एक्स्प्लोर

RCB चा दिग्गज IPL 2024 नंतर होणार निवृत्त, 2008 पासून खेळतोय आयपीएल

Dinesh Karthik set to retire from IPL : विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिक याचा आगामी आयपीएल हंगाम अखेरचा असेल.

Dinesh Karthik set to retire from IPL : विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिक याचा आगामी आयपीएल हंगाम अखेरचा असेल. दिनेश कार्तिक आरसीबीकडून यंदा आयपीएलच्या मैदानात उतरणार आहे. 39 वर्षीय कार्तिक अखेरचा हंगाम खेळण्यासाठी सज्ज झालाय.  ESPNcricinfo यानं दिनेश कार्तिक अखेरचा आयपीएल हंगाम खेळणार असल्याचं वृत्त दिलेय. दिनेश कार्तिक 2008 पासून आयपीएलमध्ये खेळतोय. पहिल्या हंगामापासून आतापर्यंत आयपीएल खेळणाऱ्या मोजक्याच खेळाडूंमध्ये दिनेश कार्तिकचं नाव आहे. दिनेश कार्तिक, एमएस धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, वृद्धीमान साहा आणि मनिष पांडे यांनी आतापर्यंत प्रत्येक आयपीएल हंगाम खेळला आहे.  

2022 मध्ये कार्तिकची कामगिरी - 

2022 पासून दिनेश कार्तिक आरसीबीच्या ताफ्यात आहे. आरसीबीने कार्तिकला 5.5 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले. 2022 च्या हंगामात कार्तिकने धमाकेदार कामगिरी केली होती. कार्तिकने 16 सामन्यात 55 च्या सरासरीने आणि 183.33 च्या स्ट्राईक रेटने 330 धावा चोपल्या होत्या. आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहचवण्यात त्यानं सिंहाचा वाटा उचलला होता. या कामगिरीच्या बळावरच त्याचं टीम इंडियाक कमबॅक झालं होतं. 2023 मध्ये दिनेश कार्तिक याला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही.

टीम इंडियात कमबॅक - 

आयपीएमध्ये शानदार कामगिरी केल्यानंतर दिनेश कार्तिक याचं टीम इंडियात कमबॅक झालं होतं. कार्तिकला 2022 च्या टी 20 संघात स्थान मिळाले होते. पण या स्पर्धेत तो अपयशी ठरला. त्याला या स्पर्धेतील तीन डावात फक्त 14 धावा करता आल्या. कार्तिकनं दीर्घ काळानंतर टीम इंडियात कमबॅक केले होते, पण अपयशी ठरल्यामुळे त्याला पुन्हा वगळलेय. 

आयपीएलमध्ये  सहा संघाकडून खेळला, आतापर्यंत कार्तिकची कामगिरी - 

दिनेश कार्तिक सध्या आरसीबी संघाचा सदस्य आहे. 2015 मध्येही तो आरसीबीचा सदस्य होता. 2016 च्या हंगामासाठी त्याला आरसीबीने रिलिज केले होते. त्यांतर पुन्हा त्याला ताफ्यात घेतले. आयपीएलमध्ये दिनेश कार्तिकनं आतापर्यंत सहा संघाचे प्रतिनिधित्व केलेय. दिल्ली डेयरडेविल्स (2008-14), किंग्स इलेव्हन पंजाब (पंजाब किंग्स 2011), मुंबई इंडियन्स (2012-13), गुजरात लायन्स (2016-17), कोलकाता नाइट राइडर्स (2018-21) आणि आरसीबी (2015, 2022-आतापर्यंत)  या सहा संघाकडू दिनेश कार्तिक आतापर्यंत आयपीएलमध्ये खेळला आहे.  दिनेश कार्तिकने आतापर्यंत 242 आयपीएल सामने खेळले आहेत. यामध्ये 26 च्या सरासरीने 4516 धावा त्याने केल्या आहेत.यामध्ये 20 अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएलमध्ये त्याचा स्ट्राईक रेट 132 इतका राहिलाय. विकेटच्या मागेही कार्तिकला चांगलं यश मिळालेय. त्याने 133 फलंदाजांना बाद केलेय. 

आयपीएलमध्ये कर्णधार -

दिनेश कार्तिकनं आयपीएलमध्ये कर्णधारपदही भूषावलं आहे. दिल्लीच्या संघामध्ये असताना सहा वेळा बदली कर्णधार म्हणून तो मैदानात उतरला होता. तर कोलकाता संघासाठी 37 सामन्यात त्यानं नेतृत्व केलेय.  दिनेश कार्तिकच्या नेतृत्वात संघाने 21 विजय मिळवले अन् 21 पराभव पाहिले. 

