(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2022: जोस बटलर आक्रमक, मोडला 14 वर्षाचा विक्रम!
IPL 2022: आयपीएल 2022 च्या 44 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स (Rajasthan Royals Vs Mumbai Indians) आमने सामने आले होते.
IPL 2022: आयपीएल 2022 च्या 44 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स (Rajasthan Royals Vs Mumbai Indians) आमने सामने आले होते. या सामन्यात मुंबईच्या संघानं राजस्थानला पाच विकेट्सनं पराभूत केलं. या सामन्यात पुन्हा एकदा राजस्थानचा सलामीवीर जोस बटलर (Jos buttler) मुंबईच्या संघावर भारी पडल्याचं पाहायला मिळालं. त्यानं मुंबई विरुद्ध 54 चेंडूत 67 धावांची खेळी केली. ज्यात चार षटकार आणि पाच चौकारांचा समावेश होता. या कामगिरीसह जोस बटलरनं आणखी एका व्रिकमाला गवसणी घातली आहे. दरम्यान, राजस्थानकडून एका हंगामात सर्वाधिक धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. जोस बटलरनं या हंगामात जितक्या धावा केल्या आहेत, तितक्या धावा राजस्थानसाठी आतापर्यंत कोणत्याही खेळाडूला करता आल्या नाहीत.
आयपीएल 2022 मध्ये जोस बटलरची कामगिरी
आयपीएल 2022 मध्ये जोस बटलरनं आतापर्यंत 9 डावात 566 धावा केल्या आहेत. या हंगामात त्याची सरासरी 70.75 इतकी आहे. तर स्ट्राइकरेट 155.07 इतका आहे. या हंगामात त्यानं 47 चौकार आणि 36 षटकार मारले आहेत. राजस्थान संघासाठी गेल्या 14 वर्षात एकाही फलंदाजाने इतक्या धावा करता आल्या नाहीत. याआधी राजस्थानसाठी एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम बटलरच्याच नावावर होता.
संजू सॅमसननं मागच्या हंगामात दाखवली होती जादू
जोस बटलरनं आयपीएलच्या अकराव्या सामन्यात 13 डावात 548 धावा केल्या. आयपीएलच्या मागच्या हंगामात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसननं संघासाठी 484 धावा केल्या होत्या. याशिवाय, राजस्थानच्या कोणत्याच फलंदाजाला 500 धावांचा आकडा गाठता आला नाही.
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात
आयपीएल 2022 ऑरेंज कॅपच्या यादीत बटलरचे वर्चस्व कायम आहे. राजस्थान आणि मुंबईच्या सामन्यानंतर बटलर भक्कमपणे अव्वल स्थानावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल आहे. त्याच्या खात्यात 374 धावा आहेत.
हे देखील वाचा-
- IPL 2022: आयपीएलमध्ये सर्वात मोठ्या भागीदाराचा विक्रम कोणत्या जोडीच्या नावावर? ऋतुराज- कॉन्वेचा यादीत समावेश
- IPL 2022 : उम्रान मलिकच्या वेगवान चेंडूचा सामना कसा कराल?, दिग्गज फलंदाज सुनील गावस्करांनी सांगितली 'टीप'
- IPL 2022 : हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मुकेश चौधरीने फेकला वाईड बॉल, मैदानावर अवतरला कर्णधार धोनीचा रौद्रअवतार