LSG vs CSK IPL 2025 : धोनीच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर चेन्नईचा विजय, लखनौचा त्यांच्याच घरच्या मैदानावर 5 गडी राखून पराभव
LSG vs CSK Updates IPL 2025 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 च्या 30 व्या सामना 14 एप्रिल रोजी लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जात आहे.

Background
Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Live Updates IPL 2025 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 च्या 30 व्या सामना 14 एप्रिल रोजी लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जात आहे. हा सामना लखनौच्या एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. या हंगामात चेन्नई संघाने सलग 5 सामने गमावले आहेत आणि आयपीएलच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले आहे.
दुसरीकडे, लखनौ सुपर जायंट्स उत्तम फॉर्ममध्ये आहे. संघाने गेल्या पाचपैकी चार सामने जिंकले आहेत आणि सध्या पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. आता त्यांचा विजयी सिलसिला सुरू ठेवून गुणतालिकेत आणखी वर जाण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
धोनीच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर चेन्नईचा विजय, लखनौचा त्यांच्याच घरच्या मैदानावर 5 गडी राखून पराभव
रोमांचक सामन्यात चेन्नईने लखनौचा 5 विकेट्सने पराभव केला.
सीएसके अडचणीत, 6 चेंडूत पडल्या 2 विकेट, सात धावा करून रवींद्र जडेजा OUT
चेन्नई सुपर किंग्ज अडचणीत सापडल्याचे दिसत आहे. त्याला चौथा धक्का बसला आहे. रवींद्र जडेजा 11 चेंडूत 7 धावा करून बाद झाला. रवी बिश्नोईने त्याची विकेट घेतली. चेन्नईचा स्कोअर 12.2 षटकांत चार बाद 96 धावा आहे.




















