MIvsCSK Match Preview : मुंबई-चेन्नई आमनेसामने, चेन्नईचं पारडं जड; पाहा प्लेईंग 11 आणि पिच रिपोर्ट
मुंबईची ताकद ही त्यांची मजबूत फलंदाजी आहे. परंतु या हंगामात टीमची मधली फळी चांगली कामगिरी करू शकली नाही. तर दुसरीकडे चेन्नईची टीम यंदा प्रत्येक विभागात शानदार कामगिरी करत आहे.

MIvsCSK Match Preview : आयपीएल 2021 चा 27 वा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आज सायंकाळी साडेसहा वाजल्यापासून अरुण जेटली, दिल्ली येथील स्टेडियमवर खेळला जाईल. या मोसमात दोन्ही संघ प्रथमच समोरासमोर असतील. जेव्हा जेव्हा आयपीएलमध्ये चेन्नई आणि मुंबईचे संघ आमनेसामने असतात तेव्हा क्रिकेट रसिकांसाठी तो मोठा क्षण असतो.
आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्सने पाच वेळा जेतेपद पटकावले असले तरी या मोसमात चेन्नई संघ मोठ्या फॉर्मात आहे. यंदाच्या मोसमात चेन्नईचं पारडं जड दिसतंय. पॉईंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेल्या चेन्नईने या मोसमात सहा सामन्यांमध्ये पाच सामने जिंकले आहेत. तर मुंबईचा संघ सहा सामन्यांत केवळ तीन सामने जिंकू शकला आहे. दोन्ही संघांनी आपले मागील सामने जिंकले आहेत, अशा स्थितीत दोन्ही संघ जिंकण्याच्या मनसुब्याने मैदानात उतरतील.
मुंबईची ताकद ही त्यांची मजबूत फलंदाजी आहे. परंतु या हंगामात टीमची मधली फळी चांगली कामगिरी करू शकली नाही. तर दुसरीकडे चेन्नईची टीम यंदा प्रत्येक विभागात शानदार कामगिरी करत आहे. मात्र, जर चेन्नईला विजयाची लय कायम ठेवायची असेल तर त्यांना जसप्रीत बुमराह आणि राहुल चहर यांना सांभाळून खेळावे लागेल. त्याचबरोबर मुंबईला रवींद्र जाडेजा आणि फाफ डु प्लेसिस यांच्या आव्हानावर मात करावी लागेल.
मुंबई विरुद्ध चेन्नई आजवरची कामगिरी
चेन्नई आणि मुंबई यांच्यातील आजवरच्या सामन्यांत रोहित शर्माचा मुंबईचा संघ वरचढ ठरला आहे. आयपीएलमध्ये दोन्ही संघ आतापर्यंत 30 वेळा समोरासमोर आले आहेत, त्यापैकी 18 सामने मुंबईने जिंकले आहेत, तर चेन्नईने 12 सामने जिंकले आहेत.
पिच रिपोर्ट
दिल्लीची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल मानली जात असली तरी या मोसमात खेळपट्टी फलंदाजांना उपयुक्त ठरत आहे. शेवटच्या सामन्यातही खेळपट्टी एकदम सपाट होती. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा, हाय स्कोअरिंग सामना दिसू शकतो. दव येथेही महत्त्वपूर्ण ठरणार आहे, अशा वेळी टॉस जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेऊ शकतो.
चेन्नईचा संभाव्य संघ : फाफ डू प्लेसिस, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायुडू, रवींद्र जाडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), सॅम करन, शार्दुल ठाकूर, दीपक चहर आणि लुंगी नागिदी / इम्रान ताहिर.
मुंबई संभाव्य संघ : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, क्रुणाल पांड्या, कायरन पोलार्ड, हार्दिक पांड्या, जयंत यादव, नॅथन कुलपर नाईल, राहुल चहर, जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
