एक्स्प्लोर

RCB vs PBKS : धवनचं अर्धशतक हुकलं, पंजाबचं आरसीबीपुढे 177 धावांचे आव्हान

RCB vs PBKS IPL 2024 Updates : शिखर धवनच्या पंजाबने निर्धारित 20 षटकांमध्ये सहा विकेटच्या मोबदल्यात 176 धावांपर्यंत मजल मारली.

RCB vs PBKS IPL 2024 Updates : शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) पंजाबने निर्धारित 20 षटकांमध्ये सहा विकेटच्या मोबदल्यात 176 धावांपर्यंत (IPL 2024 RCB vs PBKS ) मजल मारली. शिखर धवन यानं सर्वाधिक 45 धावांची खेळी केली. त्याशिवाय सॅम करन, लिव्हिंगस्टोन आणि जितेश शर्मा यांनी छोटेखानी खेळी केली. आरसीबीकडून मोहम्मद सिराजने दोन विकेट घेतल्या. यंदाच्या आयपीएल हंगामात पहिला विजय नोंदवण्यासाठी आरसीबीला 177 धावांचे आव्हान मिळाले आहे.

पंजाब संघाने ठरावीक अंतराने विकेट फेकल्या. त्यामुळे मोठी धावसंख्या उभारता आली नाही. जॉनी बेयरस्टो, प्रभसिमरन, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, जितेश शर्मा आणि शशांक सिंह यांना 30 धावसंख्याही ओलांडता आली नाही. अखेरच्या दोन षटकांमध्ये जितेश शर्माने फटकेबाजीचा प्रयत्न केला, पण अपयश आले. 

पंजाबच्या फलंदाजांनी विकेट फेकल्या - 

आरसीबीचा कर्णधार फॅफ ड्यु प्लेसिस यानं नाणेफेक जिंकून (IPL 2024 RCB vs PBKS Toss Update) प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. बंगळुरुच्या मैदानावर शिखर धवन आणि जॉनी बेयरस्टो यांनी पंजाबसाठी डावाची सुरुवात केली. दोघांनी पंजाबच्या डावाला आक्रमक सुरुवात केली. पण मोहम्मद सिराजने बेयरस्टोला तंबूचा रस्ता दाखवला. बेयरस्टो याला फक्त आठ धावा करता आल्या. बेयरस्टो बाद झाल्यानंतर शिखर धवन यानं प्रभसिमरन याच्यासोबत डावाला आकार दिला. दोघांनी वेगानं धावा जमवल्या. प्रभसिमरन 25 धावा काढून बाद झाला. प्रभसिमरन यानं 2 षटकार आणि दोन चौकारांच्या मदतीने 17 चेंडूमध्ये 25 धावा जोडल्या. शिखर धवन आणि प्रभसिमरन यांनी दुसऱ्या विकेटसाठी 38 चेंडूमध्ये 55 धावांची भागिदारी केली. शिखर धवन याने त्यानंतर लिव्हिंगस्टोनसोबत डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. पण लिव्हिंगस्टोनही तंबूत परतला. लिव्हिंगस्टोन याला 17 धावांवर अल्जारी जोसेफ याने बाद केले. लिव्हिंगस्टोन यानं एक चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 17 धावा केल्या. 

शिखर धवनचं अर्धशतक हुकलं - 

शिखर धवन याचं अर्धशतक थोडक्यात हुकलं. शिखऱ धवनच्या रुपाने पंजाबला चौथा धक्का बसला.  शिखर धवन याला ग्लेन मॅक्सवेल याने विराट कोहलीकरवी झेलबाद केले. शिखर धवन यानं 37 चेंडूमद्ये 45 धावांची संयमी खेळी केली. या खेळीला एक षटकार आणि पाच चौकारांचा साज होता. धवन बाद झाल्यानंतर जितेश शर्मा आणि सॅम कर यांनी डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. पण यश दयाल यानं सॅम करन यानं सॅम करनला तंबूत पाठवलं. अनुज राव याने विकेटच्या मागे सॅम करनचा जबरदस्त झेल घेतला. सॅम करन यानं  17 चेंडूमध्ये तीन चौकारांच्या मदतीने 23 धावांचे योगदान दिले. 

पंजाबकडून फिनिशंग टच नाही - 

पंजाबला फिनिशिंग करता आले नाही. चांगल्या सुरुवातीनंतर पंजाबने ठरावीक अंतराने विकेट फेकल्या. अखेरीस जितेश शर्मा यालाही झटपट धावा करण्यात अपयश आले. मोहम्मद सिराजला मोठा फटका मारण्याचा प्रयत्नात अनुज रावतकडे झेल देत तो बाद झाला. जितेश शर्मा यानं 20 चेंडूत 27 धावांचं योगदान दिले. या खेळीत त्याने दोन षटकार आणि एक चौकार लगावला. मोहम्मद सिराजने 19 व्या षटकात फक्त चार धावा देत एक विकेट घेतली. शशांक सिंह यानं 8 चेंडूमध्ये 21 धावा करत पंजाबला सन्मानजक धावसंख्यापर्यंत पोहचवलं.  

आरसीबीची गोलंदाजी कशी राहिली ?

आरसीबीकडून मोहम्मद सिराज आणि ग्लेन मॅक्सवेल सर्वात यशस्वी गोलंदाज ठरले. दोघांनी दोन दोन विकेट घेतल्या. सिराजने चार षटकात 26 धावा खर्च करत दोन महत्वाच्या फलंदाजांना बाद केले. तर ग्लेन मॅक्सवेलने तीन षटकात 29 धावा खर्च केल्या. त्याशिवाय यश दयाल यानं 4 षटकात फक्त 23 धावा दिल्या अन् एक विकेट घेतली. 

