(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2022 : उम्रान मलिकच्या वेगवान चेंडूचा सामना कसा कराल?, दिग्गज फलंदाज सुनील गावस्करांनी सांगितली 'टीप'
Sunil Gavaskar Advises : सनरायजर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज उम्रान मलिक याने त्याच्या दमदार आणि भेदक गोलंदाजीने सर्वांनाच चकीत केलं असून त्याचे चेंडू खेळणं फलंदाजांना अवघड होत आहे.
Sunil Gavaskar On Umaran Malik: सध्या आयपीएलमध्ये दिग्गज खेळाडूंच्या तुलनेत युवा खेळाडूच कमाल करत आहेत. यातीलच एक नाव म्हणजे सनरायजर्स हैदराबादचा (SRH) वेगवान गोलंदाज उम्रान मलिक (Umran Malik). उम्रानने आयपीएल 2021 (IPL 2021) वर्षीच्या हंगामात नेट बॉलर म्हणून सुरुवात केली, त्यानंतर तो टी.नटराजन कोरोनाबाधित झाल्यानंतर संघात सामिल झाला. ज्यानंतर त्याने त्याच्या वेगाने सर्वांनाच चकीत केलं. यंदाही तो तुफानी गोलंदाजी करत असून त्याचे बॉल खेळणं फलंदाजांना अवघड पडत आहे. अशामध्ये भारताचे दिग्गज माजी फलंदाज सुनील गावस्कर (Sunil Gavskar) यांनी उम्रानचे बॉल कसे खेळता येतील याबाबत खास सल्ला दिली आहे.
उम्रान मलिकला कसं खेळाल हे सांगताना सुनील गावस्कर म्हणाले, ''बॉल खेळायला फार वेगवान असल्याने सिंगल घेण्याचा प्रयत्न करुन नॉन-स्ट्राईकवर जा, तसंच तिन्ही विकेट कव्हर करुन खेळण्याचा प्रयत्न करायचा सल्ला त्यांनी दिला. दरम्यान हे सगळं सांगताना सुनील यांनमी उम्रानचं तोंडभरुन कौतुक देखील केलं.
उम्रानने तोडला लॉकी फॉर्ग्युसनचा विक्रम
आयपीएल 2022 मध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम गुजरात टायटन्सचा गोलंदाज लॉकी फॉर्ग्युसनच्या नावावर होता. त्यानं चेन्नईविरुद्ध सामन्यात 153.9 किमी प्रतितासानं चेंडू टाकला होता. परंतु, आज उमरान मलिकनं 154 किमी प्रतितास वेगानं चेंडू टाकत लॉकी फॉर्ग्युसनला मागे टाकलं. त्यानं या हंगामात अनेकदा 150 किमी प्रतितास वेगानं गोलंदाजी केली आहे.
पर्पल कॅपच्या शर्यतीत उमरान मलिक तिसऱ्या क्रमांकावर
आयपीएलचा पंधरावा हंगाम उमरान मलिकसाठी चांगला ठरला आहे. या हंगामात त्यानं 15 विकेट्स घेतल्या. दरम्यान, एका सामन्यात त्यानं पाच विकेट्स घेतल्या आहे. पर्पल कॅपच्या शर्यतीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.
- SRH Vs CSK: उमरान मलिकला का म्हणतात वेगाचा बादशाह? चेन्नईविरुद्ध सामन्यात त्यानं दाखवून दिलं, मोडला विक्रम !
- KL Rahul: केएल राहुल नावाचं वादळ थांबेना! दिल्लीविरुद्ध चमकदार कामगिरी; रोहित- विराटलाही टाकलं मागं
- IPL 2022 : हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मुकेश चौधरीने फेकला वाईड बॉल, मैदानावर अवतरला कर्णधार धोनीचा रौद्रअवतार