IPL 2023 : भरमैदानात हार्दिक पांड्यानं 'या' खेळाडूला केलं किस! उपस्थितही चकित, सामन्याआधीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल
GT vs PBKS Controversy : आयपीएल 2023 मधील गुजरात विरुद्ध पंजाब सामन्या दरम्यानचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये हार्दिक पांड्या एका खेळाडूला किस करताना दिसत आहे.
Hardik Pandya Kiss Shikhar Dhawan : आयपीएल 2023 (IPL 2023) च्या 18 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने (GT) पंजाब किंग्स (PBSK) वर 6 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. गुजरातला 2 चेंडूत 4 धावांची गरज असताना तेवतियाने चौकार ठोकत गुजरातला विजय मिळवून दिला. या सामन्यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी नाणेफेकीपूर्वी चाहत्यांना मैदानावर एक रंजक दृश्य पाहायला मिळालं. गुजरात संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याने भरमैदानात एक खेळाडूला किस केलं. याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भरमैदानात हार्दिक पांड्यानं 'या' खेळाडूला केलं किस
सामन्यापूर्वी हार्दिक पांड्याने एका खेळाडूला भरमैदानात सर्वांसमोरच किस केलं. त्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दरम्यान, पांड्याने ज्याला किस केलं तो खेळाडू दुसरा कोणी नसून टीम इंडियाचा अनुभवी सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) आहे. धवन सध्या आयपीएलच्या चालू हंगामात पंजाब किंग्स संघाचे नेतृत्व करत आहे. दोन्ही संघांचे कर्णधार मैदानावर असताना नाणेफेक होण्याआधी हार्दिक पांड्याने पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवनला किस केलं. यावेळी हा फोटो काढण्यात आला. सोशल मीडियावर यूजर्सने या फोटोवर वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलंय, 'काय बंधुप्रेम आहे.' आणखी एका युजरनं लिहिलं आहे की, 'मॅचपूर्वी असं प्रेम व्यक्त केले जात आहे.' अनेक युजर्सनीही या फोटोचं कौतुक केलं आहे.
पाहा फोटो : भरमैदानात पांड्यानं शिखर धवनला केलं किस
Hardik Pandya with Shikhar Dhawan.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 13, 2023
What a lovely picture! pic.twitter.com/eb1jcVBTjb
गुजरात टायटन्सचा पंजाब किंग्सवर विजय
इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League 2023) 16 मोसमातील 18 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) पंजाब किंग्सवर (Punjab Kings) सहा विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात गुजरात (GT) संघाने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबने (PBKS) गुजरात संघासाठी 154 धावांचं लक्ष्य दिलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना शुभमन गिलने (Shubman Gill) शानदार अर्धशतकी खेळी करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. या सामन्यात गुजरात संघाने 19.5 षटकांत लक्ष्य गाठलं आणि यंदाच्या मोसमातील तिसरा सामना जिंकला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :