(Source: ECI/ABP News/ABP Majha)
RR vs DC Match Prediction : राजस्थान रॉयल्स की दिल्ली कॅपिटल्स, कोण विजय मिळवणार? रिषभ अन् संजू सॅमसन आमने सामने
RR vs DC : राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज आयपीएलमधील नववी मॅच होणार आहे. यामॅचमध्ये कोण बाजी मारणार हे पाहावं लागेल.
जयपूर :आयपीएलमध्ये (IPL 2024) आज राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आमने सामने येणार आहेत. राजस्थान रॉयल्सनं पहिल्या मॅचमध्ये लखनऊ सुपर जाएंटसला पराभूत केलं होतं. तर, दिल्ली कॅपिटल्सला पंजाब किंग्ज यांच्या विरोधात पराभव स्वीकारावा लागला होता. राजस्थान रॉयल्स सध्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. आजच्या मॅचमध्ये विजय मिळवत राजस्थान रॉयल्स पहिल्या स्थानावर पोहोचण्याचा प्रयत्न करेल. तर, दिल्ली कॅपिटल्सचा संघ रिषभ पंतच्या नेतृत्त्वात पहिला विजय मिळवण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल.
राजस्थान रॉयल्सचा आज होम ग्राऊंडवर दुसरा सामना होणार आहे. राजस्थान रॉयल्सच्या टीमचं नेतृत्त्व संजू सॅमसन करत आहे. रिषभ पंतनं कमबॅक केल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सला पहिल्या मॅचमध्ये पंजाब किंग्जनं पराभूत केलं होतं. मात्र, तो पराभव विसरुन दिल्लीचा संघ पहिल्या विजयाच्या इराद्यानं मैदानात उतरेल.
राजस्थान रॉयल्सच्या सलामीवीरांनी पहिल्या मॅचमध्ये समाधानकारक कामगिरी केली नव्हती. जोस बटलर आणि यशस्वी जयस्वाल हे आज कशी कामगिरी करतात हे पाहावं लागेल. राजस्थान रॉयल्सनं पहिल्या मॅचमध्ये इम्पॅक्ट प्लेअर रुलचा चांगल्या प्रकारे वापर करुन घेतला होता. राजस्थान रॉयल्सची गेल्या आयपीएलमधील कामगिरी चांगली राहिली नव्हती मात्र यंदा पहिल्या मॅचमध्येच त्यांनी विजयानं सुरुवात केली आहे. आज आता जयपूरमध्ये ते दुसरा विजय मिळवतात का हे पाहावं लागेल.
दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सला पंजाब विरुद्ध पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन रिषभ पंत फिट असला तरी त्याला पहिल्या मॅचमध्ये चांगली फलंदाजी करता आली नव्हती. डेव्हिड वॉर्नर आणि मिशेल मार्श यांच्या जोडीनं आक्रमक फलंदाजी करुन दिल्लीला चांगली सुरुवात करुन दिल्यास आणि रिषभ पंत जुन्या फॉर्ममध्ये परतल्यास दिल्ली चांगलं आव्हान उभं करु शकतं.
राजस्थान रॉयल्सच्या टीममधील भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. राजस्थानच्या ओपनर्सनी आक्रमकपणे फलंदाजी केल्यास त्यांना फायदा होऊ शकतो. गुगलच्या प्रेडिक्शन नुसार राजस्थान रॉयल्स विजयी होऊ शकते.
राजस्थान रॉयल्सची संभाव्य टीम :
यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (विकेट कीपर/ कर्णधार) रियान पराग, शिमरोन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन आश्विन, संदीप शर्मा, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, यजुवेंद्र चहल, नांद्रे बर्गर
दिल्ली कॅपिटल्स ची संभाव्य टीम
डेव्हिड वॉर्नर, मिशेल मार्श, शाई होप, रिषभ पंत,(विकेट कीपर/ कर्णधार) रिकी भूई, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, अभिषेक पोरेल, कुलदीप यादव,खलिल अहमद, इशांत शर्मा
संबंधित बातम्या :
IPL 2024: पहिल्याच मॅचमध्ये 66 धावा दिल्या, मुंबईचा बॉलर ट्रोल, बॅटिंग कोचकडून पाठराखण, म्हणाले...