MI vs CSK, IPL 2023 Live : चेन्नईचा विजय, मुंबईचा सलग दुसरा पराभव
IPL 2023 Match 12 MI vs CSK : आयपीएल 2023 मध्ये आज धोनीच्या नेतृत्वात चेन्नई संघ तिसरा सामना तर रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई संघ दुसरा सामना खेळणार आहे.
LIVE
Background
IPL 2023 Match 12 MI vs CSK : चेन्नई (CSK) आणि मुंबई (MI) यांच्यातील सामन्याला लीगचा एल-क्लासिको असंही म्हणतात. या दोन संघाची टक्कर भारत-पाकिस्तान सामन्यासारखी चुरशीची समजली जाते. वानखेडेच्या मैदानावर हे दोन्ही संघ आज आमनेसामने असतील... मुंबई इंडियन्स (MI) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) स्पर्धेच्या इतिहासातील दोन सर्वात यशस्वी संघ मानले जातात. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता हा रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. आयपीएल 2023 मध्ये आज धोनीच्या नेतृत्वात चेन्नई संघ तिसरा सामना तर रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई संघ दुसरा सामना खेळणार आहे.
MI vs CSK Match 12 Preview : चेन्नई विरुद्ध मुंबई
मुंबई इंडियन्स शनिवारी यंदाच्या मोसमातील दुसरा सामना खेळणार आहे. पहिल्या सामन्यात त्यांना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु कडून पराभव झाला होता. तर दुसरीकडे चेन्नई संघाचा हा दुसरा सामना असेल. पहिल्या सामन्यात चेन्नईचा पराभव झाला होता. पण, दुसऱ्या सामन्यात चेन्नईनं खातं उघडलं.
MI vs csk Head to Head : कुणाचं पारड जड?
इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात आतापर्यंत 34 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये मुंबईचं पारडं जड दिसून आलं आहे. 34 सामन्यांपैकी मुंबई संघाने 20 सामने तर चेन्नई संघाने 14 सामने जिंकले आहेत. या दोन्ही संघाची सरासरी धावसंख्या 200 होती. त्यामुळे ही लढत अटीतटीची होणार आहे.
पहिल्या विजयासाठी मुंबई मैदानात उतरणार -
आयपीएलच्या सोळाव्या हंगामातील पहिल्या सामन्यात मुंबईला आठ विकेटने पराभवाचा सामना करावा लागला होता.. या सामन्यात मुंबईची गोलंदाजी फिकी पडली होती. मुंबईच्या एकाही गोलंदाजाला प्रभावी कामगिरी करता आली नव्हती. आरसीबीने दोन विकेटच्या मोबदल्यात 172 धावांचे लक्ष आरामात पार केले होते. आज मुंबई आयपीएलच्या 16 व्या हंगमातील पहिला विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. दोन वर्षानंतर मुंबई आपल्या होम ग्राऊंडवर खेळणार आहे. त्यातच आघाडीचा गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर गेल्याची चर्चा आहे. त्यामुळे मुंबईच्या अडचणी वाढल्या आहेत. आज अर्जुन तेंडुलकर आयपीएल पदार्पण करणार का? याची चर्चा सुरु झाली आहे.
IPL 2023, MI vs CSK live : लाईव्ह सामना कुठे पाहाल?
स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग 'Jio Cinema' ॲपवर उपलब्ध असेल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.
चेन्नईचा विजय, मुंबईचा सलग दुसरा पराभव
चेन्नईचा विजय, मुंबईचा सलग दुसरा पराभव
चेन्नईला तिसरा दक्का, शिवम दुबे बाद
चेन्नईला तिसरा दक्का, शिवम दुबे बाद
अजिंक्य रहाणे बाद, चेन्नईला दुसरा धक्का
अजिंक्य रहाणे बाद, चेन्नईला दुसरा धक्का
अजिक्य रहाणेची फटकेबाजी, 19 चेंडूत अर्धशतक
अजिक्य रहाणेची फटकेबाजी, 19 चेंडूत अर्धशतक
मुंबईची 157 धावांपर्यंत मजल
मुंबईची 157 धावांपर्यंत मजल