36 धावाच चोपल्या, पण रोहित शर्माच्या नावावर 3 विक्रमांची नोंद
Rohit Sharma : पंजाबविरोधात रोहित शर्मानं 36 धावांची शानदार खेळी केली. रोहित शर्मानं 25 चेंडूमध्ये 3 षटकार आणि दोन चौकारांच्या मदतीने 36 धावांची शानदार खेळी केली.
Rohit Sharma IPL Record : पंजाब किंग्स आणि मुंबई यांच्यामध्ये आयपीएलमधील रोमांचक सामना सुरु आहे. या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना शानदार सुरुवात केली आहे. सलामी फलंदाज रोहित शर्मानं मुंबईच्या डावाला आकार दिला. रोहित शर्मानं 36 धावांची शानदार खेळी केली. रोहित शर्मानं 25 चेंडूमध्ये 3 षटकार आणि दोन चौकारांच्या मदतीने 36 धावांची शानदार खेळी केली. या धमाकेदार खेळीनंतर रोहित शर्मानं तीन मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. रोहित शर्मानं षटकारांचा विक्रमही आपल्या नावावर केलाय. पाहूयात त्याबाबत सविस्तर
आयपीएलमध्ये 6500 धावांचा पल्ला -
रोहित शर्मानं आयपीएलमध्ये 6 हजार 500 धावांचा टप्पा पार केला. असा पराक्रम करणारा रोहित शर्मा तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. रोहित शर्मानं 245 डावामध्ये 6508 धावा केल्या आहेत. यामध्ये 2 शतकं आणि 42 अर्धशतकाचा समावेश आहे. रोहित शर्माने 275 षटकार आणि 584 चौकार लगावले आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. कोहलीने 236 डावामध्ये 7624 धावा केल्या आहेत. शिखर धवन दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्यानं 6769 धावा केल्या आहेत.
IPL 2024: Rohit Sharma completes 6500 runs in the IPL as Mumbai Indians reach 86/1 in ten overs against Punjab Kings at the Maharaja Yadavindra Singh Cricket Stadium in Mullanpur. pic.twitter.com/G3sLrBfafr
— IANS (@ians_india) April 18, 2024
Rohit Sharma becomes the third highest run-getter in IPL 2024.
— Johns. (@CricCrazyJohns) April 18, 2024
ODI WC, Test series vs Eng & now in IPL - This peak is scary, nearing to 37 years old. 🥶 pic.twitter.com/rZedDDHG1p
ऑरेंज कॅप स्पर्धेत रोहितची एन्ट्री
पंजाबविरोधात 36 धावांची खेळी करत रोहित शर्मानं ऑरेंज कॅप स्पर्धेत मोठी झेप घेतली आहे. रोहित शर्मा आता तिसऱ्या क्रमांकावर पोहचलाय. रोहित शर्मानं सात सामन्यात 297 धावांचा पाऊस पाडलाय. रोहित शर्माने 164 च्या स्ट्राईक रेटने धावांचा पाऊस पाडलाय. रोहित शर्मानं यंदाच्या हंगामात एक शतक ठोकले आहे. रोहित शर्मानं यंदाच्या हंगामात 18 षटकार आणि 30 चौकार ठोकले आहेत. ऑरेंज कॅप स्पर्धेत विराट कोहली 361 धावांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर रियान पराग 318 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
मुंबईकडून सर्वाधिक षटकार -
रोहित शर्मानं पंजाबविरोधात तीन षटकार ठोकले. या षटकारासह रोहित शर्मानं मोठा विक्रम नावावर केला आहे. रोहित शर्मा मुंबईकडून सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज ठरलाय. याआधी हा विक्रम कायरान पोलार्डच्या नावावर होता. रोहित शर्माच्या नावावर 224 षटकारांची नोंद झाली आहे. पोलार्डच्या नावावर 223 षटकार आहे. हार्दिक पांड्या 104 आणि ईशान किशन याच्या नावावर 103 षटकारांची नोंद आहे.
HISTORY ⭐
— Johns. (@CricCrazyJohns) April 18, 2024
- ROHIT SHARMA HAS HIT MOST SIXES FOR MUMBAI INDIANS IN IPL...!!!! pic.twitter.com/nIVWDkEDF8