एक्स्प्लोर

Mumbai Indians: मुंबई इंडियन्समध्ये फुट पडल्याची चर्चा; हार्दिकच्या गटात इशान किशन, रोहितच्या गटात कोण?

Mumbai Indians Vs Sunrisers Hyderabad 2024: रोहित शर्माला कर्णधारपदावरुन हटवल्यानंतर रोहित शर्माचे चाहते नाराज असल्याचे पाहायला मिळाले. मुंबईच्या गेल्या दोन सामन्यातही हे दिसून आले. 

Mumbai Indians Vs Sunrisers Hyderabad 2024:  तब्बल 38 षटकार आणि 31 चौकारांचा पाऊस पडलेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने आपला यंदाचा पहिला विजय मिळवताना मुंबई इंडियन्सचा 31 धावांनी पराभव केला. हैदराबादने आयपीएलमधील सर्वोत्तम धावसंख्येचा विक्रम रचताना 20 षटकांत 3 बाद 277 धावा केल्या. यानंतर त्यांनी मुंबईला 20 षटकांत 5 बाद 246 धावांवर रोखले. हैदराबादकडून स्फोटक अर्धशतक झळकावलेला अभिषेक शर्मा सामनावीर ठरला.

आयपीएल 2024 चं हंगाम सुरु होण्याआधी मुंबई इंडियन्सने मोठा निर्णय घेतला. मुंबईच्या टीम मॅनेजमेंटनं गुजरात टायटन्सच्या संघातून हार्दिक पांड्याला आपल्या संघात परत घेतलं. हार्दिक पांड्याला संघात घेताना त्याला मुंबईचं कर्णधारपद देण्यात आलं. मुंबईचं कर्णधारपद 2013 ते 2023 पर्यंत रोहित शर्माकडे होते. रोहित शर्माला कर्णधारपदावरुन हटवल्यानंतर रोहित शर्माचे चाहते नाराज असल्याचे पाहायला मिळाले. मुंबईच्या गेल्या दोन सामन्यातही हे दिसून आले. 

मुंबईचा पहिला सामना नरेंद्र मोदी मैदानावर गुजरातविरुद्ध झाला. यावेळी रोहित शर्माच्या चाहत्यांनी मैदान गाजवत हार्दिक पांड्याला डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दुसरा सामना हैदराबाद येथे सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झाला. एस.मानसिंग मैदानावर देखील उपस्थित चाहत्यांनी 'मुंबईचा राजा रोहित शर्मा' अशा घोषणा दिल्या. याचदरम्यान मुंबईच्या संघातून एक मोठी माहिती समोर येत आहे. मुंबईच्या संघात दोन गट पडल्याचे सांगण्यात येत आहे. एक गटात रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि तिलक वर्मा आणि इतर खेळाडूंचा समावेश असून दुसऱ्या गटात हार्दिक पांड्या आणि इशान किशन आणि इतर खेळाडूंचा समावेश असल्याची चर्चा रंगली आहे. अद्याप अधिकृत कोणतीही माहिती समोर आली नसली तर मुंबई इंडियन्सच्या संघात दोन गट पडल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे.

रोहित शर्मा आणि आकाश अंबानी यांची भेट

मुंबई इंडियन्सनच्या गुजरात टायटन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्या विरोधातील पराभवानंतर संघाचे मालक असलेल्या अंबानी परिवारातील आकाश अंबानी यांनी रोहित शर्माची भेट घेतली आहे. रोहित शर्मा आणि आकाश अंबानी यांच्यात  राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर चर्चा सुरु असल्याचं पाहायला मिळालं. 

संबंधित बातम्या:

Kavya Maran: हसताना, रागवताना काव्या मारनला तुम्ही पाहिलं...पण तिचा डान्स बघितला का?, पाहा Video

RR Vs DC Dream11 prediction: जैस्वाल, बटलर, वॉर्नर, कोणाला बनवाल कर्णधार?; 11 खेळाडूंची परफेक्ट टीम, तुम्हाला करेल मालामाल

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget