विराटला जमलं नाही ते स्मृतीनं केलं, 16 वर्षानंतर आरसीबीनं जिंकला चषक
RCB Won IPL 2024 Title : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी आजचा दिवस (17, मार्च 2024, रविवार) अतिशय खास आहे. स्मृती मंधानाच्या नेतृत्वातील आरसीबीने 16 वर्षांचा चषकाचा दुष्काळ संपवला आहे. म
RCB Won IPL 2024 Title : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी आजचा दिवस (17, मार्च 2024, रविवार) अतिशय खास आहे. स्मृती मंधानाच्या नेतृत्वातील आरसीबीने 16 वर्षांचा चषकाचा दुष्काळ संपवला आहे. महिला प्रिमियर लीग स्पर्धेत आरसीबीने दिल्लीचा पराभव करत चषकावर नाव कोरलेय. आरसीबीसाठी विराट कोहलीला जे जमलं नाही, ते स्मृती मंधानाने करुन दाखवलं आहे. 16 वर्षानंतर आरसीबीनं चषकावर नाव कोरलेय. फायनलमध्ये आरसीबीने दिल्लीचा आठ विकेटनं पराभव केला.
महिला प्रीमियर लीग स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं प्रथम फलंदाजी करताना 113 धावांपर्यंत मजल मारली. दिल्लीने आरसीबीसमोर 114 धावांचे आव्हान ठेवलं होतं. स्मृती मंधानाच्या आरसीबीने हे आव्हान आठ विकेटच्या मोबदल्यात सहज पार केले. आरसीबीसाठी स्मृती मंधाना हिने 31, सोफी डिवाइनने 32 आणि एलिस पेरी हिने नाबाद 35 धावांची खेळी केली.
RCB ARE THE WPL CHAMPIONS...!!! 🏆 pic.twitter.com/zYmqYPUnp2
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 17, 2024
शानदार सुरुवातीनंतर दिल्लीचा डाव कोसळला -
दिल्लीनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीच्या सलामी फलंदाजांनी शानदार सुरुवातही केली. शेफाली वर्मा आणि मेग लैनिंग यांनी दिल्लीला जबरदस्त सुरुवात करुन दिली. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या 6 षटकात दिल्लीची धावसंख्या 60 पर्यंत पोहचवली होती. सहा षटकानंतर दिल्ली एकवेळ बिनबाद 60 अशा भक्कम स्थितीमध्ये होती. पण त्यानंतर आरसीबीच्या गोलंदाजांनी कमबॅक केले. एकापाठोपाठ एक फलंदाजांना तंबूत पाठवलं. आरीसीबीच्या गोलंदाजीसमोर दिल्लीचे फलंदाज फेल ठरले. बिनबाद 60 अशा सुस्थितीत असणारा दिल्लीचा संपूर्ण संघ 113 धावांत गारद झाला. आरसीबीसाठी श्रेयंका पाटील हिने 4 विकेट घेतल्या. तर सोफी मोलिनक्स हिने 3 फलंदाजांना तंबूत पाठवलं. सोफी मोलिनक्स हिने एकाच षटकात दिल्लीच्या तीन फलंदाजांना तंबूत पाठवलं. त्यानंतरच दिल्लीची फलंदाजी ढेपाळली.
VIRAT KOHLI ON VIDEO CALL...!!!
— Johns. (@CricCrazyJohns) March 17, 2024
- Congratulating all the RCB Players. pic.twitter.com/vbJ0JCVi6Z
आरसीबीचा सहज विजय -
दिल्लीने दिलेल्या 114 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीची सुरुवात अतिशय संध राहिली. पहिल्या षटकात आरसीबीला फक्त 25 धावाच करता आल्या. आरसीबी पुन्हा फायनलमध्ये पराभवाचा सामना करणार का? असाच प्रश्न चाहत्यांना सतावत होता. पण त्याचवेळी स्मृती मंधाना आणि सोफी डिवाइन यांनी गियर बदलला अन् वेगानं धावा काढल्या. कर्णधार स्मृती मंधाना हिने 39 चेंडूमध्ये तीन चौकारांच्या मदतीने 31 धावांची खेळी केली. सोफी डिवाइन हिने 27 चेंडूमध्ये पाच चौकार आणि एका षटकारांच्या मदतीने 32 धावा जोडल्या. एलिस पेरी हिने 37 चेंडूमध्ये चार चौकारांच्या मदतीने नाबाद 35 धावा केल्या. ऋचा घोष हिने 14 चेंडूत नाबाद 17 धावांची खेळी केली. दिल्लीकडून गोलंदाजांनी प्रभावी मारा केला नाही. आरसीबीच्या फलंदाजांना बाद करण्यात अपयश आले.