एक्स्प्लोर

MI vs LSG Result : मुंबईला विजय मिळता मिळेना, लखनौकडून 18 धावांनी मात, स्पर्धेतील सलग सहावा पराभव

IPL : आतापर्यंतच्या आयपीएल 2022 मध्ये एकही सामना न जिंकलेल्या मुंबईला आज देखील पराभव पत्करावा लागला आहे. स्पर्धेतील हा मुंबईचा सलग सहावा पराभव आहे.

MI vs LSG : आयपीएलमधील 2022 (IPL 2022) 26 व्या सामन्यात लखनौने मुंबईला 18 धावांनी पराभूत करत स्पर्धेतील चौथा विजय मिळवला आहे. तर बलाढ्य मुंबई संघाला सलग सहावा पराभव पत्करावा लागला आहे. मुंबईच्या ब्रेबॉर्न मैदानात झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स (MI vs LSG) या सामन्यात लखनौचा कर्णधार केएल राहुलच्या दमदार शतकामुळे मुंबईसमोर त्यांनी 200 धावांचे आव्हान ठेवले. हे पूर्ण करताना मुंबईचे सर्वच फलंदाज स्वस्तात माघारी परतत होते. सूर्यकुमार आणि तिलक वर्मा यांनी काहीसा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनाही खास कमाल दाखवता आली नाही. अखेरच्या काही षटकात पोलार्ड क्रिजवर होता पण तोही मुंबईला विजय मिळवून देऊ शकला नाही.  

सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे लखनौचे सलामीवीर मैदानात आले. डि कॉक आणि राहुलने धडाकेबाद सुरुवात केली खरी पण डि कॉक 24 धावा करुन तंबूत परतला. मग मनिष आणि राहुलने एख दमदार अशी भागिदारी रचली पण पांडे 38 धावा करुन तंबूत परतल्यानंतरही राहुलने फटकेबाजी कायम ठेवली. स्टॉयनिसने 10 तर दीपकने 15 धावांची साथ राहुलला दिली. ज्यामुळे लखनौने 199 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. राहुलने 60 चेंडूत 9 चौकार आणि 5 षटकार ठोकत नाबाद 103 धावा केल्या.  मागील हंगामापर्यंत सर्वात दमदार असं बोलिंग युनिट म्हणून ओळखल्या जाणाऱ्य मुंबईकडे यंदा बुमराह सोडता सर्व नवे गोलंदाज आहेत. त्यामुळे मुंबईला गोलंदाजीत कमाल करता येत नाही असल्याचं दिसून येत आहे. त्यात आज मुंबईने खराब गोलंदाजीसह खराब क्षेत्ररक्षणही केलं. अनेकदा खराब क्षेत्ररक्षणामुळे चौकार गमावल्याचं दिसून आलं. मुंबईने मोठ्या विश्वासाने संघात घेतलेल्या इंग्लंडच्या टायमल मिल्सच्या गोलंदाजीवर आज तुफान फटकेबाजी झाली. त्याला तीन षटकात 54 धावा आल्या. दुसरीकडे फेबियन एलनच्या चार षटकात देखील 46 धावा आल्या. केवळ बुमरहाने 24 चेंडूत 24 धावा देत दिल्या. विकेट्सचा विचार करता उनडकटने दोन, मुरगन आणि फेबियन एलनने प्रत्येकी एक विकेट घेतली.

मुंबईच्या फलंदाजांचा फ्लॉप शो

200 धावांचे आव्हान पार करताना मुंबईचे सलामीवीर आजही फेल झाले. रोहित सहा तर ईशान 13 धावाच करु शकला. ब्रेव्हिसने 13 चेंडूत 31 धावा ठोकत तुफान फटकेबाजी केली. पण आज एका मोठ्या खेळीची मुंबईला गरज होती. त्यानंतर तिलक आणि सूर्यकुमारने संघाचा डाव बऱ्यापैकी सावरला. पण तिलक 26 आणि त्यानंतर सूर्यकुमार 37 धावा करुन तंबूत परतला. अखेरच्या काही षटकात पोलार्डने विजय मिळवून देण्यासाठी संपूर्ण प्रयत्न केले. पण त्याची 25 धावांची खेळी मुंबईला विजय मिळवून देऊ शकली नाही. उनाडकटनेही 14 धावांची खेळी केली, जी मुंबईला विजयाजवळ घेऊन गेली खरी पण अखेर 18 धावा कमी पडल्याने मुंबई पराभूत झाली. 

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
Embed widget