Video : कोच राहुल द्रविड अन् कर्णधार संजूमध्ये झाले भांडण? व्हायरल व्हिडिओमुळे उडाली खळबळ; खरं सत्य काय?
आयपीएल 2025 मध्ये राजस्थान रॉयल्सचा संघ अतिशय खराब फॉर्ममध्ये आहे.

Sanju Samson Ignores Rahul Dravid Team Meeting : आयपीएल 2025 मध्ये राजस्थान रॉयल्सचा संघ अतिशय खराब फॉर्ममध्ये आहे. तिने पहिल्या 7 पैकी 5 सामने हरले आहेत. गेल्या सामन्यातही त्यांना सुपर ओव्हरमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. या दरम्यान एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन आणि प्रशिक्षक राहुल द्रविड चर्चेत आले आहेत. या दोघांमध्ये भांडण झाले असा दावा केला जात आहे.
द्रविड येताच आरआरच्या संघातील वातावरण बिघडले?
हा व्हिडिओ बुधवारी अरुण जेटली स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या सामन्यातील आहे. या व्हिडिओमध्ये, संघाच्या गर्दीदरम्यान मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड सपोर्ट स्टाफ आणि खेळाडूंसोबत रणनीती बनवताना दिसत आहेत. पण संजू सॅमसन संघाच्या हडलमधून अनुपस्थित आहे. तो या गर्दीजवळ उभा होता. पण तो या संभाषणाचा भाग नव्हता. यादरम्यान, एका खेळाडूने संजूला बोलावण्याचा प्रयत्न केला, परंतु तो हाताने इशारा करताना दिसला. त्यानंतर चाहते म्हणत आहे की, संघात सर्व काही ठीक चालले नाही आणि संजू सॅमसन आणि राहुल द्रविड यांच्यातील संबंध बिघडले आहेत.
I knew there was definitely a rift within the setup when there were absolutely no discussions or chat in the dugout before the super over.Everyone was standing quite in a circle in the dugout.Look at Sanju's hand signal in the first video,he is deliberately ignoring everyone. https://t.co/DfxmlwGgBG pic.twitter.com/688ji3MXrS
— Delhi Capitals Fan (@pantiyerfc) April 17, 2025
राहुल द्रविड या हंगामातून राजस्थान संघात परतला आहे. याआधी तो टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करत होता. 2021 मध्ये त्याला ही जबाबदारी मिळाली. तेव्हाही टीम इंडियाच्या कॅम्पमधून अनेक वेळा वाद झाल्याचे वृत्त समोर आले होते. राहुल द्रविडच्या कारकिर्दीत विराट कोहलीनेही आपले कर्णधारपद गमावले.
यावेळी, आयपीएलच्या सुरुवातीला राजस्थान ताफ्यातही असेच काहीसे दिसून आले. दुखापतीमुळे संजूने हंगामातील पहिल्या तीन सामन्यांमध्ये फक्त फलंदाज म्हणून खेळले. त्याच वेळी, रियान परागने कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतली. तेव्हाही बातम्या आल्या होत्या की यशस्वी जैस्वाल त्या निर्णयावर खूश नव्हता. कारण अनुभवाच्या बाबतीत जैस्वाल रियान परागपेक्षा जास्त अनुभवी आहे.
I ain’t supporting this political team @rajasthanroyals if Sanju and Jaiswal leaves 😡🤬 pic.twitter.com/gErr07PNna
— Chinmay Shah (@chinmayshah28) April 17, 2025
राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली राजस्थान संघाला आतापर्यंत काही खास कामगिरी करता आलेली नाही. यावेळी राजस्थानने हंगामाची सुरुवात सलग दोन पराभवांनी झाली. यानंतर तिने सलग 3 सामने जिंकण्यातही यश मिळवले. पण गेल्या 3 सामन्यांमध्ये त्याला फक्त पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशा परिस्थितीत राजस्थान संघ या हंगामातून बाहेर जाण्याच्या मार्गवर आहे आणि आता या व्हिडिओमुळे चाहत्यांचे टेन्शन वाढले आहे.
हे ही वाचा -





















