एक्स्प्लोर

MI vs RR Playing 11 : मुंबईची 'पलटन' विरुद्ध 'रॉयल' राजस्थान; प्लेईंग 11 आणि खेळपट्टीबाबत जाणून घ्या

IPL 2023 Match 42, MI vs RR : आज मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि राजस्थान रॉयल्स (Rajsthan Royals) यांच्यात सामना रंगणार आहे.

MI vs RR Playing 11, IPL 2023 : आज मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर (Wankhede Stadium) आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये मुंबई इंडियन्स (MI) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे. मुंबई इंडियन्स शेवटच्या सामन्यात गुजरात टायटन्सकडून झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स (Rajsthan Royals) विरोधात उतरणार आहे. महत्त्वाचं म्हणजे यंदाच्या आयपीएलमध्ये राजस्थान संघाची कामगिरी खूप चांगली असल्याचं दिसून येत आहे. तर मुंबई इंडियन्स संघांला अद्याप चांगला फॉर्म दाखवता आलेला नाही. मुंबई संघाला आयपीएल 2023 मध्ये पहिल्या विजय मिळवण्यासही फार वेळ लागला होता. तर राजस्थान रॉयल्स टॉप 4 मध्ये स्थान कायम ठेवून आहे.

MI vs RR, IPL 2023 Match 42 : मुंबईची 'पलटन' विरुद्ध 'रॉयल' राजस्थान

आयपीएल पॉईंट्स टेबलमध्ये राजस्थान दुसऱ्या स्थानावर आहे तर, मुंबई नवव्या स्थानावर आहे. राजस्थानचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि ध्रुव जुरेल जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. तर संदीप शर्मा आणि रविचंद्रन अश्विनची चांगली गोलंदाजी पाहायला मिळत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई संघाच्या सुधारणेला भरपूर वाव आहे. आजच्या सामन्यात जोफ्रा आर्चरचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवची बॅट चालणार का हेही पाहावं लागणार आहे.

Wankhede Stadium Pitch Report : वानखेडे स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?

आज मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर मुंबई विरुद्ध राजस्थान सामना पाहायला मिळणार आहे. वानखेडे स्टेडिअमवर झालेल्या आठ टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये नऊ वेळा 180 हून अधिक धावसंख्या पाहायला मिळाली आहे. यामध्ये चार वेळा 200 धावांचा टप्पा ओलांडला आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय मधील सर्वोच्च धावसंख्या 240/3 आहे. आयपीएलमध्येही हीच धावसंख्या दिसून आली आहे. वानखेडेच्या सपाट मैदानावर गोलंदाजांना विकेट घेण्यात विशेष मदत मिळत नाही. येथे बाऊंड्री लाईन जवळ असल्याने फलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळतं.

MI vs RR Probable Playing 11 : दोन्ही संघांची प्लेईंग 11

MI Probable Playing 11 : मुंबई इंडियन्स 

रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टिम डेव्हिड, नेहाल वढेरा, जोफ्रा आर्चर, कुमार कार्तिकेय, अर्जुन तेंडुलकर, रिले मेरेडिथ, पियुष चावला.

RR Probable Playing 11 : राजस्थान रॉयल्स

यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकीपर), शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

MI vs RR Match Preview : मुंबई आणि राजस्थान आमने-सामने, कोणता संघ विजयी मार्गावर परतणार? हेड टू हेड आकडेवारीमध्ये कुणाचं पारड

