KL Rahul : संघमालकानं ऑन कॅमेरा सुनावलं, तू तात्काळ लखनौची टीम सोड, केएल राहुलकडे कुणी केली मागणी,काय घडलं? पाहा व्हिडीओ
SRH vs LSG: सनरायजर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जाएंटस यांच्यातील मॅच काल राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पार पडली. यामॅचमध्ये हैदराबादनं दणदणीत विजय मिळवला.
हैदराबाद :सनरायजर्स हैदराबादनं (Sun Risers Hyderabad) लखनौ सुपर जाएंटसचा (Lucknow Super Giants) तब्बल 10 विकेटनं दारुण पराभव केला. लखनौनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 165 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग सनरायजर्स हैदराबादनं दहाव्या ओव्हरमध्येच पूर्ण केला. ट्रेविस हेड (Travis Head) आणि अभिषेक शर्माच्या (Abhisehk Sharma) वादळात लखनौ सुपर जाएंटसच्या गोलंदाजीची धूळदाण उडाली. लखनौनं 10 विकेट आणि 62 बॉल राखून विजय मिळवला. लखनौचा हा पराभव अनेकांच्या जिव्हारी लागला आहे. लखनौच्या पराभवानंतरचा कॅप्टन केएल राहुल आणि संघमालक संजीव गोएंका (Sanjiv Goenka) यांच्यातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओवरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. केएल राहुलच्या (KL Rahul) एका चाहत्यानं मोठी मागणी केलीय जी चर्चेचा विषय ठरलीय.
लखनौ सुपर जाएंटसनं टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. लखनौच्या फलंदाजीची सुरुवात खराब झाली होती. लखनौचा सलामीवीर आणि कॅप्टन केएल. राहुल यानं 29 बॉलमध्ये 33 धावा केल्या. यानंत आयुष बदोनीनं 30 बॉलमध्ये 55 आणि निकोलस पूरन यानं 26 बॉलमध्ये 48 धावा करुन लखनौचा डाव सावरला. आयुष बदोनी आणि निकोलस पूरन यांनी 99 धावांची भागिदारी करत लखनौला सन्मानजनक धावसंख्येजवळ पोहोचवलं.
लखनौनं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादनं आक्रमक सुरुवात केली. ट्रेविस हेडनं 30 बॉलमध्ये 89 आणि अभिषेक शर्मानं 28 बॉलमध्ये 75 धावा करत संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. हैदराबादच्या होम ग्राऊंडवर झालेला पराभव लखनौच्या टीमसह चाहत्यांच्या जिव्हारी लागला. सनरायजर्स हैदराबादनं ऐतिहासिक विजय मिळवत थेट गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली.
लखनौचे संघमालक केएल राहुलवर संतापले?
लखनौ सुपर जाएंटसचे संघमालक संजीव गोएंका देखील या पराभवानंतर संतापलेले दिसून आले. संजीव गोएंका यांनी ऑन कॅमेरा केएल राहुलला सुनावलं असल्याचं व्हिडीओवरुन दिसून येतं. संजीव गोएंका नेमकं काय म्हणत होते ते जरी समजलं नसलं तरी व्हिडीओमधून नेमकं काय घडलं असेल याचा अंदाज लावता येतो.
राहुल को तत्काल प्रभाव से लखनऊ टीम छोड़ देनी चाहिए। आत्मसम्मान के ख़ातिर। कोई मलिक एक खिलाड़ी को सार्वजनिक ऐसे अपमान नहीं कर सकता है।
— Narendra Nath Mishra (@iamnarendranath) May 8, 2024
लखनऊ की टीम मैच हारी,कल जीत भी सकती है। लेकिन मलिक ने इज्जत,मर्यादा खोई,जिसे वापस पाने में बहुत दिक़्क़त होगी pic.twitter.com/GkBCSb9tZM
आत्मसन्मानासाठी लखनौची साथ सोड, राहुलकडे कुणी केली मागणी?
केएल राहुल आणि संजीव गोएंका यांच्यातील संभाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एका वापरकर्त्यानं राहुलनं तात्काळ आत्मसन्मानासाठी लखनौचा संघ सोडून द्यावा. एखादा संघमालक एखाद्या खेळाडूचा सार्वजनिक रित्या अपमान करु शकत नाही. लखनौनं मॅच गमावली, उद्या ते जिंकू देखील शकतात. मात्र, मालकांनी मान मर्यादा गमावली ती परत मिळवण्यात अडचणी येतील, असं नेटकऱ्यांनी म्हटलं.
संबंधित बातम्या :
IPL 2024 : हैदराबादच्या वादळी विजयानंतर मुंबई प्लेऑफमधून बाहेर, पाच संघाची स्थितीही नाजूक
टी20 विश्वचषकातील एकाच संघातील दोन फिनिशरला घाबरला इरफान, म्हणाला...