एक्स्प्लोर

RCB vs RR IPL 2023: मॅक्सवेल-फाफची अर्धशतके, आरसीबीचे राजस्थानसमोर 190 धावांचे आव्हान

RCB vs RR IPL 2023: आरसीबीने अखेरच्या पाच षटकात ढिसाळ कामगिरी केली. आरसीबीने अखेरच्या पाच षटकात 33धावा केल्या अन् पाच विकेट गमावल्या.

RCB vs RR 1st Innings Highlights: ग्लेन मॅक्सवेल आणि फाफ डु प्लेसिस यांच्या वादळी अर्धशतकाच्या बळावर आरसीबीने २० षटकात नऊ विकेटच्या मोबदल्यात १८९ धावांपर्यंत मजल मारली. मॅक्सवेल याने ७७ तर फाफ डु प्लेलिस याने ६२ धावांची खेळी केली. आरसीबीला अखेरच्या पाच षटकात धावा जमवण्यात अपयश आले. आरसीबीने अखेरच्या पाच षटकात फक्त ३३ धावा जमवल्या. यादरम्यान आरसीबीने पाच विकेट गमावल्या. हाणामारीच्या षटकात चहल याने भेदक मारा केला. आरसीबीचे तीन फलंदाज धावबाद झाले. आरसीबीने राजस्थानसमोर विजायासाठी १९० धावांचे आव्हान दिलेय. 

ग्लेन मॅक्सवेलचा बिग शो -

अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल याने वादळी फलंदाजी केली. मॅक्सवेल याने पहिल्या चेंडूपासूनच राजस्थानच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. मॅक्सवेल याने ४४ चेंडूत ७७ धावांची खेळी केली. या खेळीत मॅक्सवेल याने चार षटकार आणि सहा चौकार लगावले. अश्विन याने मॅक्सवेल याची खेळी संपुष्टात आणली. विराट कोहली आणि शाहबाद लागोपाठ तंबूत परतल्यानंतर मॅक्सवेल आणि फाफ डु प्लेसिस यांनी आरसीबीचा डाव सावरला. मॅक्सवेलने फाफसोबत तिसऱ्या विकेटला ६६ चेंडूत १२७ धावांची भागिदारी केली.  यामध्ये मॅक्सवेलचे योगदान ६५ धावांचे होते. 

फाफचे वादळी अर्धशतक -

पहिल्या चेंडूवर विराट कोहली बाद झाल्यानंतर फाफ डु प्लेलिस याने संयमी आणि आक्रमक फलंदाजी केली. विराट कोहली आणि शाहबाज अहमद यांनी लागोपाठ विकेट फेकल्या. त्यानंतर फाफने मॅक्सवेलसह आरसीबीचा डाव सांभाळला. सुरुवातीला संयमी फलंदाजी केली. त्यानंतर प्रत्येक गोलंदाजांचा समाचार घेतला. फाफ डु प्लेसिस याने ३९ चेंडूत ६२ धावांची खेळी केली. या खेळीत फाफने दोन षटकार आणि आठ चौकार लगावले. फाफ डु प्लेसिस याने मॅक्सवेलसोबत ६६ चेंडूत १२७ धावांची भागिदारी केली. यामध्ये फाफ डु प्लेसिस याने ५२ धावांचे योगदान दिले.

विराट कोहली गोल्डन डक - 
राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने बंगलोरच्या मैदानावर नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ट्रेंट बोल्ट याने पहिल्याच चेंडूवर विकेट घेत संजूचा निर्णय सार्थ ठरवला. पहिल्याच चेंडूवर ट्रेंट बोल्ट याने भन्नाट फॉर्मात असलेल्या विराट कोहलीला एलबीड्ब्ल्यू बाद केले. डावाच्या पहिल्याच चेंडूवर विराट कोहली बाद होऊ तंबूत परतला. राजस्थानच्या ट्रेंट बोल्ट याने डावाच्या पहिल्याच चेंडू इनस्विंग टाकला... तो चेंडू विराट कोहलीच्या पॅडवर लागला. पंचांनी विराट कोहलीला LBW बाद दिले... विराट कोहलीला काही सेकंद खेळपट्टीवरच होता.. त्याने डीआरएसही घेतला नाही. विराट कोहलीने फाफकडे पाहिले अन् मैदान सोडले.  आयपीएलच्या करिअरमध्ये विराट कोहली दहाव्यांदा शून्यावर बाद झालाय.  2022 आणि 2014 मध्ये विराट कोहली तीन तीन वेळा शून्यावर बाद झालाय.  

इतर फलंदाजांची कामगिरी कशी ?

ग्लेन मॅक्सवेल आणि फाफ यांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. मॅक्सवेल बाद झाल्यानंतर आरसीबीचा डाव घसरला.  शाहबाज अहमद २, महिपाल लोमरोर ८, दिनेश कार्तिक १६, सुयेश प्रभुदेसाई ०, हसरंगा सहा, विजयकुमार वैशाक शून्य धावांचे योगदान दिले. डेविड विली याने दोन चेंडूत चार धावांची खेळी केली.

राजस्थानची गोलंदाजी कशी - 
बोल्टने पहिल्या चेंडूवर विराटला बाद केले. पण बोल्ट महागडा राहिला. बोल्टने चार षटकात ४१ धावा खर्च केल्या. बोल्टने दोन विकेट घेतल्या. त्याशिवाय संदप शर्माही आज महागडा ठरला. संदीपला चार षटकात ४९ धावा निघाल्या. संदीपने दोन विकेट घेतल्या. युजवेंद्र चहल आणि अश्विन यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget