Magnus Carlsen Angry : डी गुकेशकडून पराभव, मॅग्नस कार्लसनचा संताप; टेबलवर बुक्की मारत रागारागाने गेला निघून; नेमकं काय घडलं? पाहा Video
नॉर्वे चेस 2025 स्पर्धेत भारतीय बुद्धिबळपटू डी. गुकेशने एक ऐतिहासिक कामगिरी करत पाच वेळा जगज्जेता मॅग्नस कार्लसनचा पराभव केला.

Magnus Carlsen Angry Reaction Viral Video : नॉर्वे चेस 2025 स्पर्धेत भारतीय बुद्धिबळपटू डी. गुकेशने एक ऐतिहासिक कामगिरी करत पाच वेळा जगज्जेता मॅग्नस कार्लसनचा पराभव केला. गुकेशच्या या विजयानं संपूर्ण बुद्धिबळविश्वात खळबळ माजवली असून त्याने आपली क्षमता पुन्हा सिद्ध केली आहे. डी गुकेशचे डावपेच ओळखण्यात अपयशी ठरल्यानंतर कार्लसनला राग अनावर झाला आणि चेकमेट होताच रागारागाने त्याने टेबलवर मूठ आदळली. पण आपली चूक लक्षात घेता, त्याने लगेच गुकेशला हात मिळवून तिथून निघून गेला.
WHAT JUST HAPPENED? 😱🫣 pic.twitter.com/RwBqhfU0gv
— Norway Chess (@NorwayChess) June 1, 2025
डी गुकेशकडून पराभव, जगज्जेता मॅग्नस कार्लसनचा संताप!
सामना संपल्यानंतर कार्लसन अत्यंत नाराज दिसला. पराभवाची झळ त्याला चांगलीच लागली आणि रागाच्या भरात त्याने टेबलवर बुक्की आपटली, आपला पराभव स्वीकारत तो तिथून रागारागाने उठून गेला. कॅमेऱ्यात हे दृश्य कैद झालं आणि पाहता पाहता ते सोशल मीडियावर व्हायरल झालं. गुकेशसाठी हा विजय केवळ गुणांची बाब नव्हती, तर एक मोठा टप्पा होता. वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी कार्लसनसारख्या दिग्गजाला हरवून त्याने पुन्हा एकदा सिद्ध केलं की तो फक्त भारतासाठीच नव्हे, तर जागतिक बुद्धिबळासाठीही मोठं नाव ठरू शकतो.
कार्लसनचा संताप काहीसा अनपेक्षित होता, मात्र तो त्याच्या स्पर्धात्मक स्वभावाचं प्रतिबिंब मानलं जात आहे. गुकेशसाठी मात्र ही संधी सोन्यासारखी ठरली. जगज्जेत्याला हरवलं, आणि तेही त्याच्या घरच्या मैदानावर.
OH MY GOD 😳🤯😲 pic.twitter.com/QSbbrvQFkE
— Norway Chess (@NorwayChess) June 1, 2025
नॉर्वे बुद्धिबळ सार्धेतील खुल्या गटात शनिवारी झालेल्या तीनही लढती रोमहर्षक झाल्या आणि तीनही लढतीचा अमगिडॉनमध्ये निकाल लागला. मॅग्नस कार्लसनने अमेरिकेच्या फॅब्रियानो कारुआना याला पराभूत केले, वेई यी याने डी. मुकेशला नमवले अर्जुन एरीगेसी याने हिकारु नाकामुरावर विजय मिळवला.
Carlsen outplayed Gukesh, made massive blunder to lose a winning game!
— Susan Polgar (@SusanPolgar) June 1, 2025
This is the biggest shock of the year! Carlsen rarely loses in classical chess, and he rarely commits big blunders. He was playing so well with the black pieces in round 6 in Norway against Gukesh. He had a… pic.twitter.com/vwwPwEdMqZ
पण तरीही मॅग्नस कार्लसन 9.5 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. फॅवियानो कारुआना आठ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. हिकार नाकामुराने 6.5 गुणांसह तिसरे स्थान पटकावले आहे. अर्जुन एरीगेसी सहा गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. ऐतिहासिक कामगिरीनंतरही डी. गुकेशला 4.5 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.

























