Rinku Singh:24.75 कोटी मिळवणारा मिशेल स्टार्क फेल,रिंकू सिंगनं जे केलं ते सगळे पाहत राहिले
Rinku Singh : टीम इंडियाचा युवा खेळाडू रिंकू सिंग आयपीएलमध्ये केकेआरकडून खेळतोय. सराव सामन्यातील रिंकूच्या एका सिक्सचीची जोरदार चर्चा सुरु आहे. स्टार्क 10 वर्षानंतर आयपीएल खेळणार आहे.
कोलकाता :आयपीएलचं (IPL 2024) यंदाचं पर्व 22 मार्चपासून सुरु होत आहे. अभिनेता शाहरुख खान याच्या मालकीच्या कोलकाता नाइट रायडर्सची (KKR) पहिली मॅच 23 मार्चला सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध ईडन गार्डनच्या मैदानावर होणार आहे. या मॅचमध्ये टीम इंडियाचा युवा खेळाडू रिंकू सिंगवर (Rinku Singh) कोलकाता नाईट रायडर्सची मोठी भिस्त आहे. टी-20 मध्ये वादळी खेळीसाठी तो प्रसिद्ध आहे. आयपीएल सुरु होण्यापूर्वी सर्व टीम्सकडून सराव सुरु करण्यात आला आहे. यापैकी एका सराव सामन्यात रिंकू सिंगनं मिशेल स्टार्कला (Mitchell Starc) मारलेला षटकार चर्चेत आहे.
रिंकू सिंगनं तब्बल दहा वर्षानंतर आयपीएलमध्ये कमबॅक करणाऱ्या मिशेल स्टार्कला सराव सामन्यात जोरदार षटकार लगावला. ईडन गार्डन्सवर दुसऱ्या सराव सामन्यात मिशेल स्टार्क डेथ ओव्हर्समध्ये बॉलिंग करत होता. यावेळी रिंकू सिंगनं त्याला षटकार लगावला. मिशेल स्टार्कला मारलेला षटकार सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.
Rinku Singh smashed a SIX to Mitchell Starc 🍿💥
— कट्टर KKR समर्थक 🦁🇮🇳 ™ (@KKRWeRule) March 19, 2024
This is Cinema!! pic.twitter.com/zQNhfPrqSR
मिशेलनं एका ओव्हरमध्ये दिल्या २० रन्स
डेथ ओव्हर्समध्ये मिशेल स्टार्कसमोर रिंकू सिंग आणि मनीष पांडे हे दोघे होते.मिशेल स्टार्कनं अखेरच्या ओव्हरमध्ये 20 रन दिल्या. स्टार्कनं ४ ओव्हरमध्ये 40 धावा देत एक विकेट घेतली. रिंकू सिंगनं अखेरच्या ओव्हरमध्ये मिशेल स्टार्कला मिडविकेटला सिक्सर मारला. मिशेल स्टार्कनं रिंकूला यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला मात्र चुकून तो फुलटॉस पडला. यानंतर रिंकूनं जोरदार प्रहार करत बॉल बाऊंड्रीच्या बाहेर पाठवला. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.दुसऱ्या सराव सामन्यात मिशेल स्टार्कची टीम पर्पल आणि टीम गोल्ड यांच्यात लढत सुरु होती. रिंकूनं या मॅचमध्ये 16 बॉलमध्ये 37 धावा केल्या होत्या.
मिशेल स्टार्क 10 वर्षानंतर आयपीएलमध्ये
मिशेल स्टार्कनं 2014 आणि 2015 मध्ये आयपीएलमध्ये आरसीबीचं प्रतिनिधीत्व केलं होतं. कोलकाताच्या संघानं मिशेल स्टार्कला 2018 मध्ये संघात घेतलं होतं.मात्र, दुखापतीमुळं तो खेळू शकला नव्हता. कोलकाता नाईट रायडर्सनं 24.75 कोटी रुपयांची बोली लावून मिशेल स्टार्कला संघात घेतलं होतं.
रिंकू सिंगनं आयपीएलमध्ये 2018 ला पदार्पण केलं होतं. त्यावेळी रिंकू सिंग चांगली कामगिरी करु शकला नव्हता. रिंकू सिंग 2018 पासून 2024 पर्यंत कोलकाताच्या टीममध्ये आहे. रिंकूनं 2022 आणि 2023 च्या आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली,याच्या जोरावर त्याला टीम इंडियाची दारं उघडली.
रिंकूनं आतापर्यंत आयपीएलमध्ये 31 मॅच खेळल्या आहेत. यामध्ये त्यानं 725 धावा केल्या आहेत. 36.25 सरासरीनं आणि 142.16 च्या स्ट्राईक रेटनं धावा केल्या आहेत. त्यानं आयपीएलमध्ये 4 अर्धशतकं केली असून 38 षटकार लगावले आहेत.
संबंधित बातम्या :