MI vs RCB Playing 11 : वानखेडे स्टेडिअमवर मुंबई विरुद्ध बंगळुरु जंगी सामना, कोहली विरोधात रोहितची 'पलटन' मैदानात, पाहा प्लेईंग 11 कशी असेल?
IPL 2023 Match 54 MI vs RCB : आज मुंबईच्या वानखेडे स्डेडिअमवर मुंबई (Mumbai Indians) विरुद्ध बंगळरु (Royal Challengers Bangalore) सामना रंगणार आहे.
Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore : आज आयपीएलमध्ये (IPL 2023) विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) आमने-सामने येणार आहेत. मुंबई आणि बंगळुरु (MI vs RCB) या संघांमध्ये लढत होणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर संध्याकाळी 7.30 वाजता हा जंगी सामना रंगणार आहे. अत्यंत चुरशीच्या अशा या लढतीकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी दोन्ही संघांसाठी आजचा सामना जिंकणं फार महत्त्वाचं आहे. यामध्ये कोणत्या संघाला यश मिळणार हे पाहावं लागेल.
MI vs RCB, IPL 2023 : मुंबई विरुद्ध बंगळुरु जंगी सामना
मुंबई आणि बंगळुरु दोन्ही संघांना त्यांच्या मागील सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुंबई इंडियन्सचा चेन्नई सुपर किंग्स संघाने पराभव केला. तर, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला शेवटच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मात दिली. पॉईंट्स टेबलमध्ये आरसीबी संघ 10 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. दुसरीकडे मुंबई संघ 10 गुणांसह आठव्या स्थानावर आहे.
मुंबई की बंगळुरु, टॉप 4 मध्ये कोण जाणार?
आजच्या सामन्यात विजय मिळवणाऱ्या संघाला टॉप 4 मध्ये प्रवेश करण्याची संधी आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) दोन्ही संघानी आतापर्यंत 10 पैकी पाच सामने जिंकले तर पाच सामने गमावले आहेत.
Wankhede Stadium Pitch Report : वानखेडे स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?
आज मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर मुंबई विरुद्ध बंगळुरु सामना पाहायला मिळणार आहे. वानखेडे स्टेडिअमवर झालेल्या आठ टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये नऊ वेळा 180 हून अधिक धावसंख्या पाहायला मिळाली आहे. यामध्ये चार वेळा 200 धावांचा टप्पा ओलांडला आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय मधील सर्वोच्च धावसंख्या 240/3 आहे. आयपीएलमध्येही हीच धावसंख्या दिसून आली आहे. वानखेडेच्या सपाट मैदानावर गोलंदाजांना विकेट घेण्यात विशेष मदत मिळत नाही. येथे बाऊंड्री लाईन जवळ असल्याने फलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळतं.
MI vs RR Probable Playing 11 : दोन्ही संघांची प्लेईंग 11
MI Probable Playing 11 : मुंबई इंडियन्स
रोहित शर्मा (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, कॅमेरॉन ग्रीन, पीयूष चावला, अर्शद खान, नेहाल वढेरा, इशान किशन (विकेटकीपर), जोफ्रा आर्चर, आकाश मांडवाल.
RCB Probable Playing 11 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
विराट कोहली, एफ डू प्लेसिस (कर्णधार), केदार जाधव, महिपाल लोमरोर, ग्ले मॅक्सवेल, वानिंदू हसरंगा, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अनुज रावत, मोहम्मद सिराज, कर्ण शर्मा, जोश हेजलवुड.