आनंद गगनात मावेना! पहिल्या विजयानंतर पांड्याचं मोठं वक्तव्य, सामन्यानंतर हार्दिकनं कुणाचं नाव घेतलं ?
Hardik Pandya : पहिल्या विजयानंतर हार्दिक पांड्याने एकाच खेळाडूचे नाव घेतले. हा खेळाडू आहे तरी कोण, हे हार्दिकने सामना संपल्यावर सर्वांना सांगितले. पाहूयात हार्दिक पांड्या नेमकं काय म्हणाला....
IPL Hardik Pandya : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात अखेर मुंबई इंडियन्सने पहिल्या विजयाची नोंद केली. मुंबईने दिल्लीचा 29 धावांनी पराभव केला. या सामन्यात मुंबईच्या जवळपास सर्वच खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. पण हार्दिक पांड्याने यावेळी एकाच खेळाडूचे नाव घेतले आहे. हा खेळाडू आहे तरी कोण, हे हार्दिकने सामना संपल्यावर सर्वांना सांगितले. पाहूयात हार्दिक पांड्या नेमकं काय म्हणाला....
सामन्यानंतर बोलताना हार्दिक पांड्या म्हणाला की, "प्रत्येकजण चांगली फलंदाजी करत होता. फक्त आम्हाला विजयाची लय हवी होती, त्या संधीची प्रत्येकजण वाट पाहत होता. आजच्या सामन्यात प्रत्येकानं चांगली फलंदाजी केली. पण रोमारिओ शेफर्डचं नाव मी आवर्जुन घेईन. कारण त्याच्यामुळे आम्हाला हा विजय मिळवता आला, असे मला वाटते. दोन्ही संघाची फलंदाजी पाहिली तर शेफर्ड यानं अखेरच्या षटकात केलेली फलंदाजी, हाच फरक जाणवेल. शेफर्डची धडाकेबाज खेळीमुळेच विजय मिळवू शकलो. शेफर्डसारख्या खेळाडूंचा अभिमान आहे. या सामन्यात आमची गोलंदाजीही चांगली झाली. त्यामुळे माझ्यावर गोलंदाजी करण्याची वेळच आली नाही. आमच्यासाठी हा एक दमदार विजय आहे."
हार्दिक पांड्याचा आनंद गगनात मावेना -
विजेता कर्णधार होणं, प्रत्येकालाचं आवडतं. ही बाब माझ्यासाठी खासच आहे. विजयासाठी आम्ही सर्वांनी खूप मेहनत घेतली आहे. मानसिकता बदलण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले. संघ बांधणी करण्यासाठी आम्ही काही बदलही केले. संघ व्यवस्थित स्थिर-स्थावर व्हायला हवा, संघात थोडेफार बदल होऊ शकतो, पण हेच 12 खेळाडू घेऊन आम्ही पुढील सामन्यात मैदानात उतरु असं मला वाटतं. पहिल्या तीन सामन्यात पराभव झाला होता, पण मुंबई इंडियन्स कमबॅक करेल असा सर्वांनाच विश्वास होता. आजूबाजूच्या लोकांकडून सपोर्ट आणि प्रेम मिळत होतं. आम्हाला फक्त एका विजयाची गरज आहे, त्यानंतर गाडी रुळावर येईल, याबाबत चाहत्यांना विश्वास होता. आम्हाला पहिला विजय मिळाला असून स्पर्धा आमच्यासाठी आजपासून सुरु झाली. आजच्या सामन्यात मैदानातही चाहत्यांकडूनही चांगला पाठिंबा मिळाला, असे हार्दिक पांड्या म्हणाला.
We move forward, 𝐓𝐎𝐆𝐄𝐓𝐇𝐄𝐑 💪💙#MumbaiMeriJaan #MumbaiIndians #MIvDC #ESADay #EducationAndSportsForAll pic.twitter.com/pb62PB689Z
— Mumbai Indians (@mipaltan) April 7, 2024
चार पराभवानंतर पंत काय म्हणाला ?
पॉवरप्लेमध्ये आम्हाला आणखी धावा काढायला हव्या होत्या. आम्ही वेगानं धावा काढण्याचा प्रयत्न केला. पण 15-16 धावगती गेल्यानंतर दबाव वाढतोच, त्यावेळी धावा काढणं कठीण जातं. एक षटकाचा खेळ सामना फिरवू शकतो, असे म्हणत पंतने शेफर्डचं कौतुक केले. पॉवर प्ले मध्ये फलंदाजी आणि डेथ बॉलिंगमध्ये सुधारण्यासाठी प्रयत्न करु असेही पंतने सांगितलं.