केले आहेत. राजस्थानविरुद्ध सामन्यात आंद्रे रसलनं 73 धावा केल्यास तो मायकल हसीचा विक्रम मोडेल. एवढेच नव्हेतर, त्याच्याकडं कोलकाताचा फलंदाज नितीश राणाचंही रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे. आयपीएलमध्ये नितीश राणानं 2 हजार 20 धावा केल्या आहेत.
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम कोणाच्या नावावर?
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या नावावर आहे. त्यानं आतापर्यंत 217 सामने खेळले असून त्यात 6 हजार 469 धावा केल्या आहेत. ज्यात पाच शतक आणि 43 अर्धशतकांचा समावेश आहे. या यादीत पंजाब किंग्जचा सलामीवीर शिखर धवन दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं आयपीएलमधील 201 सामन्यात 6 हजार 01 धावा केल्या आहेत. ज्यात दोन शतक आणि 43 अर्धशतकांचा समावेश आहे. त्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचा क्रमांक लागतो. त्यानं 222 सामन्यात 5 हजार 766 धावा केल्या आहेत.
हे देखील वाचा-
- IPL 2022 : हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मुकेश चौधरीने फेकला वाईड बॉल, मैदानावर अवतरला कर्णधार धोनीचा रौद्रअवतार
- KKR vs RR, Pitch Report : आज कोलकाता, राजस्थान आमने-सामने; कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष, कशी असेल मैदानाची स्थिती?
- IPL 2022 : भविष्यात चेन्नई सुपर किंग्ससोबतच दिसणार MS Dhoni? दिले महत्त्वाचे संकेत