IPL Final :केकेआरच्या यशाचं श्रेय गंभीरला मिळतंय, तुला नाही... श्रेयस अय्यरच्या उत्तरानं मनं जिंकली
IPL Final : आयपीएलच्या फायनलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद आमने सामने येणार आहेत. केकेआरला तिसऱ्या विजेतेपदाची संधी आहे.
चेन्नई :आयपीएलच्या फायनल (IPL 2024 Final) मॅचमध्ये कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि सनरायजर्स हैदराबाद (Sun Risers Hyderabad) विजेतेपदापासून एक पाऊल दूर आहेत. श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वातील संघ गेल्या चार वर्षांमध्ये दोनदा अंतिम फेरीपर्यंत पोहोचला आहे. केकेआरच्या यशाबद्दल गौतम गंभीरला प्रसिद्धी मिळतेय, यासंदर्भात श्रेयस अय्यरची देखील काही तक्रार नाही. श्रेयस अय्यर 2020 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्त्व करत होता. त्यावेळी दिल्ली कॅपिटल्सनं अंतिम फेरीत धडक दिली होती. आता कोलकाता नाईट रायडर्सनं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. श्रेयसला त्याच्या कॅप्टन म्हणून करत असलेल्या कामगिरीला योग्य महत्त्व मिळतंय का असं विचारण्यात आलं.
श्रेयस अय्यरनं यासंदर्भात उत्तर देताना म्हटलं की या गोष्टींना माध्यमांनी अधिक महत्त्व दिलं आहे. "गौतम गंभीर बाबत मला वाटतं की त्यांना खेळ कसा खेळला जातो यासंदर्भात अधिक ज्ञान आहे. गंभीरनं केकेआरसोबत खेळताना दोनदा विजय मिळवला आहे. आम्हाला प्रतिस्पर्धी संघांसोबत कसं खेळायचं आहे, याबाबत त्यांची रणनीती योग्य आहे, असं श्रेयस अय्यरनं म्हटलं. गौतम गंभीरच्या योगदानामुळं आयपीएल फायनलमध्ये केकेआर चांगली कामगिरी करेल, असा विश्वास श्रेयस अय्यरनं व्यक्त केला. श्रेयस अय्यरनं आम्ही गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनात चागंला फॉर्म कायम ठेवू, अशी आशा व्यक्त केली.
श्रेयस अय्यरसाठी गेले काही महिने चढ उतार असणारे होते. कसोटी मॅच न खेळल्याच्या कारणावरुन श्रेयस अय्यरला केंद्रीय कराराच्या यादीतून वगळण्यात आलं. श्रेयस अय्यरनं यानंतर मुंबईकडून रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये विदर्भाविरोधात 95 धावा केल्या. श्रेयस अय्यरनं पाठदुखीमुळं होत असलेल्या त्रासावर लोकांनी विश्वास ठेवला नव्हता, असं म्हणत खंत देखील व्यक्त केली.
श्रेयस अय्यरनं वनडे वर्ल्डकपमध्ये टीम इंडियासाठी चांगली कामगिरी केली होती. कसोटी, वनडे आणि टी-20 वर्ल्डकपमध्ये 124 मॅचेसमध्ये श्रेयस अय्यरनं भारताकडून चार हजारांहून अधिक धावा केल्या आहेत.
केकेआरला तिसऱ्या विजेतेपदाची संधी
कोलकाता नाईट रायडर्सनं 2012 आणि 2014 च्या आयपीएलमध्ये विजेतेपद पटकावलं होतं. आता केकेआरला तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवण्याची संधी आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वातील केकेआर तिसऱ्यांदा विजेतपद मिळवणार काय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्स आयपीएलचं विजेतेपद मिळवण्यापासून एक पाऊल दूर आहे. आजच्या मॅचमध्ये सनरायजर्स हैदराबादला पराभूत करत केकेआर विजेतपदावर नाव कोरतं का ते येत्या काही तासांमध्ये स्पष्ट होईल.
संबंधित बातम्या :
IPL 2024 Final KKR vs SRH: आज ‘आयपीएल’चा अंतिम सामना; कोलकाता अन् हैदराबाद जेतेपदासाठी भिडणार