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rajesaheb Deshmukh Parali Beed:मी आमदार झाल्यास तरुणांची लग्न लावून देणार, उमेदवाराचं आश्वासन
Rajesaheb Deshmukh Parali Beed:मी आमदार झाल्यास तरुणांची लग्न लावून देणार, उमेदवाराचं आश्वासन
Article 370 : जम्मू काश्मीर विधानसभेत राडा, कलम 370 चा प्रस्ताव पास; भाजप आमदारांनी प्रत फाडल्या
जम्मू काश्मीर विधानसभेत राडा, कलम 370 चा प्रस्ताव पास; भाजप आमदारांनी प्रत फाडल्या
Manaoj Jarange: मनोज जरांगेंच्या भूमिकेचा आम्हालाच फायदा होईल; अजित पवारांनी पटवून दिलं, ते कसं
Manaoj Jarange: मनोज जरांगेंच्या भूमिकेचा आम्हालाच फायदा होईल; अजित पवारांनी पटवून दिलं, ते कसं
Chitra Wagh: सासऱ्याने फर्मान सोडलं, नवऱ्याने हात खेचला, छत्रपतींच्या सूनेचा पाणउतारा, बंटीची कुणी घंटी वाजवली, चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
सासऱ्याने फर्मान सोडलं, नवऱ्याने हात खेचला, छत्रपतींच्या सूनेचा पाणउतारा, बंटीची कुणी घंटी वाजवली, चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chitra Wagh Solapur : कुणी घंटी वाजवली ते शोधा; Satej Patil यांच्यावर हल्लाबोलRaj Thackeray Latur : इतकी वर्ष त्याच लोकांना निवडून देण्याऐवजी वेगळा प्रयोग करून बघाAjit Pawar On Ramraje Nimbalkar : रामराजे प्रचारात दिसत का नाहीत? नोटीस पाठवतो, अजित पवार संतापलेMurud Ferry boat : फेरीबोटीवर जाताना पिकअप व्हॅन थेट समुद्रात कोसळली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajesaheb Deshmukh Parali Beed:मी आमदार झाल्यास तरुणांची लग्न लावून देणार, उमेदवाराचं आश्वासन
Rajesaheb Deshmukh Parali Beed:मी आमदार झाल्यास तरुणांची लग्न लावून देणार, उमेदवाराचं आश्वासन
Article 370 : जम्मू काश्मीर विधानसभेत राडा, कलम 370 चा प्रस्ताव पास; भाजप आमदारांनी प्रत फाडल्या
जम्मू काश्मीर विधानसभेत राडा, कलम 370 चा प्रस्ताव पास; भाजप आमदारांनी प्रत फाडल्या
Manaoj Jarange: मनोज जरांगेंच्या भूमिकेचा आम्हालाच फायदा होईल; अजित पवारांनी पटवून दिलं, ते कसं
Manaoj Jarange: मनोज जरांगेंच्या भूमिकेचा आम्हालाच फायदा होईल; अजित पवारांनी पटवून दिलं, ते कसं
Chitra Wagh: सासऱ्याने फर्मान सोडलं, नवऱ्याने हात खेचला, छत्रपतींच्या सूनेचा पाणउतारा, बंटीची कुणी घंटी वाजवली, चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
सासऱ्याने फर्मान सोडलं, नवऱ्याने हात खेचला, छत्रपतींच्या सूनेचा पाणउतारा, बंटीची कुणी घंटी वाजवली, चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाविकास आघाडीचे दोन खासदार एकमेकांविरोधात प्रचारात उतरले; बिघाडी कोणाला फायदेशी ठरणार?
महाविकास आघाडीचे दोन खासदार एकमेकांविरोधात प्रचारात उतरले; बिघाडी कोणाला फायदेशी ठरणार?
Raj Thackeray on Maratha Reservation : मुंबईत जा दिलं आरक्षण म्हणता, तुमच्या हातात आहे का ते? राज ठाकरेंनी मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री शिंदेंना फटकारले!
मुंबईत जा दिलं आरक्षण म्हणता, तुमच्या हातात आहे का ते? राज ठाकरेंनी मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री शिंदेंना फटकारले!
LMV Driving License : LMV ड्रायव्हिंग लायसन्स धारक 7500KG वजनाची वाहने चालवू शकतील; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
LMV ड्रायव्हिंग लायसन्स धारक 7500KG वजनाची वाहने चालवू शकतील; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
नितेश अन् हिंदूंविरुद्ध गरळ ओकणाऱ्यांचे पाय विधानसभेकडे जाण्यापूर्वीच कलम केले जातील; वडील नारायण राणेंचा इशारा
नितेश अन् हिंदूंविरुद्ध गरळ ओकणाऱ्यांचे पाय विधानसभेकडे जाण्यापूर्वीच कलम केले जातील; वडील नारायण राणेंचा इशारा
Embed widget