समालोचक म्हणून काम - 

भारतीय क्रिकेटमध्ये संधी मिळणं कठीण झालं, तेव्हा दिनेश कार्तिकनं दुसऱ्या इनिंगला सुरुवात केली. दिनेश कार्तिक यानं समालोचक म्हणून काम केलेय.  कार्तिक आता चांगला ब्रॉडकास्टर म्हणून प्रसिद्ध झालाय. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यातही तो समालोचन करतोय. 

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Venezuela : राष्ट्रपती निकोलस मादुरो अमेरिकेच्या ताब्यात, व्हेनेझुएलाचं नेतृत्त्व कोण करणार? नाव आघाडीवर असलेल्या डेल्सी रॉड्रिग्ज नेमक्या कोण?
राष्ट्रपती निकोलस मादुरो अमेरिकेच्या ताब्यात, व्हेनेझुएलाचं नेतृत्त्व कोण करणार? डेल्सी रॉड्रिग्ज यांचं नाव आघाडीवर
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवारीची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा झाला? निवडणूक आयोगानेच सांगितलं
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवारीची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
बीडमध्ये सह्याद्री वनराईला दुसऱ्यांदा आग, सयाजी शिंदेंचा संताप; अजित पवारांना भेटणार, काय म्हणाले शिंदे
बीडमध्ये सह्याद्री वनराईला दुसऱ्यांदा आग, सयाजी शिंदेंचा संताप; अजित पवारांना भेटणार, काय म्हणाले शिंदे

व्हिडीओ

Solapur Funeral : MNS पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, हजारोनागरिक सहभागी, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Ravindra Chavan on Ajit Pawar : अजित पवार खुद के गिरेबान झाक कर देखिए, रविंद्र चव्हाणांचा थेट इशारा
Akola BJP : भाजपकडून वीज बिल वाटणाऱ्या तरुणाला थेट उमेदवारी, गरीब कुटुंब रातोरात आलं चर्चेत
Panvel Election : पनवेलमध्ये भाजपला मोठा धक्का, स्नेहा शेंडेंची माघार, अपक्ष उमेदवार बिनविरोध निवडून
Sachin Sawant : फडणवीसांचा मेट्रोमध्येबसून मुलाखत,निवडणूक आयोग कारवाई करणार का?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Venezuela : राष्ट्रपती निकोलस मादुरो अमेरिकेच्या ताब्यात, व्हेनेझुएलाचं नेतृत्त्व कोण करणार? नाव आघाडीवर असलेल्या डेल्सी रॉड्रिग्ज नेमक्या कोण?
राष्ट्रपती निकोलस मादुरो अमेरिकेच्या ताब्यात, व्हेनेझुएलाचं नेतृत्त्व कोण करणार? डेल्सी रॉड्रिग्ज यांचं नाव आघाडीवर
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवारीची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा झाला? निवडणूक आयोगानेच सांगितलं
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवारीची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
बीडमध्ये सह्याद्री वनराईला दुसऱ्यांदा आग, सयाजी शिंदेंचा संताप; अजित पवारांना भेटणार, काय म्हणाले शिंदे
बीडमध्ये सह्याद्री वनराईला दुसऱ्यांदा आग, सयाजी शिंदेंचा संताप; अजित पवारांना भेटणार, काय म्हणाले शिंदे
Team India Squad Against New Zealand ODI: न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर; दोघांची घरवापसी, पण मोहम्मद शमीकडे पुन्हा दुर्लक्ष!
न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर; दोघांची घरवापसी, पण मोहम्मद शमीकडे पुन्हा दुर्लक्ष!
Mutual Fund : 2025 मध्ये इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, घसरणीची कारणं समोर, SIP मुळं बाजाराला दिलासा
2025 मध्ये इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, घसरणीची कारणं समोर, SIP मुळं बाजाराला दिलासा
Sangli Municipal Corporation: सांगली अन् घोषणांसाठी किती चांगली! विमानतळ, सांगली मनपा इमारत ते मिरजेत म्युझियम ते ट्रक टर्मिनल, सीएम फडणवीसांच्या छप्पर फाडके घोषणांची खैरात
सांगली अन् घोषणांसाठी किती चांगली! विमानतळ, सांगली मनपा इमारत ते मिरजेत म्युझियम ते ट्रक टर्मिनल, सीएम फडणवीसांच्या छप्पर फाडके घोषणांची खैरात
70 बिनविरोध निवडीवरुन संजय राऊतांचा हल्लाबोल; चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार, सांगितलं राज'कारण'
70 बिनविरोध निवडीवरुन संजय राऊतांचा हल्लाबोल; चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार, सांगितलं राज'कारण'
Embed widget