एक्स्प्लोर

Video : धनंजय मुंडेंच्या परळीत राडा, तीन मतदान केंद्रावर तासभर थांबलं मतदान; ईव्हीएमची तोडफोड

मतदानकेंद्रावरील मतदान यंत्रांची तोडफोड झाल्यामुळे प्रशासनाकडून पोलिसाला पाचारण करण्यात आले आहे. परळीत या राड्यामुळे काही काळ तणाव निर्माण झालं होतं.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्र विधानसभेच्या परळी मतदारसंघात बोगस मतदानावरून मोठा राडा झाल्याचं समोर आलं आहे. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते माधव जाधव यांना मतदार केंद्रावर जात  मारहाण केल्यानंतर त्याचे पडसाद इतर मतदार केंद्रावरही होत आहेत. बीडमधील परळी मतदारसंघात तीन मतदानकेंद्रावर तासभर मतदान थांबवण्यात आले होते. घाटनांदुरमध्ये मतदान केंद्रात झालेल्या तोडफोडीनंतर त्या तीन मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया थांबवण्यात आली होती. मतदानकेंद्रावरील मतदान यंत्रांची तोडफोड झाल्यामुळे प्रशासनाकडून पोलिसाला पाचारण करण्यात आले आहे. परळीत या राड्यामुळे काही काळ तणाव निर्माण झालं होतं. आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सुत्रांनी सांगितलं. घाटनांदूर मतदान केंद्रात तासाभरानंतर वातावरण निवळल्यानं पुन्हा सुरळीत मतदान सुरु झाले आहे.

EVM ची तोडफोड

बोगस मतदानावरून झालेल्या वादात शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते माधव जाधव यांना मारहाण करण्यात आली. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याचे पडसाद परळीत त्यांच्या घाटनांदूरच्या मतदान केंद्रांवर तणाव दिसला. घाटनांदूरच्या तीन मतदान केंद्रांवर इव्हीएम मशीनची तोडफोड करण्यात आली. मतदानकेंद्रातील खूर्च्यांची फेकाफेकी झाल्याचंही दिसून आलं. 

कशामुळे झाला राडा?

परळी मतदारसंघात बोगस मतदान होत असल्याची तक्रार शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी केली आहे. याच दरम्यान परळी शहरातील बँक कॉलनी परिसरामध्ये असलेल्या मतदान केंद्रावर उमेदवार मतदान केंद्रातील माहिती घेत असताना ऍडव्होकेट माधव जाधव यांना तीन ते चार जणांनी मारहाण केली आहे. असा एक व्हिडिओ सध्या पुढे आल्याचे बघायला मिळत आहे. मतदान केंद्राबाहेर उभे असताना ऍड. माधव जाधव यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. जाधव हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आहेत.

प्रमुख उमेदवारांना सुरक्षा देण्यासाठी धनंजय मुंडेंचे पत्र

राज्यात विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडत असून, त्या अनुषंगाने परळी विधानसभेचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी परळीतील सर्व प्रमुख उमेदवारांना पोलीस संरक्षण आणि शासकीय कॅमेरा सर्व्हेलन्स देण्यात यावे, अशी आगळी वेगळी मागणी पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. 
परळीतील प्रत्येक निवडणूक अत्यंत शांततेत पार पडते, मात्र मागील काही वर्षांचा अनुभव पाहता काही उमेदवार व कार्यकर्ते आम्हाला अडवणूक झाली, मारहाण झाली, हल्ला झाला, अशा स्वरूपाच्या अफवा पसरवून संभ्रम निर्माण करत असतात. त्यात काहीच तथ्य नसते, परंतु त्यातून परळी व पर्यायाने बीड जिल्ह्याची बदनामी होते, त्यामुळे सर्वच प्रमुख उमेदवारांसाठी पोलीस संरक्षण व कॅमेरा सर्व्हेलन्स देण्यात यावे, असे धनंजय मुंडे यांनी आपल्या पत्रात म्हटले होते. 

हेही वाचा:

Maharashtra Assembly Election Voting 2024: परळी विधानसभा मतदारसंघात जोरदार राडा, शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला मारहाण

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget