सूर्या आला, मार्श गेला.. मुंबईच्या संघात 3 बदल, दिल्लीने 2 जणांना बाहेर केले
MI vs DC, IPL 2024 : दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे.
MI vs DC, IPL 2024: दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. मुंबई आणि दिल्ली संघ गुणतालिकेत तळाला आहेत. मुंबई संघ आज पहिल्या विजयासाठी मैदानात उतरला आहे. मुंबईला पहिल्या तिन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईचा संघ गुणतालिकेत दहाव्या क्रमांकावर आहे. तर दिल्लीचा संघ गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर आहे. पण दिल्लीला चार सामन्यात तीन पराभवाचा सामना करावा लागला. आजच्या सामन्यात दिल्लीची गाडी विजयाच्या पटरीवर परतणार का? याकडे चाहत्यांचं लक्ष लागलेय. वानखेडेवर सुरु असलेल्या सामन्यामध्ये दिल्ली आणि मुंबईच्या प्लेईंग 11 मध्ये बदल झाले आहेत.
सूर्य परतला -
दुखापतीनंतर सूर्यकुमार यादव मुंबईच्या प्लेईंग 11 मध्ये परतला आहे. सूर्यकुमार यादवचं कमबॅक झाल्यानंतर मुंबईच्या ताफ्यात तीन बदल करण्यात आले आहेत. नमन धीर या युवा फलंदाजाला बेंचवर बसावं लागत आहे. रोमिरिओ शेफर्ड आणि मोहम्मद नबी यांनाही प्लेईंग 11 मध्ये स्थान देण्यात आले आहे. क्वेना माफाका आणि ब्रेविस यांना आराम देण्यात आला आहे. सूर्यकुमार यादव परतल्यामुळे मुंबईची ताकद वाढली आहे.
दिल्लीच्या प्लेईंग 11 मध्येही मोठे बदल -
अधीच तळाला असणाऱ्या दिल्लीच्या अडचणी संपायच्या नाव घेत नाहीत. दिल्लीच्या संघातही आज दोन बदल करण्यात आले आहेत. मिचेल मार्श दुखापतग्रस्त असल्यामुळे आजच्या सामन्याला तो उपलब्ध नाही. त्याशिवाय रसीख यालाही बाहेरचा रस्ता दाखवला आहे. मिचेल मार्श याच्याजागी झाय रिचर्डसन याला संधी दिली आहे. तर रसिकच्या जागी ललीत यादव याला संधी देण्यात आली आहे. दरम्यान, कुलदीप यादव आणि मुकेश कुमार दुखापतीमुळे आजच्या सामन्यासाठी उपलब्ध नाहीत. त्यात आता मिचेल मार्शही दुखापतग्रस्त झाला आहे.
मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग 11 मध्ये कोण कोण ?
रोहित शर्मा, ईशान किशन (विकेकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टीम डेविड, मोहम्मद नबी, रोमिरिओ शेफर्ड, गेराल्ड कोइत्जे, पियूष चावला, जसप्रीत बुमराह
Mumbai Indians: 1 Rohit Sharma, 2 Ishan Kishan, 3 Suryakumar Yadav, 4 Tilak Varma, 5 Hardik Pandya (capt), 6 Tim David, 7 Mohammad Nabi, 8 Romario Shepherd, 9 Piyush Chawla, 10 Gerald Coetzee, 11 Jasprit Bumrah
इम्पॅक्ट प्लेअर - आकाश माधवाल, क्वेना माफाका, नमन धीर, नेहाल वढेरा, सॅम्स मुलानी
Subs: Akash Madhwal, Kwena Maphaka, Naman Dhir, Nehal Wadhera, Shams Mulani
दिल्लीच्या प्लेईंग 11 मध्ये कोणते खेळाडू ?
डेविड वॉर्नर, पृथ्वी शॉ, अभिषेक पोरेल, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, ललित यादव, झे रिचर्डसन, एनरिक नॉर्खिया, ईशांत शर्मा, खलील अहमद
Delhi Capitals: 1 Prithvi Shaw, 2 David Warner, 3 Abhishek Porel, 4 Rishabh Pant (wk and capt), 5 Tristan Stubbs, 6 Axar Patel, 7 Lalit Yadav, 8 Jhye Richardson, 9 Anrich Nortje, 10 Ishant Sharma 11 Khaleel Ahmed
राखीव खेळाडू - कुमार कुशाग्र, यश धुल, सुमित कुमार, प्रविण दुबे
Subs: Kumar Kushagra, Yash Dhull, Jake Fraser-McGurk, Sumit Kumar, Pravin Dubey