Dhoni Angry Moment : सामन्यात दिसलं 'कॅप्टन कुल'चं रौद्ररुप; भरमैदानात भडकला धोनी, अन्...
MS Dhoni Angry During CSK vs RR Match : राजस्थान विरोधातील सामन्यामध्ये धोनीचा कधीही न पाहिलेला रौद्र अवतार पाहायला मिळाला. धोनी चेन्नई संघातील खेळाडूच्या चुकीमुळे त्याच्यावर भरमैदानातच भडकल्याचं दिसून आलं.
MS Dhoni Angry Rare Moment : आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये 37 व्या सामन्यात चेन्नई (CSK) संघाला राजस्थान (RR) संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला. राजस्थाननं चेन्नई संघांवर 32 धावांनी विजय मिळवला. चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी त्यांच्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो. अगदी दडपण असो किंवा उत्साह धोनी शांत डोक्यानं खेळताना दिसतो म्हणूनच त्याला कॅप्टन कूल असंही म्हटलं जातं. दरम्यान, राजस्थान विरोधातील सामन्यामध्ये धोनीचा कधीही न पाहिलेला रौद्र अवतार पाहायला मिळाला. धोनी चेन्नई संघातील खेळाडूच्या चुकीमुळे त्याच्यावर भरमैदानातच भडकल्याचं दिसून आलं.
सामन्यात दिसलं 'कॅप्टन कुल'चं रौद्ररुप
राजस्थान रॉयल्स सामन्यादरम्यान चेन्नई संघाच्या खेळाडूकडून एक चूक झाली, यामुळे चेन्नई संघाचा कर्णधार धोनीन भडकल्याचं दिसून आलं. नेहमी कोणत्याही परिस्थितीमध्ये शांत राहणाऱ्या धोनी असा अवतार पाहणं फारच कठीण असतं कारण, प्रचंड दबावाखाली खेळताना धोनी शांत डोक्याने खेळतो. मग ते आव्हानाचा पाठलाग करताना का असो. पण धोनी कायम मैदानावर 'कुल' अवतारातच दिसून येतो. दरम्यान, राजस्थान विरोधातील सामन्यामध्ये चेन्नई संघाचा खेळाडू महिशा पथिराना याकडून एक चूक झाली यामुळे धोनी त्याच्यावर भरमैदानातच भडकल्याचं पाहायला मिळालं.
One of the rare scenes! pic.twitter.com/9YxcApw4R4
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 27, 2023
भरमैदानात खेळाडूंवर भडकला धोनी
राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजी वेळी सोळाव्या षटकात धोनीने नॉन-स्ट्रायवर असणाऱ्या फलंदाजाला डायरेक्ट हिट करून बाद करण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी खेळपट्टीपासून काही अंतरावर असलेला गोलंदाज मथीशा पाथिरानामधे आल्यामुळे धोनीचा डायरेक्ट हिट चेंडू चुकून अडवला गेला. चेंडू महिशा पाथिरानावर आदळला आणि स्टंपवर आदळण्याऐवजी चेंडूची दिशा बदलली गेली. यामुळे तेवढ्यात फलंदाज सहज क्रिज पोहोचला आणि धोनीचा डायरेक्ट हिट फोल ठरला. यावेळी महेंद्र सिंह धोनी पथिरानावर भडकला.
शिवम दुबेच्या चुकीच्या थ्रोवरही संतापला धोनी
शिवम दुबेच्या चुकीच्या थ्रोवर धोनी संतापल्याचं पाहायला मिळालं. सामन्यातील शेवटच्या चेंडूवर राजस्थानचा फलंदाज देवदत्त पडिकलने लेग साइडवर शॉर्ट मारला. शिवम दुबेकडे चेंडू गेला, त्याने चेंडू अडवला आणि तो धोनीच्या दिशेने फेकला, पण थ्रो खेळपट्टीच्या मध्यभागी पडला. या चुकीच्या थ्रोवर धोनी संतापला. थ्रो स्टॅम्पचा दिशेने आला असता तर चेन्नईला आणखी एक विकेट मिळाली असती.
राजस्थानकडून चेन्नईचा 32 धावांनी पराभव
आयपीएल 2023 (IPL 2023) मधील 37 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स (RR) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) या दोन संघात लढत पाहायला मिळाली. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या या रोमांचक सामन्यात चेन्नईला राजस्थानकडून पराभवाचा सामना करावा लागला. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना आरआरने 20 षटकांत 5 गडी गमावून 202 धावा केल्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या :