PBKS vs MI : जसप्रीत बुमराहचा रॉकेट यॉर्कर, स्टार फलंदाजाला हालताही आलं नाही, पाहा व्हिडीओ
जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्यापुढे पंजाबचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. जसप्रीत बुमराहनं या सामन्यात रॉकेट यॉर्कर चेंडू फेकला.
Jasprit Bumrah, PBKS vs MI, IPL 2024 : पंजाबविरोधात झालेल्या रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्सनं (Mumbai indians) नऊ धावांनी विजय मिळवला. या विजयात सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांचा सिंहाचा वाटा आहे. सूर्यकुमार यादव (Surykumar Yadav) यानं वादळी फलंदाजी केली, तर जसप्रीत बुमराहनं भेदक मारा केला. जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्यापुढे पंजाबचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. जसप्रीत बुमराहनं या सामन्यात रॉकेट यॉर्कर चेंडू फेकला. हा यॉर्कर इतका परफेक्ट होता, की फलंदाजाला हालताही आले नाही. बुमराहनं त्रिफाळा उडवलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बुमराहवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
मुंबईने दिलेल्या 193 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात अतिशश निराशाजनक झाली. कर्णधार सॅम करन स्वस्तात तंबूत परतला. कर्णधार परतल्यानंतर रायली रुसो याच्यावर मोठी जबाबदारी होती. अनुभवी रायली रुसो याला पंजाबचा डाव सावरायचा होता, पण जसप्रीत बुमराहनं त्याच्या मनसुब्यावर पाणी फेरलं. जसप्रीत बुमराहने वाऱ्याच्या वेगानं यॉर्कर फेकला. नुकताच मैदानावर आलेल्या रायली रुसो याला हा घातक यॉर्कर समजलाच नाही. रुसो याला काही समजण्याच्या आतमध्ये दांड्या उडाल्या होत्या, अन् पंचांनी बाद म्हणून घोषीत केले होते. जसप्रीत बुमराहने फेकलेला यॉर्कर इतका परफेक्ट होता, की तिन्ही दांड्या तिन्ही दिशेला पडल्या होत्या. रायली रुसो फक्त एक धाव काढून बाद झालाय. रुसो यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच मैदानात उतरला होता, त्याला या सामन्यात बुमराहने स्वस्तात तंबूत धाडलं. बुमराहनं फेकलेल्या यॉर्करचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आयपीएलनं अधिकृत पेजवर जसप्रीत बुमरहाचा हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
पाहा व्हायरल होणारा व्हिडीओ -
WHAT. A. BALL! 🎯
— IndianPremierLeague (@IPL) April 18, 2024
That's a beaut of a delivery from @Jaspritbumrah93 to dismiss Rilee Rossouw ☝️
Watch the match LIVE on @StarSportsIndia and @JioCinema 💻📱#TATAIPL | #PBKSvMI pic.twitter.com/Lqk4vxUuss
बुमराहचा भेदक मारा -
पंजाबविरोधात जसप्रीत बुमराहनं अचूक टप्प्यावर भेदक मारा केला. जसप्रीत बुमराहच्या माऱ्यापुढे पंजाबच्या फलंदाजांची दाणादाण उडाली होती. जसप्रीत बुमराहने चार षटकात फक्त 21 धावा खर्च करत तीन फलंदाजांना तंबूत पाठवलं. जसप्रीत बुमराहनं विकेट तर घेतल्याही पण पंजाबच्या डावाची धावगतीही रोखली.
जसप्रीत बुमराहकडे पर्पल कॅप -
पंजाबविरोधात तीन विकेट घेताच जसप्रीत बुमराहने पर्पल कॅपवर कब्जा मिळवलाय. जसप्रीत बुमराहने सात सामन्यात 13 विकेट घेण्याचा पराक्रम केलाय. युजवेंद्र चहल 12 विकेटसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर गेराल्ड कोइत्जेही 12 विकेटसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
आणखी वाचा :
अजिंक्यनं वाढवलं चेन्नईचं टेन्शन, लखनौविरोधात ऋतुराज मोठा निर्णय घेणार?
VIDEO : हिटमॅन रोहित शर्मानं मुंबईचं नेतृत्व संभाळलं, अखेरच्या षटकात हार्दिक फक्त पाहातच राहिला
100 टक्के फिट नसतानाही IPL खेळतोय, सूर्याचं फिटनेस अपडेट समोर