(Source: ECI/ABP News/ABP Majha)
RCB vs RR Playing 11 : बंगळुरु आणि राजस्थान आमने-सामने, कोहलीविरोधात सॅमसनचे 'हे' 11 गडी मैदानात
RCB vs RR Playing 11 : आयपीएल 2023 च्या 32 व्या सामन्यात आज बंगळुरु (Royal Challengers Bangalore) आणि राजस्थान (Rajasthan Royals) या दोन संघामध्ये लढत पाहायला मिळणार आहे.
RCB vs RR IPL 2023 Match 32 : आयपीएल (IPL 2023) आज, रविवारी 23 एप्रिलला राजस्थान (Rajasthan Royals) आणि बंगळुरु (Royal Challengers Bangalore) यांच्यात रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. आज बंगळुरुतील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर (M. Chinnaswamy Stadium) दुपारी 3.30 वाजता हा सामना रंगणार आहे. कर्णधार संजू सॅमसनच्या नेतृत्त्वात राजस्तान रॉयल्सचा संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर कायम आहे. तर फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्त्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ सहाव्या क्रमांकावर आहे.
IPL 2023 RR vs RCB : बंगळुरु आणि राजस्थान आमने-सामने
मागील सामन्यात सॅम करनच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात विजयानंतर बंगळुरूचा संघ या सामन्यात उतरणार आहे. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्स संघाने घरच्या मैदानावर लखनौ सुपर जायंट्स विरुद्धचा मागील सामना गमावला. आयपीएल 2023 पॉइंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर कायम राहण्यासाठी राजस्थान आणि गुणतालिकेत वरच्या क्रमांकावर उडी घेण्यासाठी आरसीबी आजचा सामना जिंकण्याचा प्रयत्न करेल.
M. Chinnaswamy Stadium Pitch Report : चिन्नास्वामी स्टेडियम खेळपट्टीचा अहवाल
आज संध्याकाळी 7.30 वाजता बंगळुरुमधील चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. ही खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल आहे. येथे गोलंदाजांना खास कामगिरी करता आलेली नाही. बंगळुरूमध्ये पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 170 धावांची आहे. या खेळपट्टीवर अधिक धावा करूनच फलंदाजांवर दबाव आणता येतो. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाचा फायदा होईल.
RCB vs RR Playing 11: दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग 11
RCB Playing 11 : आरसीबी संभाव्य प्लेईंग 11
विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), वेन पार्नेल, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, वैशाक विजयकुमार, मोहम्मद सिराज.
RR Playing 11 : राजस्थान संभाव्य प्लेईंग 11
जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.
IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?
आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.
महत्त्वाच्या इतर बातम्या :