IPL 2022: आरसीबीच्या संघात मोठा बदल, जखमी सिसोदियाच्या जागी 'या' खेळाडूचा समावेश
IPL 2022, RCB: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) ने इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या उर्वरित सामन्यांसाठी जखमी लवनीथ सिसोदियाच्या जागी रजत पाटीदारला संघात जागा दिली आहे.
IPL 2022, RCB: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) ने इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या उर्वरित सामन्यांसाठी जखमी लवनीथ सिसोदियाच्या जागी रजत पाटीदारला संघात जागा दिली आहे. आरसीबीने रविवारी याबाबत माहिती जाहीर केली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्य प्रदेशचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पाटीदारने आतापर्यंत 31 टी-20 सामने खेळले असून 7 अर्धशतकांच्या मदतीने त्याच्या नावावर 861 धावा आहेत.
उजव्या हाताचा फलंदाज असलेल्या पाटीदारने चार वेळा आरसीबी संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. 20 लाख रुपयाच्या किंमतीसह तो आरसीबी संघात सामील होणार आहे. आरसीबीने या मोसमात आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत. ज्यात एक सामना जिंकला आणि एक सामन्यात पराभव पत्करावा लागला. आरसीबीचा पुढील सामना राजस्थान रॉयल्सशी 5 एप्रिलला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.
कोण आहे रजत पाटीदार?
28 वर्षीय रजत पाटीदार याआधीही आरसीबीच्या संघाचा भाग होता. आयपीएल 2021 मध्ये त्याने बंगळुरूसाठी चार सामन्यांमध्ये 71 धावा केल्या. यादरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या 31 होती. त्याच्या लिस्ट ए कारकिर्दीबद्दल सांगायचे झाले, तर त्याने 43 सामन्यांत 34.07 च्या सरासरीने 1397 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 158 धावा आहे.
संबंधित बातम्या:
-
CSK vs PBKS: ड्वेन ब्राव्होच्या नावावर आणखी एक विक्रम, 'या' गोष्टीत भुवनेश्वर कुमारला टाकलं मागे
- CSK vs PBKS: चेन्नईमधून 'या' खेळाडूला मिळाला डच्चू, पंजाबनेही दोन खेळाडूंना दाखवला बाहेरचा रस्ता
- CSK vs PBKS, IPL 2022 Live Score: पंजाबला दुसरा झटका, राजपक्षे 9 धावा करून बाद
- SRH vs RR : राजस्थान-हैदराबाद सामन्यात चहलची पत्नी धनश्रीने वेधलं साऱ्यांचं लक्ष, उत्साहात करत होती राजस्थानला चिअर
- IPL : आयपीलमध्ये गुजरात दिल्ली मॅचपेक्षा 'या' फोटोचीच होतेय चर्चा, बनवले जातायत मिम्स, काय आहे कारण?
- IPL 2022, GT vs DC : गिल-फर्गुसन विजयाचे शिल्पकार, दिल्लीचा 14 धावांनी पराभव