कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
काही पॉईंटचा फरक सोडल्यास कोल्हापूर उत्तर आणि दक्षिणमधील मतांची आकडेवारी समान पातळीवर दिसून येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात दुपारी एकपर्यंत 38.56 टक्के मतदान झालं आहे.
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये (Kolhapur District Assembly Constituency) सकाळी सात वाजल्यापासून विधानसभा निवडणुकीसाठी चुरशीने मतदान सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये करवीर विधानसभा मतदारसंघांमध्ये दुपारी एक वाजेपर्यंत सर्वाधिक 45.29 टक्के मतदान पार पडलं आहे. दुसरीकडे कोल्हापूर उत्तर आणि दक्षिणमध्ये समान पातळीवर मतदान होत असून तुलनेमध्ये कमी मतदान झालं आहे. कोल्हापूर दक्षिणमध्ये आतापर्यंत 35.15 टक्के मतदान झालं आहे, तर कोल्हापूर उत्तरमध्ये 35.53 टक्के मतदान झालं आहे. त्यामुळे काही पॉईंटचा फरक सोडल्यास कोल्हापूर उत्तर आणि दक्षिणमधील मतांची आकडेवारी समान पातळीवर दिसून येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात दुपारी एकपर्यंत 38.56 टक्के मतदान झालं आहे.
करवीर तालुक्यात सर्वाधिक मतदान
दरम्यान सर्वाधिक चुरस असलेल्या कागल विधानसभा मतदारसंघांमध्ये 41.36 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. राधानगरी मतदारसंघांमध्ये 42.82 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. चंदगड विधानसभेला सुद्धा 39.19 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. दुसरीकडे, हातकणंगले मतदारसंघांमध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी कमी होती. मात्र, 11 ते 1 या दोन तासांमध्ये मतदानाचा आकडा सुधारला आहे. हातकणंगलेमध्ये दुपारी एक वाजेपर्यंत 35.15 टक्के मतदान झालं आहे. दुसरीकडे, इचलकरंजीमध्ये 32.79 टक्के मतदान झालं असून शिरोळमध्ये 37.3 टक्के मतदान झालं आहे.
सांगली जिल्ह्यात 1 वाजेपर्यंत 33.50 टक्के मतदान
- मिरज - 30.83 %
- सांगली - 32.23 %
- इस्लामपूर - 39.02 %
- शिराळा - 37.82 %
- पलूस - कडेगाव - 31.59 %
- खानापूर - 31.59 %
- तासगाव कवठेमहांकाळ - 33.51 %
- जत - 30.78 %
सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत 6 तासांची विधानसभा मतदार संघानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे
- चंदगड – 39.19 टक्के
- राधानगरी – 42.82 टक्के
- कागल – 41.36 टक्के
- कोल्हापूर दक्षिण – 35.15 टक्के
- करवीर – 45.29 टक्के
- कोल्हापूर उत्तर – 35.53 टक्के
- शाहूवाडी – 41.30 टक्के
- हातकणगंले – 35.15 टक्के
- इचलकरंजी – 32.79 टक्के
- शिरोळ – 37.03 टक्के
दरम्यान, सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा मतदानाचा जोर असून दुपारी एक वाजेपर्यंत 33.50 टक्के मतदान पार पडलं आहे. सांगली जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मतदान इस्लामपूर विधानसभेला झालं असून त्या ठिकाणी एकेन 39.2% मतदान झालं आहे. विश्वजीत कदम यांच्या पलूस कडेगाव मतदारसंघांमध्ये 31.59 टक्के मतदान झालं आहे. राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या तासगाव मतदारसंघांमध्ये 33.51 टक्के मतदान झालं आहे.
राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे:
- अहमदनगर - ३२.९० टक्के
- अकोला - २९.८७ टक्के,
- अमरावती - ३१.३२ टक्के,
- औरंगाबाद- ३३.८९ टक्के,
- बीड - ३२.५८ टक्के,
- भंडारा- ३५.०६ टक्के,
- बुलढाणा- ३२.९१ टक्के,
- चंद्रपूर- ३५.५४ टक्के,
- धुळे - ३४.०५ टक्के,
- गडचिरोली-५०.८९ टक्के,
- गोंदिया - ४०.४६ टक्के,
- हिंगोली -३५.९७ टक्के,
- जळगाव - २७.८८ टक्के,
- जालना- ३६.४२ टक्के,
- कोल्हापूर- ३८.५६ टक्के,
- लातूर _ ३३.२७ टक्के,
- मुंबई शहर- २७.७३ टक्के,
- मुंबई उपनगर- ३०.४३ टक्के,
- नागपूर - ३१.६५ टक्के,
- नांदेड - २८.१५ टक्के,
- नंदुरबार- ३७.४० टक्के,
- नाशिक - ३२.३० टक्के,
- उस्मानाबाद- ३१.७५ टक्के,
- पालघर-३३.४० टक्के,
- परभणी-३३.१२टक्के,
- पुणे - २९.०३ टक्के,
- रायगड - ३४.८४ टक्के,
- रत्नागिरी-३८.५२ टक्के,
- सांगली - ३३.५० टक्के,
- सातारा -३४.७८ टक्के,
- सिंधुदुर्ग - ३८.३४ टक्के,
- सोलापूर - २९.४४,
- ठाणे -२८.३५ टक्के,
- वर्धा - ३४.५५ टक्के,
- वाशिम - २९.३१ टक्के,
- यवतमाळ -३४.१० टक्के मतदान झाले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या