IPL 2023 : धोनीसोबत गंभीर तेव्हा अहंकाराने क्रिकेट खेळला, माजी खेळाडूचे मोठे वक्तव्य
IPL 2023 : विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वादाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
IPL 2023 : विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वादाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. माजी क्रिकेटपटूंसह नेटकरी याबाबत आपले मत व्यक्त करत आहेत. काहींच्या मते गौतम गंभीर बरोबर आहे तर काहींनी विराट कोहलीला सपोर्ट केला आहे. क्रिकेट चाहते दोन गटात विभागले गेले आहेत. पण गंभीर याने फक्त कोहलीबरोबरच दोन हात केले नाहीत.. त्याचे इतर खेळाडूसोबतही वाद झालेत.
क्रिकेट तज्ज्ञांच्या मते, गौतम गंभीर आणि माजी कर्णधार एमएस धोनी यांच्यात 36 चा आकडा आहे. याच मुद्द्यावर बोलताना भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण याने मोठे विधान केले. इरफान म्हणाला की, गौतम गंभीरने धोनीसोबत एकदा अहंकाराने क्रिकेट खेळले होते. लखनौ आणि चेन्नई यांच्यात इकाना स्टेडिअमवर सामना झाला होता. या सामन्यावेळी धोनी आणि गंभीर आमने सामने आले होते. तर दुसरीकडे या सामन्यादरम्यान स्टार स्पोर्ट्ससाठी समालोचन करणारा माजी भारतीय अष्टपैलू आणि T20 विश्वचषक विजेता इरफान पठाण याने मोठे वक्तव्य केले. तो म्हणाला, धोनी जबरदस्त फिनिशर आहेच... त्यासोबत तो शांत आणि स्थिर राहतो. पण गंभीरच्या रणनितीने धोनीला त्रास झाला होता.
इरफान म्हणाला की,
2016 मध्ये गंभीर केकेआरचा कर्णधार होता आणि त्यावेळी तो धोनीसोबत उद्धटपणे आणि अहंकाराने क्रिकेट खेळला होता. गंभीरनेच धोनीला अडचणीत आणले. जसजशी वर्षे सरत गेली तसतशी धोनी फिरकीच्या विरोधात थोडा संवेदनशील झाला होता आणि गंभीरला ते माहीत होते.
2016 मध्ये कोलकाता आणि पुणे या संघादरम्यान सामना झाला होता. धोनी पुणे संघाकडून खेळत होता. धोनी फलंदाजीसाठी मैदानार आला त्यावेळी पुणे संघाने 74 धावांमध्ये 4 विकेट गमावल्या होत्या. कोलकात्याचा पीयूष चावला चांगल्या फॉर्ममध्ये होता. धोनी क्रिजवर आल्यानंतर गंभीरने कसोटी सामन्याप्रमाणे फिल्डिंग लावली होती. गंभीरने शाकिब अल हसन, सूर्यकुमार यादव आणि युसूफ पठाण यांना स्लीपमध्ये फिल्डिंगला लावले होते. गंभीरला धोनीला कोणताही संधी द्यायची नव्हती. यादरम्यान धोनी फलंदाजी करताना असुरक्षित दिसत होता.
दरम्यान, 2016 मध्ये इरफान पठाण धोनीच्या नेतृत्वाखालील रायझिंग पुणे सुपरजायंट्सचा एक भाग होता. जेव्हा स्पॉट फिक्सिंगमुळे चेन्नई सुपर किंग्जवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. तेव्हा धोनी पुणे संघाचा सदस्य होता.