PBKS vs LSG IPL 2025 : सिंग इज किंग! प्रभसिमरन-अर्शदीपच्या वादळात लखनौचा पालापाचोळा, पंजाबच्या विजयानंतर पॉइंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ
PBKS vs LSG IPL 2025 Points Table : पंजाब किंग्जचा सातवा विजय, 15 गुणांसह दुसऱ्या स्थानावर, आयुष बदोनीची शानदार खेळी गेली व्यर्थ...

Punjab Kings vs Lucknow Super Giants : आयपीएल 2025 चा हंगाम शेवटच्या टप्प्यात पोहोचताना पॉइंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ पाहिला मिळत आहे. दरम्यान, आयपीएल 2025 च्या 54 व्या सामन्यात पंजाब किंग्जने लखनौ सुपर जायंट्सचा 38 धावांनी पराभव केला. या विजयासह, पंजाबचा संघ प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करण्याच्या जवळ पोहोचला आहे, तर ऋषभ पंतच्या लखनौला टॉप-4 च्या शर्यतीत राहण्याच्या संधींना मोठा धक्का बसला आहे. पंजाबचा हा 11 सामन्यांतील सातवा विजय आहे आणि ते 15 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने शानदार फॉर्म कायम ठेवत 11 पैकी 8 सामने जिंकून 16 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्स सध्या 7 विजयांसह तिसऱ्या स्थानावर आहे, त्यांचा नेट रन रेट +1.274 आहे.
Early damage & a Lasting impact 👊
— IndianPremierLeague (@IPL) May 4, 2025
Arshdeep Singh lit up the powerplay with three crushing blows that left #LSG stunned early 🔥
Describe his match-winning spell in 1️⃣ word 👇
Watch his spell ▶ https://t.co/pVdNylrGrp #TATAIPL | #PBKSvLSG | @arshdeepsinghh pic.twitter.com/dBdDHIFgHj
लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि सुरुवातीला पंजाबला धक्का दिला. सलामीवीर प्रियांश आर्य काही खास करू शकला नाही आणि 4 चेंडूत 1 धाव केल्यानंतर पहिल्याच षटकात 2 धावांवर आऊट झाला. यानंतर, जोश इंग्लिस आला आणि त्याने काही तुफानी फटके मारले आणि 14 चेंडूत 30 धावा केल्या, ज्यामध्ये एक चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. त्यानंतर प्रभसिमरन आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी सावध फलंदाजी केली.
Prabhsimran Singh powered his way to third consecutive fifty 🔥
— IndianPremierLeague (@IPL) May 4, 2025
🔽 Watch | #TATAIPL | #PBKSvLSG
श्रेयस अय्यरचे अर्धशतक तर प्रभसिमरन सिंगचे शतक हुकले...
श्रेयस अय्यरचे अर्धशतक हुकले, 25 चेंडूत 45 धावा काढून आऊट झाला. नेहल वधेराही 16 धावा करून आऊट झाला. पण, प्रभसिमरनने शानदार फलंदाजी केली, पण तसे झाले नाही आणि तो 48 चेंडूत 91 धावा करून आऊट झाला. त्याच्या खेळीत सहा चौकार आणि सात षटकारांचा समावेश होता.
Solid and Powerful 💪
— IndianPremierLeague (@IPL) May 4, 2025
Shreyas Iyer and Shashank Singh powered #PBKS to a strong finish
🔽 Watch their entertaining knocks | #TATAIPL | #PBKSvLSG
शेवटच्या षटकांमध्ये, शशांक सिंगने आपली स्फोटक शैली दाखवली आणि 15 चेंडूत 33 धावा काढत नाबाद राहिला. मार्कस स्टोइनिसनेही 5 चेंडूत 15 धावांची नाबाद खेळी केली. अशाप्रकारे पंजाब किंग्जने मोठी धावसंख्या उभारली. लखनौ सुपर जायंट्सकडून आकाश सिंग आणि दिग्वेश राठी यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
अर्शदीप सिंगचा कहर, लखनौचं सगळे स्टार फेल
237 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौची सुरुवात खूपच खराब झाली. लखनौला पहिला धक्का तिसऱ्या षटकातच बसला, जेव्हा मिचेल मार्श खातेही न उघडता आऊट झाला, अर्शदीपने त्याची शिकार केली. यानंतर, त्याच षटकात, एडन मार्कराम देखील 13 धावा करून आऊट झाला. त्याला अर्शदीपने बोल्ड केले. यानंतर, लखनौला सर्वात मोठा धक्का पाचव्या षटकात बसला जेव्हा अर्शदीपने निकोलस पूरनलाही आऊट केले. यानंतर, कर्णधार पंतकडून अपेक्षा होत्या. पण पुन्हा एकदा त्याने नाराज केले. पंतच्या बॅटमधून फक्त 18 धावा आल्या आणि त्याने त्याची विकेट फेकून दिली.
Wait… what just happened? 😲
— IndianPremierLeague (@IPL) May 4, 2025
Bat in the air, ball in the fielder’s hands... Rishabh Pant’s dismissal had it all 👌
Updates ▶ https://t.co/YuAePC273s#TATAIPL | #PBKSvLSG pic.twitter.com/Q74gb4Lpu4
पण यानंतर अब्दुल समद आणि आयुष बदोनी यांच्यात 41 चेंडूत 81 धावांची भागीदारी झाली. पण 16 व्या षटकात अब्दुल समद 45 धावा करून बाद झाला. पण आयुष बदोनी एकटा नडला. त्याने 40 चेंडूत 70 धावांची खेळी खेळली आणि शेवटच्या षटकात त्याची विकेट पडली. पण तो त्याच्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. पंजाब किंग्जने हा सामना 37 धावांनी जिंकला आणि पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचला.




















