RCB vs KKR : विराट कोहलीने नाणेफेक जिंकली, कोलकात्याची प्रथम फलंदाजी, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
RCB vs KKR Playing XI: आरसीबीचा कर्णधार विराट कोहली याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
RCB vs KKR Playing XI: आरसीबीचा कर्णधार विराट कोहली याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. नीतीश राणा याच्या नेतृत्वातील कोलकाता संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. आरसीबीने सात सामन्यात चार विजय मिळवले आहेत. तर कोलकात्याला सात सामन्यात पाच पराभवाचा सामना केला आहे. आयपीएलचा अर्धा हंगाम संपला असून उर्वरीत अर्धा हंगाम आजपासून सुरु होतोय. प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी दोन्ही संघाला विजय गरजेचा आहे.
कोलकात्याने ईडन गार्डन्सवर आरसीबीचा दारुण पराभव केला होता. या पराभवाचा वचपा आरसीबी आज काढणार का? याकडे क्रीडा चाहत्यांचे लक्ष लागलेय. विराट कोहलीने विजयी संघ कायम ठेवला आहे. संघात कोणताही बदल केला नाही. तर कोलकात्याच्या संघात एक बदल करण्यात आला आहे. कुलवंत खजोरिया याला प्लेईंग ११ मधून बाहेर बसवले आहे. पाहूयात कोलकाता आणि आरसीबीची प्लेईंग ११....
कोलकाता नाइट रायडर्सची प्लेईंग इलेव्हन- एन जगदीसन (विकेटकीपर), जेसन रॉय, वेंकटेश अय्यर, नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंह, आंद्रे रसेल, सुनील नरेन, डेविड विसे, वैभव अरोरा, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती.
इम्पॅक्ट प्लेअर - सुयश शर्मा
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरची प्लेईंग इलेव्हन- विराट कोहली (कर्णधार), शाहबाज अहमद, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), सुयश प्रभुदेसाई, वानिंदु हसरंगा, डेविड विली, विजयकुमार वैशाक, हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराज.
इम्पॅक्ट प्लेयर्स - फाफ डु प्लेसिस
हेड टू हेड काय स्थिती ? -
कोलकाता आणि राजस्थान यांच्यात आतापर्यंत काटें की टक्कर पाहायला मिळाली आहे. पण यंदाच्या आयपीएलमध्ये केकेआरने आरसीबीचा दारुण पराभव केला होता. कोलकात्याच्या फिरकी गोलंदाजांपुढे आरसीबीची फलंदाजी ढेपाळली होती. हा सामना कोलकात्याने जिंकला होता. पण आता बेंगलोरच्या मैदानावर आरसीबी पराभवाचा वचपा काढण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
आयपीएलमध्ये कोलकाता आणि आरसीबी यांच्यात आतापर्यंत 31 सामने झाले आहेत. यामध्ये कोलकाता संगाचे पारडे थोडे जड दिसतेय. कोलकाता संघाने आतापर्यंत 17 सामन्यात बाजी मारली आहे. तर आरसीबीने संघाने 14 सामन्यात विजय मिळवला आहे. दोन्ही संघ विजयासाठी आज मैदानात उतरणार आहेत.
M. Chinnaswamy Stadium Pitch Report : चिन्नास्वामी स्टेडियम खेळपट्टीचा अहवाल
बंगळुरुमधील चिन्नास्वामी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी पोषक आहे. येथे गोलंदाजांना खास कामगिरी करता आलेली नाही. बंगळुरूमध्ये पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 170 धावांची आहे. या खेळपट्टीवर अधिक धावा करूनच फलंदाजांवर दबाव आणता येतो. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाचा फायदा होतो, असे आकडेवारीवरुन दिसतेय.