एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

IPL 2022, MI Vs RR: जॉस बटलरनं मुंबईच्या गोलंदाजाला धुतलं, राजस्थानचं ब्लू आर्मीसमोर 194 धावांचं लक्ष्य 

MI vs RR, 1 Innings Highlight: फलंदाजी करण्यासाठी आलेल्या राजस्थानच्या संघानं सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी केली.

MI vs RR, 1 Innings Highlight: नवी मुंबईच्या (Navi Mumbai) डीवाय पाटील स्टेडियमवर (DY Patil Stadium) खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील नवव्या सामन्यात राजस्थानच्या संघानं मुंबईसमोर 194 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून मुंबईच्या संघानं राजस्थानच्या संघाला प्रथम फलंदाजी करण्यास आमंत्रित केलं. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या राजस्थानच्या संघानं सुरुवातीपासूनच आक्रमक खेळी केली. सलामीवीर जॉस बटलरच्या झुंजार शतकाच्या जोरावर राजस्थाननं 20 षटकात चार विकेट्स गमावून 193 धावा केल्या आहेत. 

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात राजस्थानच्या संघाची सुरुवात खराब झाली. जॉस बटलरसोबत संघाच्या डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात आलेल्या यशस्वी जयस्वाल स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर जॉस बटलर आणि देवदत्त पडीकलनं (7 धावा) संघाचा डाव सावरला. परंतु, सहाव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पडीकलनं विकेट गमावली. दरम्यान, कर्णधार संजू सॅमसनही आक्रमक खेळी केली. परंतु, त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. पोलार्डच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला. मात्र, एकाबाजूनं जॉस बटलरनं आपली आक्रमक खेळी सुरूच ठेवली. 15 षटकानंतर हेटमायरनंही मुंबईच्या गोलंदाजी शाळा घेतली. 14 चेंडूत त्यानं 35 धावांची तडाखेबाज फलंदाजी केली. 19 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्याला बुमराहनं माघारी धाडलं. त्यानंतर लगेच जसप्रीत बुमराहनं जॉस बटलरच्या आक्रमक खेळीला पूर्णविराम लावलं. त्यानंतर रियान पराग (4 चेंडू 5 धावा), आर. अश्विन 1 धाव, नवदीप सैनी 2 तर, ट्रेन्ट बोल्टनं नाबाद एक धाव केली. ज्यामुळं राजस्थानच्या संघानं मुंबईसमोर 194 धावांचं लक्ष्य ठेवलं. मुंबईकडून जसप्रीत बुमराह आणि टी. मिल्सनं प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतले. तर, पोलार्डनं एक विकेट्स मिळवली. 

संघ-

राजस्थानचा संघ: जोस बटलर, यशस्वी जायसवाल, संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, शिमरोन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट, नवदीप सैनी, प्रसिद्ध कृष्णा.

मुंबईचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), अनमोलप्रीत सिंह, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, टिम डेविड, डेनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टाइमल मिल्स, बसील थम्पी.

