MI vs SRH, IPL 2022: राहुल त्रिपाठीचं झुंजार अर्धशतक, हैदराबादचं मुंबईसमोर 194 धावांचं आव्हान
MI vs SRH, IPL 2022: मुंबई इंडियन्सविरुद्ध सामन्यात सनरायजर्स हैदराबादकडून राहुल त्रिपाठीनं आक्रमक फलंदाजी केली.
![MI vs SRH, IPL 2022: राहुल त्रिपाठीचं झुंजार अर्धशतक, हैदराबादचं मुंबईसमोर 194 धावांचं आव्हान MI vs SRH, IPL 2022: Mumbai Indians need 194 runs to win against Sunrisers Hyderabad Wankhede Stadium, Mumbai MI vs SRH, IPL 2022: राहुल त्रिपाठीचं झुंजार अर्धशतक, हैदराबादचं मुंबईसमोर 194 धावांचं आव्हान](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/17/1464a50ac19fd83a6f77f93a253a181d_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
MI vs SRH, IPL 2022: मुंबई इंडियन्सविरुद्ध सामन्यात सनरायजर्स हैदराबादकडून (Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad) राहुल त्रिपाठीनं आक्रमक फलंदाजी केली. हैदराबादच्या संघाला गरज असताना त्यानं 44 चेंडूत 76 धावांची खेळी केली. राहुल त्रिपाठीच्या(Rahul Tripathi) झुंजार अर्धशतकाचा जोरावर हैदराबादच्या संघानं मुंबईसमोर 20 षटकात 5 विकेट गमावून 194 धावांचं लक्ष्य ठेवलं.
नाणेफेक गमावून हैदराबादच्या संघाची सुरुवात खराब झाली. हैदराबादच्या डावातील तिसऱ्या षटकात अभिषेक शर्माच्या (10 चेंडू 9 धावा) रुपात संघाला पहिला धक्का बसला. त्यानंतर प्रियम गर्ग आणि राहुल त्रिपाठीनं संघाचा डाव सारवला. दोघांमध्ये 78 धावांची भागेदारी झाली. परंतु, रमनदीप सिंहच्या गोलंदाजीवर दहाव्या षटकातील पाचव्या चेंडूवर प्रियम गर्ग (26 चेंडू 42) बाद झाला. दरम्यान, राहुल त्रिपाठी आणि निकोलस पूरननं चांगली फलंदाजी करत संघाची धावसंख्या पुढे नेली. रिले मेरेडिथनं सतराव्या षटकात निकोलस पूरनला (22 चेंडू 38 धावा) आपल्या जाळ्यात अडकवलं. त्यानंतर राहुल त्रिपाठीही (44 चेंडू 76 धावा) बाद झाला. मुंबईकडून रमनदीप सिंह सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. डेनियल सॅम्स, मेरेडिथ आणि जसप्रीत बुमराहनं प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन:
अभिषेक शर्मा, प्रियम गर्ग, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन (विकेटकिपर), वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी, उमरान मलिक, टी नटराजन.
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन:
इशान किशन (विकेटकिपर), रोहित शर्मा (कर्णधार), डॅनियल सॅम्स, तिळक वर्मा, रमणदीप सिंह, ट्रिस्टन स्टब्स, टिम डेव्हिड, संजय यादव, जसप्रीत बुमराह, रिले मेरेडिथ, मयंक मार्कंडे.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)