पंजाबचे 11 किंग्स कोणते ?

शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअयरस्टो, प्रभसिमरन, सॅम करन, जितेश शर्मा (विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंह, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कगिसो रबाडा, राहुल चाहर

राखीव खेळाडू (इम्पॅक्ट) - अर्शदीप सिंह, रायली रुसो, तनय टी, हरप्रीत भाटिया 

आरसीबीचे 11 शिलेदार कोणते ? 

फाफ डु प्लिसेस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमरुन ग्रीन, दिनेश कार्तिक, अनुज रावत (विकेटकीपर), अल्जारी जोसेफ, मयांक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल

राखीव खेळाडू (इम्पॅक्ट) - सुयश प्रभुदेसाई, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, विजयकुमार वैशाख, स्वाप्निल सिंह

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : ठाकरेंकडून हिंदुत्वाचा मुद्दा दाखवण्याचा प्रयत्न, शिंदे गटाच्या नेत्याचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, शिवसेनाप्रमुखांनी ज्यांना लाथ मारली...
ठाकरेंकडून हिंदुत्वाचा मुद्दा दाखवण्याचा प्रयत्न, शिंदे गटाच्या नेत्याचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, शिवसेनाप्रमुखांनी ज्यांना लाथ मारली...
इलेक्ट्रीक पोलला धडकली बस, 28 प्रवासी जखमी; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
इलेक्ट्रीक पोलला धडकली बस, 28 प्रवासी जखमी; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
Virat Kohli : तिसऱ्या कसोटीत किंग कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'विराट' पराक्रम करणार! असा पराक्रम करणारा सचिननंतर दुसराच खेळाडू
तिसऱ्या कसोटीत किंग कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'विराट' पराक्रम करणार! असा पराक्रम करणारा सचिननंतर दुसराच खेळाडू
Navneet Rana : जनाब उद्धव ठाकरे, मोदीजींवर बोलायची तुमची लायकी नाही; नवनीत राणांचा घणाघात
जनाब उद्धव ठाकरे, मोदीजींवर बोलायची तुमची लायकी नाही; नवनीत राणांचा घणाघात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Allu Arjun get 14 Days Judicial Custody : अल्लू अर्जुनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीABP Majha Headlines : 04 PM : 13 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Superfast News : 13 December 2024 : सुपरफास्ट बातम्या : ABP MajhaPriyanka Gandhi Lok Sabha Speech : प्रियांका गांधींचं लोकसभेतील पहिलं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : ठाकरेंकडून हिंदुत्वाचा मुद्दा दाखवण्याचा प्रयत्न, शिंदे गटाच्या नेत्याचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, शिवसेनाप्रमुखांनी ज्यांना लाथ मारली...
ठाकरेंकडून हिंदुत्वाचा मुद्दा दाखवण्याचा प्रयत्न, शिंदे गटाच्या नेत्याचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, शिवसेनाप्रमुखांनी ज्यांना लाथ मारली...
इलेक्ट्रीक पोलला धडकली बस, 28 प्रवासी जखमी; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
इलेक्ट्रीक पोलला धडकली बस, 28 प्रवासी जखमी; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
Virat Kohli : तिसऱ्या कसोटीत किंग कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'विराट' पराक्रम करणार! असा पराक्रम करणारा सचिननंतर दुसराच खेळाडू
तिसऱ्या कसोटीत किंग कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'विराट' पराक्रम करणार! असा पराक्रम करणारा सचिननंतर दुसराच खेळाडू
Navneet Rana : जनाब उद्धव ठाकरे, मोदीजींवर बोलायची तुमची लायकी नाही; नवनीत राणांचा घणाघात
जनाब उद्धव ठाकरे, मोदीजींवर बोलायची तुमची लायकी नाही; नवनीत राणांचा घणाघात
मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्तार आता मुंबईऐवजी नागपुरात; समोर आलं राज'कारण'
मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्तार आता मुंबईऐवजी नागपुरात; समोर आलं राज'कारण'
... अखेर तो आरोपी डॉ. बाबासाहेबांच्या फोटोसमोर नतमस्तक; रुग्णालयातील व्हिडिओ व्हायरल
... अखेर तो आरोपी डॉ. बाबासाहेबांच्या फोटोसमोर नतमस्तक; रुग्णालयातील व्हिडिओ व्हायरल
Priyanka Gandhi : नेहरूंनी काय केले? अहो, वर्तमानाबद्दल बोला, सर्व जबाबदारी नेहरूजींची आहे का? प्रियांका गांधींचा पहिल्याच भाषणात रद्रावतार!
नेहरूंनी काय केले? अहो, वर्तमानाबद्दल बोला, सर्व जबाबदारी नेहरूजींची आहे का? प्रियांका गांधींचा पहिल्याच भाषणात रुद्रावतार!
Allu Arjun Arrest : अल्लू अर्जुनच्या बाॅडीगार्डला सुद्धा हैदराबाद पोलिसांनी उचलले; वकील तत्काळ सुनावणीसाठी न्यायालयात!
अल्लू अर्जुनच्या बाॅडीगार्डला सुद्धा हैदराबाद पोलिसांनी उचलले; वकील तत्काळ सुनावणीसाठी न्यायालयात!
Embed widget