LSG vs KKR, IPL 2022 : कोलकात्यासमोर लखनौच्या नवाबांचे आव्हान, कोण मारणार बाजी?
LSG vs KKR, IPL 2022 : कोलकात्याचा संघ गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर आहे. तर लखनौचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे.

LSG vs KKR, IPL 2022 : शनिवारी आयपीएलचा डबल धमाका असणार आहे. दुपारी पंजाब आणि राजस्थान यांच्यात रॉयल सामना होणार आहे. तर संध्याकाळी लखनौचे नवाब कोलकात्यासोबत भिडणार आहेत. पुण्याच्या एमसीए मैदानावर सामना रंगणार आहे. कोलकात्याचा संघ गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर आहे. तर लखनौचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. लखनौचा संघ प्लेऑफमध्ये पोहचण्याच्या इराद्याने मैदानावर उतरणार आहे. तर कोलकाता संघ स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी सामना जिंकावा लागणार आहे. पुण्याच्या मैदानावर रंगणारा हा सामना रोमांचक होऊल असा अंदाज आहे.
केएल राहुल, श्रेयस अय्यर यांच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे. अय्यरकडे कोलकात्याचे तर राहुल लखनौचं नेतृत्तव करत आहे. राहुल तुफानी फॉर्मात आहे. त्याने दहा सामन्यात 451 धावा चोपल्या आहेत. यामध्ये दोन अर्धशतके आणि दोन शतकांचा समावेश आहे. श्रेयस अय्यरनेही कोलकात्यासाठी धावांचा पाऊस पाडलाय. कोलकाताकडून उमेश यादव, टीम साऊदी शिवम मावी, सुनील नारायण फॉर्मात आहे. पुण्याच्या मैदानावर दवचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाणेफेक महत्वाची ठरणार आहे.
कधी, कुठे आहे सामना?
आज 16 एप्रिल रोजी होणारा लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. सात वाजता नाणेफेक होईल. हा सामना पुण्यातील एमसीए स्टेडियम खेळवला जाणार आहे. लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज पाहाता येईल.
दोन्ही संघ पुढीलप्रमाणे आहेत..यामधून अंतिम 11 खेळाडूंची निवड होणार आहे.
कोलकाता नाइटराइडर्स: आरोन फिंच, अभिजीत तोमर, अजिंक्य रहाणे, बाबा इंद्रजीत, नीतीश राणा, प्रथम सिंह, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर (कर्णधार), अशोक शर्मा, पॅट कमिंस, रसिख डार, शिवम मावी, टिम साउदी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती, अमन खान, आंद्रे रसेल, अनुकूल रॉय, चमिका करुणारत्ने, मोहम्मद नबी, रमेश कुमार, सुनील नारायण, वेंकटेश अय्यर, सॅम बिलिंग्स, शेल्डन जैक्सन।
लखनऊ सुपर जायंट्स: केएल राहुल (कर्णधार), मनन वोहरा, एविन लुईस, मनीष पांडे, क्विंटन डिकॉक, रवि बिश्नोई, दुष्मंथा चमीरा, शाहबाज नदीम, मोहसिन खान, मयंक यादव, अंकित राजपूत, अवेश खान, एंड्रयू टाय, मार्कस स्टोइनिस। काइल मेयर्स, करण शर्मा, कृष्णप्पा गौतम, आयुष बडोनी, दीपक हुड्डा, क्रुणाल पंड्या, जेसन होल्डर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
