(Source: ECI/ABP News/ABP Majha)
LSG vs RCB, IPL 2023 : आरसीबीच्या संघात हेजलवूड परतलाय, लखनौच्या संघातही बदल, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
LSG vs RCB, IPL 2023 : फाफ याने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
LSG vs RCB, IPL 2023 : आरसीबीचा नियमीत कर्णधार फाफ डु प्लेसिस याचे संघात पुनरागमन झाले आहे. फाफ याने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. खेळपट्टी पाहून दोन्ही संघामध्ये फिरकी गोलंदाजांना स्थान मिळाले आहे. आरसीबी आणि लखनौ या दोन्ही संघात काही बदल करण्यात आले आहे.
आरसीबीकडून कर्ण शर्मा याला शाहबाज अहमद याच्या जागी संधी दिली आहे. त्याशिवाय जोश हेजलवूड दुखापतीनंतर पुनरागमन केलेय. हेजलवूड परतल्यामुळे आरसीबीची गोलंदाजी भेदक झाली आहे. लखनौ संघाने तीन फिरकी गोलंदाजांना स्थान दिलेय. अमित मिश्रा, क्रृष्णप्पा गौतम, रवि बिश्नोई या फिरकी गोलंदाजांना स्थान दिलेय. त्याशिावा कृणाल पांड्या फिरकी गोलंदाजी करु शकतो. आवेश खान याला लखनौ संघाने बाहेरचा रस्ता दाखवलाय. पाहूयात दोन्ही संघाची प्लेईंग ११...
आरसीबीची प्लेईंग ११ कोणते ?
विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), सुयश प्रभुदेसाई, वानिन्दु हसरंगा, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, जोश हेजलवुड.
लखनौ सुपर जायंट्सच्या ताफ्यात कोण कोण? -
केएल राहुल (कर्णधार), काइल मेयर्स, दीपक हुड्डा, मार्कस स्टोयनिस, क्रुणाल पांड्या, निकोलस पूरन (विकेटकीपर), कृष्णप्पा गौतम, रवि बिश्नोई, नवीन उल हक, यश ठाकुर.
LSG vs RCB Head to Head : हेड टू हेड आकडेवारी पाहा
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) या दोन संघांमध्ये आतापर्यंत तीन सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये बंगळुरु (RCB) संघाचं पारड जड असल्याचं पाहायला मिळतं. आरसीबीने तीन पैकी दोन सामने जिंकले आहेत तर लखनौ (LSG) संघाला एक सामना जिंकण्यात यश मिळालं. दोन्ही संघांची सरासरी सर्वाधिक धावसंख्या 200 आहे.
Ekana Stadium Lucknow Pitch Report : इकाना खेळपट्टी कशी आहे?
भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियम (Ekana Stadium) ची खेळपट्टी टी20 च्या दृष्टीने येथील खूपच संतुलित आहे. खेळपट्टी फलंदाजीसोबतच गोलंदाजांसाठीही उपयुक्त आहे. येथे खेळल्या गेलेल्या एकूण सहा टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने पाच वेळा विजय मिळवला आहे. अशा वेळी नाणेफेक जिंकणं महत्त्वाचं ठरू शकतं. तसेच, पहिल्यांदा फलंदाजी करताना सरासरी 151 धावा होतात. या खेळपट्टीवर फिरकीपटू वर्चस्व गाजवू शकतात.