एक्स्प्लोर

T20 World Cup 2024 : विराट कोहलीचं स्थान निश्चित, रोहित शर्माची मध्यस्थी, बीसीसीआयला दिलं अल्टीमेटम

T20 World Cup 2024 : आगामी टी 20 विश्वचषकामध्ये टीम इंडियात विराट कोहलीला स्थान नसेल, या बातमीनं क्रीडा जगतात खळबळ माजवली होती.

T20 World Cup 2024 : आगामी टी 20 विश्वचषकामध्ये टीम इंडियात विराट कोहलीला स्थान नसेल, या बातमीनं क्रीडा जगतात खळबळ माजवली होती. दिग्गज आजी-माजी क्रिकेटसरसह चाहत्यांनीही टीकेचा भडीमार केला होता. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी विराट कोहलीची विश्वचषकातील आकडेवारीच टाकली होती. पण आता रोहित शर्माने विराट कोहलीसाठी फिल्डिंग लावली आहे. विश्वचषकात विराट कोहली हवाच, अशी भूमिका रोहित शर्माने बीसीसीआयपुढे मांडली आहे. यूएईमधील संथ खेळपट्टीवर विराट कोहलीला फलंदाजी करण्यास अडचण येते, त्यामुळे नव्या खेळाडूंना संधी देण्याचा विचार बीसीसीआय करत असल्याचं प्रसारमाध्यमात समोर आले होते. आता रोहित शर्माच्या अल्टीमेटमनंतर बीसीसीआय विराट कोहलीबाबत काय निर्णय घेतेय? याकडे लक्ष लागलेय. 

भारताचे माजी खेळाडू किर्ती आझाद यांनी रोहित शर्माच्या अल्टीमेटमवर स्पष्ट शब्दात ट्वीटवर पोस्ट केले आहे. ते म्हणाले की, टी20 विश्वचषकात विराट कोहली कोणत्याही परिस्थितीमध्ये संघात हवाच आहे. असे रोहित शर्मानं बीसीसीआय सचिव जय शाह यांना स्पष्ट शब्दात सांगितलं. दरम्यान, मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय विराट कोहलीला टी 20 मध्ये घेण्याचा विचार करत नाही. कारण, मागील काही दिवसांमध्ये विराट कोहलीचा टी 20 मधील फॉर्म तितका चांगला नाही. 

नेमकं काय म्हणाले किर्ती आझाद ?
 
किर्ती आझाद यांनी एक्स (ट्वीटर) वर म्हटले की, "जय शाह सिलेक्टर नाहीत. विराट कोहलीला टी20 संघात स्थान मिळू नये, यासाठी त्यांनी अजित आगरकर यांना सांगितलं. जेणेकरुन आगरकर अन्य निवड समितीच्या सदस्यांना याबाबत तयार करतील. त्यासाठी अजित आगरकर यांना 15 मार्चपर्यंतचा वेळ दिला होता. अजित आगरकर स्वत: अथवा अन्य निवड समितीच्या सदस्यांना राजी करु शकले नाहीत.  जय शाह यांनी याबाबत रोहित शर्मा याच्यासोबतही चर्चा केली. पण रोहित शर्मानं विराट कोहली कोणत्याही परिस्थितीमध्ये संघात हवा, अशी भूमिका घेतली.  विराट कोहलीला टी 20 संघात स्थान मिळणार की नाही... याबाबत लवकरच अधिकृत माहिती समोर येईल. पण मूर्खांनी निवड प्रक्रियेत सहभागी होऊ नये. "

टी 20 विश्वचषक कधीपासून सुरु होतोय ? 

यंदाचा टी 20 विश्वचषक अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणार आहे. क्रिकेटच्या सर्वात मोठ्या महाकुंभाची सुरुवात 1 जूनपासून होणार आहे. यंदाच्या टी 20 विश्वचषकात 20 संघ सहभागी असतील. भारतीय संघ अ ग्रुपमध्ये आहे. या गटामध्ये पाकिस्तान, आयरलँड, कॅनाडा आणि यूएसए या संघाचाही समावेश आहे. भारतीय संघाचा सलामीचा सामना पाच जून रोजी होणार आहे. तर 9 जून रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये लढत होणार आहे.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indurani Jakhar  : इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
Akola : 'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kunal Kamra Special Report : कामराची कॉमडी, प्रेक्षकांना समन्स; पोलीस नोंदवणार प्रेक्षकांचे जबाबSuresh Dhas Full PC : कृषी केंद्राची कंत्राट अप्रत्यक्षपणे कृषी अधिकाऱ्यांकडेच : सुरेश धसSpecial Report Sanjay Raut : मोदींची सप्टेंबरमध्ये निवृत्ती,राऊतांची भविष्यवाणी;भाजप जाळ्यात अडकणार?Anjali Damania On Rajendra Ghanwat : राजेंद्र घनवट यांनी बीडच्या शेतकऱ्यांना छळून त्रास दिला:दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indurani Jakhar  : इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
Akola : 'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल  2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल  2025 | मंगळवार
Embed widget