PBKS vs RCB Qualifier 1 IPL 2025 : आरसीबीची पंजाब मोहीम फत्ते, 9 वर्षांनी फायनलमध्ये! विराट कोहली याचं स्वप्न एका पावलावर, श्रेयस अय्यरच्या शिलेदारांचा 'फ्लॉप शो'
9 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर RCB पुन्हा एकदा आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश करण्यात यशस्वी ठरली आहे.

Punjab Kings vs Royal Challengers Bangalore : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) आयपीएल 2025 मध्ये एक शानदार कामगिरी करत क्वालिफायर-1 मध्ये पंजाब किंग्जचा 8 विकेट्सने पराभव केला आणि थेट अंतिम फेरीत धडक मारली. आयपीएल 2025 च्या अंतिम फेरीत प्रवेश करणारा आरसीबी पहिला संघ बनला आहे. 9 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर RCB पुन्हा एकदा आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश करण्यात यशस्वी ठरली आहे. आरसीबी कर्णधार रजत पाटीदारने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर श्रेयस अय्यरच्या शिलेदारांचा फ्लॉप शो पाहायला मिळाला आणि संपूर्ण संघ फक्त 101 धावांवर बाद झाला. आरसीबीने 10 षटकांत हे लक्ष्य सहज गाठले.
𝙏𝙝𝙖𝙩'𝙨 𝙝𝙤𝙬 𝙮𝙤𝙪 𝙨𝙚𝙖𝙡 𝙖 𝙥𝙡𝙖𝙘𝙚 𝙞𝙣 𝙩𝙝𝙚 𝙛𝙞𝙣𝙖𝙡𝙨 ❤
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2025
🎥 Captain Rajat Patidar fittingly finishes off in style as #RCB are just one step away from the 🏆
Updates ▶ https://t.co/FhocIrg42l#PBKSvRCB | #Qualifier1 | #TheLastMile | @RCBTweets pic.twitter.com/hXhslIqcDZ
चौथ्यांदा अंतिम फेरीत...
आरसीबी संघाने चौथ्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यापूर्वी संघाने 2009, 2011 आणि 2016 चे आयपीएल फायनल खेळले होते, परंतु तिन्हीमध्ये संघाचा पराभव झाला. आता आरसीबी संघ 9 वर्षांनी पुन्हा अंतिम फेरीत पोहोचला आहे आणि यामुळे हा संघ विजेतेपद जिंकू शकेल अशी सर्वांच्या आशा उंचावल्या आहेत. चालू हंगामात, रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली संघाने पॉइंट्स टेबलमध्ये दुसरे स्थान मिळवून प्लेऑफमध्ये स्थान मिळवले.
Say Hello to the first 𝐅𝐈𝐍𝐀𝐋𝐈𝐒𝐓𝐒 of #TATAIPL 2025 ❤#RCB fans, how elated are you? 🤩
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2025
Updates ▶ https://t.co/FhocIrg42l#PBKSvRCB | #Qualifier1 | #TheLastMile | @RCBTweets pic.twitter.com/gmnjZsFWxF
फिल सॉल्टने ठोकले अर्धशतक...
छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीच्या फलंदाजांनी कोणतीही घाई दाखवली नाही. विराट कोहली 12 धावा तर मयंक अग्रवाल 19 धावा करून बाद झाला. पण फिल सॉल्टने अर्धशतक झळकावून संघाला विजय मिळवून दिला. पंजाबचे सर्व गोलंदाज मोठे अपयशी ठरले. सॉल्टने सामन्यात 56 धावांची खेळी खेळली. कर्णधार पाटीदारने षटकार मारून संघाला अंतिम फेरीत पोहोचवले आहे. त्याने एकूण 15 धावा केल्या आहेत.
श्रेयस अय्यरच्या शिलेदारांचा 'फ्लॉप शो'
आयपीएलच्या 18 व्या हंगामाच्या लीग टप्प्यात पंजाब किंग्जने चांगली कामगिरी केली आणि अव्वल स्थानावर राहून प्लेऑफमध्ये प्रवेश केला. पण, क्वालिफायर -1 मध्ये पंजाबचा संघ अपेक्षेनुसार कामगिरी करू शकला नाही. नाणेफेक जिंकल्यानंतर रजत पाटीदारने प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय पूर्णपणे योग्य ठरला. पंजाबचा संघ 11 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर प्लेऑफमध्ये खेळला आणि त्याचे दडपण संघाच्या प्रत्येक फलंदाजावर दिसून आले. आरसीबीच्या गोलंदाजांनी याचा पुरेपूर फायदा घेतला. फॉर्ममध्ये असलेले फलंदाज प्रियांश आर्य (7), प्रभसिमरन सिंग (18) आणि कर्णधार श्रेयस अय्यर (2) चौथ्या षटकाच्या समाप्तीपूर्वीच पॅव्हेलियनमध्ये परतले होते. या धक्क्यानंतर पंजाब सावरू शकला नाही.
मार्कस स्टोइनिसने (26) मधल्या षटकांमध्ये काही चांगले शॉट्स खेळून डाव सांभाळण्याचा निश्चितच प्रयत्न केला, परंतु त्याला दुसऱ्या टोकाकडून साथ मिळाली नाही. जोश हेझलवूड आणि सुयश शर्मा यांनी कोणत्याही फलंदाजाला क्रीजवर जास्त वेळ टिकून दिले नाही. परिस्थिती अशी होती की पंजाबचे फक्त 3 फलंदाजच दुहेरी आकडा ओलांडू शकले. अशाप्रकारे श्रेयस अय्यर आणि कंपनीने केवळ 14.1 षटकात फक्त 101 धावा केल्या.





















