मोहित शर्माच्या नावावर लाजीरवाणा विक्रम, IPL च्या इतिहासातील सर्वात महागडा गोलंदाज
IPL History : दिल्लीच्या फलंदाजांनी गुजरातच्या गोलंदाजीच्या चिंधड्या उडवल्या. गुजरातचा डेथ ओव्हर स्पेशालिस्ट मोहित शर्मा आज महागडा ठरला.
![मोहित शर्माच्या नावावर लाजीरवाणा विक्रम, IPL च्या इतिहासातील सर्वात महागडा गोलंदाज most expensive spell in ipl history mohit sharma basil thampi yash dayal reece topley here know stats मोहित शर्माच्या नावावर लाजीरवाणा विक्रम, IPL च्या इतिहासातील सर्वात महागडा गोलंदाज](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/24/b6adf346154d2a8dc0b48efb8a63ce2a1713978590769265_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Most Expensive Spell In IPL History : दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 224 धावांचा डोंगर उभारला. दिल्लीकडून ऋषभ पंत आणि अक्षर पटेल यांनी शानदार अर्धशतक ठोकली. दिल्लीच्या फलंदाजांनी गुजरातच्या गोलंदाजीच्या चिंधड्या उडवल्या. गुजरातचा डेथ ओव्हर स्पेशालिस्ट मोहित शर्मा आज महागडा ठरला. मोहित शर्माच्या नावावर लाजीरवाण्या विक्रमाची नोंद झाली. मोहित शर्मानं चार षटकात तब्बल 73 धावा खर्च केल्या. आयपीएलच्या इतिहासातील हा सर्वात महागडा स्पेल ठरलाय. याआधी हा विक्रम बसील थंपी याच्या नावावर होता. ऋषभ पंत यानं मोहित शर्माच्या अखेरच्या षटकात तब्बल 31 धावा वसूल केल्या.
दिल्लीविरोधात मोहित शर्माची गोलंदाजी साधारण राहिली. ऋषभ पंत आणि अक्षर पटेल यांनी मोहित शर्माची गोलंदाजी फोडून काढली. मोहित शर्माच्या चार षटकांमध्ये दिल्लीने तब्बल 73 धावा वसूल केल्या. ही आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडी गोलंदाजी ठरली. याआधी हा विक्रम बसील थंपी याच्या नावावर होता. आरसीबीविरोधात 2018 मध्ये बसील थंपी यानं चार षटकात 70 धावा खर्च केल्या होत्या. आता हा लाजीरवाणा रेकॉर्ड मोहित शर्माच्या नावावर जमा झालाय.
मोहित शर्माची महागडी गोलंदाजी -
मोहित शर्मानं दिल्लीविरोधात 24 चेंडूमध्ये तब्बल 73 धावा खर्च केल्या. ऋषभ पंत यानं अखेरच्या षटकात तब्बल 31 धावा कुटल्या. मोहित शर्मानं चार षटकांमध्ये 18.25 च्या इकॉनॉमीनं धावा कर्च केल्या. मोहित शर्माच्या चार षटकांमध्ये दिल्लीने सात षटकार ठोकले, त्याशिवाय चार खणखणीत चौकारही लगावले. मोहित शर्माच्या विकेटची पाटी कोरीच राहिली.
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा देणारे गोलंदाज -
चार षटकांमध्ये सर्वाधिक धावा देण्याचा लाजीरवाणा विक्रम मोहित शर्माच्या नावावर जमा झालाय. या यादीत आता बसील थंपी दुसऱ्या क्रमांक घसरलाय. थंपीने चार षटकात 70 धावा दिल्या. तिसऱ्या क्रमांकावर यश दयाल याचा क्रमांक आहे. 2023 मध्ये कोलकात्याविरोधात यश दयाल यानं चार षटकात 69 धावा खर्च केल्या होत्या. या सामन्यात रिंकू सिंह यानं यश दयाल याला अखेरच्या पाच चेंडूवर पाच षटकार ठोकले होते. चौथ्या क्रमांकावर आरसीबीचा रीस टोप्ली याचा क्रमांक लागतो, त्यानं चार षटकात 68 धावा खर्च केल्या होत्या.
मोहित शर्माची कामगिरी कशी राहिली ?
मोहित शर्मानं गुजरातसाठी यंदा शानदार कामगिरी केली आहे. गुजरातकडून सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे. मोहित शर्मानं नऊ सामन्यात दहा विकेट घेतल्या आहेत. मोहित शर्मानं 31 षटकामध्ये 321 धावा खर्च केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)