एक्स्प्लोर

रोहित शर्मानं मुंबई इंडियन्सकडून शेवटची मॅच खेळलीय, टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या वक्तव्यानं खळबळ

Rohit Sharma : रोहित शर्मा आयपीएलमध्ये गेल्या अकरा वर्षांपासून मुंबई इंडियन्सकडून खेळतोय. 2024 च्या आयपीएलमध्ये मुंबईचं नेतृत्त्व हार्दिकडे देण्यात आलं.

नवी दिल्ली :  मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) टीम मॅनेजमेंटनं 2024 च्या आयपीएलमध्ये रोहित शर्माऐवजी (Rohit Sharma) हार्दिक पांड्याकडे नेतृत्त्व सोपवण्याचा निर्णय घेतला होता. मुंबई इंडियन्सचा आयपीएल विजेतेपदाचा दुष्काळ हार्दिकच्या नेतृत्त्वात संपू शकेल, अशी अपेक्षा संघ व्यवस्थापनाला होती. मात्र, मुंबईसाठी 2024 चं आयपीएल निराशाजनक ठरलं. मुंबई इंडियन्सनं गुणतालिकेत दहाव्या स्थानावर राहिलं. तर, प्लेऑफच्या शर्यतीतून सर्वप्रथम बाहेर पडलं. रोहित शर्माबाबत टीम इंडियाचा माजी सलामीवीर आकाश चोप्रानं (Aakash Chopra) मोठं वक्तव्य केलं आहे. रोहित शर्मा पुढील आयपीएलम मुंबई इंडियन्सकडून खेळणार नाही, असं वाटत असल्याचं आकाश चोप्रानं म्हटलं. 

मुंबई इंडियन्सचं नेतृत्त्व बदललं गेल्यानं मुंबईच्या ड्रेसिंग रुममध्ये दोन गट पडल्याच्या अफवा देखील चर्चेत होत्या. रोहित शर्मा सध्या भारतीय संघाचं नेतृत्त्व करतोय. भारतीय संघ अमेरिकेत दाखल झाला आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्त्वात हार्दिक पांड्या उपकप्तान म्हणून सहभागी होईल.या पार्श्वभूमीवर आकाश चोप्रानं मोठं वक्तव्य केलं आहे. 

रोहित शर्मानं मुंबई इंडियन्सकडून अखेरची मॅच खेळली आहे. नुकत्याच संपलेल्या आयपीएलमध्ये त्यानं त्या मॅचमध्ये अर्धशतक केलं आहे. रोहित शर्मा पुढच्या काळात निळ्या आणि सोनेरी रंगाच्या जर्सीत दिसणार नाही, असा अंदाज आकाश चोप्रानं वर्तवला. 

आकाश चोप्रा म्हणाला की, "रोहित शर्मानं मुंबई इंडियन्ससाठी शेवटची मॅच खेळली. रोहितला रिटेन व्हावं असं वाटत नसेल किंवा मुंबई इंडियन्स त्याला जाऊ देईल."

आकाश चोप्रा पुढे म्हणाला की, मी चुकीचा देखील ठरु शकतो, पण रोहित शर्मा पुढील आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार नाही.  

आकाश चोप्रानं मुंबई इंडियन्सबाबत बोलताना म्हटलं की इशान किशनला देखील  ते जाऊ देतील.  

मुंबई इंडियन्सचं नेतृत्त्व रोहित शर्माकडे 2013 मध्ये आलं होतं. 2013 ते 2023 च्या आयपीएलच्या हंगामामध्ये रोहितनं मुंबईचं नेतृत्त्व केलं. या दहा वर्षांमध्ये रोहित शर्मानं मुंबईला पाचवेळा विजेतेपद मिळवून दिलं होतं. मात्र, 2020 च्या आयपीएल विजेतेपदानंतर मुंबईला पुढच्या तीन स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवण्यात अपयश आलं होतं.मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनानं तीन वर्षांचं अपयश दूर करण्यासाठी गुजरात टायटन्सला पहिल्याच स्पर्धेत विजय मिळवून देणाऱ्या हार्दिक पांड्याला संघात परत आणलं होतं. मात्र, मुंबई इंडियन्सची कामगिरी निराशाजनक राहिली. मुंबई इंडिनयन्सला गुणतालिकेत दहाव्या स्थानावर राहावं लागलं. 

दरम्यान, रोहित शर्मा सध्या अमेरिकेत टी -20 वर्ल्डकपच्या निमित्तानं दाखल झाला आहे. भारताची पहिली मॅच 5 जून रोजी आयरलँड विरुद्ध होणार आहे. 

संबंधित बातम्या : 

भारतासाठी पुन्हा एकदा.... विश्वचषकाआधी ऋषभ पंतचा एल्गार, BCCI नं पोस्ट केला व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget