(Source: ECI/ABP News/ABP Majha)
MI Vs KKR: रोहित शर्मा आऊट होता की नॉट आऊट? पाहा व्हिडिओ
IPL 2022: मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात (MI Vs KKR) काल आयपीएल 2022 चा 56 वा सामना खेळण्यात आला.
IPL 2022: मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात (MI Vs KKR) काल आयपीएल 2022 चा 56 वा सामना खेळण्यात आला. कोलकात्यानं दिलेल्या 166 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सनं डावाच्या पहिल्याच षटकात कर्णधार रोहित शर्माची (RohiT विकेट गमावली. परंतु, रोहित शर्माला आऊट देण्याच्या तिसऱ्या पंचाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. या सामन्यात ज्या पद्धतीनं रोहित शर्माला आऊट घोषित करण्यात आलं, त्याच्याशी मुंबईचे खेळाडू आणि चाहते सहमत नसल्याचं दिसलं. महत्वाचं म्हणजे, मैदानातील पंचांनी रोहितला नॉट आऊट दिलं होतं. मात्र, केकेआरच्या रिव्ह्यूवर तिसऱ्या पंचांनी रोहितला आऊट घोषित केलं. रिव्ह्यूमध्येही रोहित शर्मा आऊट नसल्याचं स्पष्ट दिसत आहे, असं मुंबईचे चाहते म्हणत आहेत.
मुंबईच्या डावात कोलकाताकडून श्रेयस अय्यर पहिलं षटक टाकण्यासाठी आला होता. या षटकातील अखेरचा चेंडू रोहित शर्माच्या बॅट बाजून जाऊन थायपॅडला लागला आणि त्यानंतर विकेटकिपर शेल्डन जॅक्शननं झेल पकडला. त्यावेळी कोलकाताच्या खेळाडूंनी अपील केली. परंतु, मैदानातील पंचांनी रोहितला नाबाद ठरवलं. मात्र, त्यानंतर कोलकात्यानं रिव्ह्यू घेतला. या रिव्ह्यूमध्ये चेंडू रोहितच्या बॅटला स्पर्श करून गेल्याचं अल्ट्रा एजमध्ये दिसत होतं. ज्यामुळं तिसऱ्या पंचानी त्याला आऊट घोषित केलं. महत्वाचं म्हणजे, चेंडू रोहितच्या बॅटच्या जवळून जाण्यापूर्वीच अल्ट्रा एजमध्ये स्पाईक्स झाल्याचं पाहायला मिळालं. कदाचित तांत्रिक अडचणींमुळं असं दिसत असेल. परंतु, तिसऱ्या पंचांनी रोहित आऊट असल्याचा इशारा दिला.
पंचाच्या निर्णयावर चाहते नाराज
पंचांनी दिलेल्या निर्यावर रोहित शर्मानं नाराजी व्यक्त केली. तिसऱ्या पंचांच्या या निर्णयानंतर क्रिकेट चाहत्यांनी संताप व्यक्त केला. कोणी म्हणाला की, रोहित शर्मा नाबाद आहे. तर कोणी म्हणतोय की, चेंडू बॅटला अजिबात लागला नाही. एवढेच नव्हेतर, अल्ट्रा एजमध्ये चेंडू बॅटजवळ येण्यापूर्वीच स्पाइक्स दिसला, पंचांनी चुकीचा निर्णय दिला आहे, असंही मुंबईच्या एका चाहत्यानं म्हटलं आहे.
पाहा व्हिडिओ
या हंगामातील मुंबईचा 9वा पराभव
या सामन्यात 166 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सनं झटपट विकेट्स गमावल्या. अखेर मुंबईचा संघ 113 धावांवर बाद झाला. मुंबईचा या हंगामातील 9वा पराभव होता.
हे देखील वाचा-