मुंबईने नाणेफेक जिंकली, लखनौची प्रथम फलंदाजी, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
LSG vs MI, IPL 2023 : मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय.
LSG vs MI, IPL 2023 : मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. घरच्या स्टेडिअमवर लखनौचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. मुंबई आणि लखनौ दोन्ही संघासाठी आजचा सामना महत्वाचा आहे. क्वालिफायर 1 मध्ये पोहचण्यासाठी मुंबईला विजय मिळावा लागेल. तर प्लेऑफच्या तिकिटासाठी लखनौ मैदानात उतरणार आहे. दोन्ही संघात महत्वाचे बदल करण्यात आले आहेत.
लखनौच्या संघात महत्वाचे दोन बदल करण्यात आले आहेत. लखनौने विस्फोटक सलमी फलंदाज कायल मायर्स आणि आवेश खान यांना प्लेईंग 11 मधून वगळले आहे. त्यांच्याजागी नवीन उल हक आणि दीपक हुड्डा यांना संधी दिली आहे. तर मुंबईच्या संघातही एक बदल केलाय. पाहूयात दोन्ही संघाची प्लेईंग 11
लखनौ सुपर जायंट्स - क्विंटन डिकॉक (विकेटकिपर ), मार्कस स्टॉयनिस, निकोलस पूरन, प्रेरक मंकड, आयुष बडोनी, कृणाल पांड्या (कर्णधार), दीपक हुड्डा, आर. बिश्नोई, स्वप्निल सिंह, मोसीन खान, नवीन उल हक
Lucknow Super Giants : Q de Kock (wk), M Stoinis, N Pooran, P Mankad, A Badoni, K Pandya (c), D Hooda, R Bishnoi, S Singh, M Khan, Naveen-ul-Haq
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, (विकेटकिपर), कॅमरुन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टिम डेविड, नेहल वढेरा, हर्तिक शौकिन, आकाश माधवाल, पीयूष चावला, जेसन बेहरनड्रॉफ, ख्रिस जॉर्डन
Mumbai Indians XI: R Sharma (capt), I Kishan (wk), C Green, S Yadav, T David, N Wadhera, H Shokeen, A Madhwal, P Chawla, J Behrendorff, C Jordan
The Playing XIs are IN ‼️
— IndianPremierLeague (@IPL) May 16, 2023
What do you make of the two sides?
Follow the match ▶️ https://t.co/yxOTeCROIh #TATAIPL | #LSGvMI pic.twitter.com/9P4rCMqg5B
हेड टू हेड
आजचा सामना लखनौ सुपर जायंट्सचं होम ग्राउंड असलेल्या एकना स्टेडियमवर होणार आहे. लखनौचा संघ सध्या पॉईंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे. त्यांनी आतापर्यंत 12 सामन्यांपैकी 6 सामने जिंकले आहेत, तर 5 सामने गमावले आहेत, 1 सामना अनिर्णित राहिला आहे, ज्यामुळे त्यांचे 13 गुण आहेत. आणि लखनौच्या वर म्हणजे, मुंबई इंडियन्स आहे, ज्यांनी 12 सामन्यांत 7 सामने जिंकले आहेत, 5 सामने गमावले आहेत आणि 14 गुण आहेत. जर लखनौनं मुंबईला पराभूत केलं तर त्यांचे 15 गुण होतील आणि ते तिसऱ्या क्रमांकावर येतील. पण जर मुंबई जिंकली तर त्यांचे 16 गुण होतील आणि ते चेन्नईला तिसर्या स्थानावर नेऊन दुसऱ्या स्थानावर विराजमान होईल.
लखनौमध्ये दोन्ही संघ पहिल्यांदाच भिडणार
लखनौच्या एकना स्टेडियमवर पहिल्यांदाच दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. या दोघांमध्ये आतापर्यंत फक्त मुंबईतच सामने झाले आहेत. अशा स्थितीत आज लखनौला घरच्या मैदानाचा फायदा घेता येईल. लखनौनं आजचा सामना गमावला तर ते प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर होतील. त्याचवेळी सामना गमावल्यानंतरही मुंबईला संधी असेल. आता आज कोणता संघ बाजी मारतो हे पाहणे उत्सुकतेचं ठरणार आहे.