हे देखील वाचा- 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Glenn Maxwell on Yashasvi Jaiswal : यशस्वीचा सलग चार शतकांमध्ये दीडशेचा ठोका; नेहमीच खुन्नस देणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा मॅक्सवेल जैस्वालवर काय बोलून गेला?
यशस्वीचा सलग चार शतकांमध्ये दीडशेचा ठोका; नेहमीच खुन्नस देणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा मॅक्सवेल जैस्वालवर काय बोलून गेला?
Apex Ecotech IPO : अ‍ॅपेक्स इकोटेक आयपीओची जोरदार चर्चा, जीएमपीनुसार 48 टक्के परतावा,गुंतवणूकदारांना मोठी संधी
अ‍ॅपेक्स इकोटेक आयपीओची जोरदार चर्चा, जीएमपी पोहोचला 48 टक्क्यांवर गुंतवणूकदारांना मोठी संधी
Jasprit Bumrah : ऑस्ट्रेलियाला घरात घुसून हादरा देणाऱ्या कॅप्टन बुम बुम बुमराहला आता मोठी 'लाॅटरी' लागली!
ऑस्ट्रेलियाला घरात घुसून हादरा देणाऱ्या कॅप्टन बुम बुम बुमराहला आता मोठी 'लाॅटरी' लागली!
Sanjay Raut: 'तर देशात भाजपला 25 जागा मिळतील...', महाराष्ट्र-हरियाणा निवडणुकीचा निकाल आम्हाला मान्य नाही, राऊतांचे EVMवर प्रश्नचिन्ह
'तर देशात भाजपला 25 जागा मिळतील...', महाराष्ट्र-हरियाणा निवडणुकीचा निकाल आम्हाला मान्य नाही, राऊतांचे EVMवर प्रश्नचिन्ह
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 27 November 2024Sunil Tatkare meet Modi- Shah : शाहांच्या भेटीनंतर तटकरेंनी मोदींची भेट घेतलीSanjay Shirsat on Eknath Shinde | न बोलता करेक्ट कार्यक्रम करण्यात एकनाथ शिंदे एक नंबरवर!Eknath Shinde PC 3 PM | दोन दिवसांपासून गप्प असलेले एकनाथ शिंदे आज मौन सोडणार ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Glenn Maxwell on Yashasvi Jaiswal : यशस्वीचा सलग चार शतकांमध्ये दीडशेचा ठोका; नेहमीच खुन्नस देणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा मॅक्सवेल जैस्वालवर काय बोलून गेला?
यशस्वीचा सलग चार शतकांमध्ये दीडशेचा ठोका; नेहमीच खुन्नस देणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा मॅक्सवेल जैस्वालवर काय बोलून गेला?
Apex Ecotech IPO : अ‍ॅपेक्स इकोटेक आयपीओची जोरदार चर्चा, जीएमपीनुसार 48 टक्के परतावा,गुंतवणूकदारांना मोठी संधी
अ‍ॅपेक्स इकोटेक आयपीओची जोरदार चर्चा, जीएमपी पोहोचला 48 टक्क्यांवर गुंतवणूकदारांना मोठी संधी
Jasprit Bumrah : ऑस्ट्रेलियाला घरात घुसून हादरा देणाऱ्या कॅप्टन बुम बुम बुमराहला आता मोठी 'लाॅटरी' लागली!
ऑस्ट्रेलियाला घरात घुसून हादरा देणाऱ्या कॅप्टन बुम बुम बुमराहला आता मोठी 'लाॅटरी' लागली!
Sanjay Raut: 'तर देशात भाजपला 25 जागा मिळतील...', महाराष्ट्र-हरियाणा निवडणुकीचा निकाल आम्हाला मान्य नाही, राऊतांचे EVMवर प्रश्नचिन्ह
'तर देशात भाजपला 25 जागा मिळतील...', महाराष्ट्र-हरियाणा निवडणुकीचा निकाल आम्हाला मान्य नाही, राऊतांचे EVMवर प्रश्नचिन्ह
मोठी बातमी! इकडे एकनाथ शिंदेंची प्रेस, तिकडे मोदींकडून देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पसंती; शपथविधीची तारीखही जवळपास निश्चित
मोठी बातमी! इकडे एकनाथ शिंदेंची प्रेस, तिकडे मोदींकडून देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पसंती; शपथविधीची तारीखही जवळपास निश्चित
PAN 2.0 : क्यू आर कोडसह पॅन 2.0 जारी झाल्यानंतर पॅन क्रमांक बदलेलं का? जुनं पॅन कार्ड वैध राहणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती 
क्यू आर कोडसह पॅन 2.0 जारी झाल्यानंतर पॅन क्रमांक बदलेलं का? नव्या प्रकल्पाबाबतच्या प्रश्नांची उत्तरं
मला कुठलंही मंत्रिपद नको; जरांगेंना टोला, हाकेंनी सांगितला विजयी झालेल्या ओबीसी आमदारांचा आकडा
मला कुठलंही मंत्रिपद नको; जरांगेंना टोला, हाकेंनी सांगितला विजयी झालेल्या ओबीसी आमदारांचा आकडा
मोठी बातमी! महाआघाडीत बिघाडीची शक्यता; शिवसेना ठाकरेंच्या बैठकीत महापालिकेला स्वबळाची भाषा
मोठी बातमी! महाआघाडीत बिघाडीची शक्यता; शिवसेना ठाकरेंच्या बैठकीत महापालिकेला स्वबळाची भाषा
Embed widget