IPL 2025 Playoffs News : बंगळुरू बाहेर जाणार,तर मुंबई इंडियन्सचं काय होणार? प्लेऑफमध्ये 'हे' चार संघ थाटात एन्ट्री मारणार, थांबवणे अशक्य; कोणी केली भविष्यवाणी?
इंडियन प्रीमियर लीग 2025 या हंगामातील 44 सामने पूर्ण झाले आहेत. या हंगामात कोणते संघ प्लेऑफमध्ये पोहोचतील हे पाहिले तर चित्र पूर्णपणे स्पष्ट नाही.

IPL 2025 Playoffs Qualification News : इंडियन प्रीमियर लीग 2025 या हंगामातील 44 सामने पूर्ण झाले आहेत. या हंगामात कोणते संघ प्लेऑफमध्ये पोहोचतील हे पाहिले तर चित्र पूर्णपणे स्पष्ट नाही, कारण कोणत्याही संघाचा विजय किंवा पराभव संपूर्ण समीकरण बिघडू शकतो. पण, कोणते संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकतात याबद्दल क्रिकेट तज्ज्ञांनी आपले मत देण्यास सुरुवात केली आहे. या हंगामात समालोचन पॅनेलचा भाग असलेले माजी भारतीय फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे यांनीही कोणता संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे याबद्दल भाष्य केले.
अंतिम चारमध्ये म्हणजेच प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी शर्यत सुरू झाली आहे. अनिल कुंबळेने गुजरात टायटन्सला (Gujarat Titans) प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी प्रबळ दावेदारांच्या यादीत अव्वल स्थान दिले आहे. गुजरात टायटन्सने या हंगामाची सुरुवात पराभवाने केली असली तरी, त्यानंतर संघाने जबरदस्त पुनरागमन केले आणि 8 पैकी 6 विजयांसह 12 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. कुंबळेने दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) गुजरात टायटन्सनंतर दुसऱ्या स्थानावर ठेवले आहे. दिल्लीनेही 8 पैकी 6 सामने जिंकले आहेत, परंतु धावगतीच्या बाबतीत ते गुजरातपेक्षा कमी आहे, त्यामुळे ते पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.
बंगळुरू बाहेर जाणार,तर मुंबई इंडियन्सचं काय होणार?
अनिल कुंबळेने मुंबई इंडियन्सबाबत (Mumbai Indians) सर्वात आश्चर्यकारक भाकित केले आहे. हंगामाच्या सुरुवातीला मुंबई संघ खूपच मागे पडला होता, परंतु संघाने जोरदार पुनरागमन केले आहे आणि 10 गुण मिळवले आहेत. मुंबईचे अजूनही एकूण 5 सामने बाकी आहेत. अशा परिस्थितीत, जर तिने तीन सामने जिंकले तर तिचा प्लेऑफमधील प्रवेश निश्चित होईल. अशाप्रकारे, अनिल कुंबळेने मुंबई इंडियन्सला त्याच्या यादीत तिसऱ्या स्थानावर ठेवले आहे.
कुंबळेने पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) यांना चौथा संघ म्हणून नाव दिले आहे. या हंगामात पंजाब आणि आरसीबी दोघांचीही कामगिरी जवळजवळ सारखीच राहिली आहे. पण, पंजाब आरसीबीपेक्षा जरा भारी दिसतोय. पण जर त्याने आपली लय गमावली तर ते त्यांच्यासाठी खराब होईल. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू बाहेर पण जाऊ शकतात. पण त्यांना असेही वाटत आहे की, पंजाब बाहेर गेला तर कुंबळेने आरसीबीला चौथा संघ म्हणून कायम ठेवले आहे.
हे ही वाचा -





















