IPL Final : रजत पाटीदारला श्रेयस अय्यरची धास्ती, दोन्ही कर्णधार आधीही फायनलमध्ये भिडले, आता पुन्हा नडणार; RCB vs PBKS कोण जिंकणार?
आयपीएल 2025 चा रोमांच शिगेला पोहोचला आहे. या हंगामातील विजेतेपदाचा सामना मंगळवारी पंजाब किंग्ज (PBKS) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात होणार आहे.

RCB vs PBKS IPL Final News : आयपीएल 2025 चा रोमांच शिगेला पोहोचला आहे. या हंगामातील विजेतेपदाचा सामना मंगळवारी पंजाब किंग्ज (PBKS) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात होणार आहे. या सामन्यात कोणताही संघ जिंकला तरी, आयपीएल चाहत्यांना एक नवीन विजेता संघ मिळणार हे निश्चित आहे. विजेतेपदाच्या सामन्यापूर्वी एक योगायोगाबद्दल सांगणार आहोत, ज्याबद्दल जाणून घेतल्यावर तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
फायनलआधीच रजत पाटीदारने घेतली श्रेयस अय्यरची धास्ती?
पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन आयपीएल संघ आहेत, ज्यांनी आतापर्यंत एकही आयपीएल जेतेपद जिंकलेले नाही. दोन्ही संघ त्यांच्या पहिल्या जेतेपदाची वाट पाहत आहेत. पंजाबचे नेतृत्व श्रेयस अय्यर करत आहे, तर आरसीबीचे नेतृत्व रजत पाटीदार करत आहे. विशेष म्हणजे, दोन्ही कर्णधार सात महिन्यांच्या आत झालेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पुन्हा एकदा एकमेकांसमोर येत आहेत. यापूर्वी, दोन्ही कर्णधारांमध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 च्या अंतिम फेरीत सामना झाला होता.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीदरम्यान हे दोन दिग्गज कर्णधार एकमेकांसमोर उभे ठाकले होते. त्या सामन्यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाने पाटीदारच्या संघाला पराभवाची चव चाखवली होती. आता इतिहास पुन्हा समोर उभा ठाकतोय, आणि रजत पाटीदारच्या मनात अय्यरची तीच धास्ती डोकं वर काढतेय. आयपीएल फायनलमध्ये इतिहासाची पुनरावृत्ती होणार, की रजत पाटीदार रिव्हेंज घेणार हा मोठा प्रश्न आहे. दोघंही युवा, दोघंही हुशार, आणि दोघांच्याही खांद्यावर मोठी जबाबदारी. मैदानावर नुसते चौकार-षटकार नाही, तर रणनीतींची जुगलबंदीही पाहायला मिळणार हे नक्की.
Make way for the 𝐏𝐮𝐧𝐣𝐚𝐛 𝐊𝐢𝐧𝐠𝐬 ❤️
— IndianPremierLeague (@IPL) June 1, 2025
They are all locked in to meet #RCB for the 𝘽𝙄𝙂 𝙊𝙉𝙀 🔥 #TATAIPL | #PBKSvMI | #Qualifier2 | #TheLastMile | @PunjabKingsIPL pic.twitter.com/L6UqDoMs50
3 जून रोजी मिळणार नवा चॅम्पियन
आता दोन्ही कर्णधार आयपीएल 2025 च्या अंतिम फेरीत एकमेकांसमोर येतील. क्वालिफायर-1 सामन्यात पंजाबला हरवून आरसीबीने अंतिम फेरीत प्रवेश केला. त्याच वेळी, एलिमिनेटरच्या विजेत्या मुंबई इंडियन्सला हरवून पंजाब किंग्जने अंतिम फेरीत प्रवेश केला. पंजाब आणि आरसीबीने आतापर्यंत कधीही आयपीएल ट्रॉफी जिंकलेली नाही, त्यामुळे आता या स्पर्धेला नवीन विजेता मिळेल हे निश्चित आहे. अठराव्या हंगामाचा विजेतेपदाचा सामना 3 जून रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल.
हे ही वाचा -





















