एक्स्प्लोर

IPL 2024 : हैदराबादच्या वादळी विजयानंतर मुंबई प्लेऑफमधून बाहेर, पाच संघाची स्थितीही नाजूक 

SRH vs LSG : सनरायजर्स हैदराबादने बुधवारी लखनौ सुपर जायंट्सविरोधात विराट विजय मिळवला. ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्माच्या वादळी फलंदाजीच्या बळावर हैदराबादने दहा विकेट आणि दहा षटके राखून विजय मिळवला.

SRH vs LSG : सनरायजर्स हैदराबादने बुधवारी लखनौ सुपर जायंट्सविरोधात विराट विजय मिळवला. ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्माच्या वादळी फलंदाजीच्या बळावर हैदराबादने दहा विकेट आणि दहा षटके राखून विजय मिळवला. हैदराबादने यंदाच्या हंगामातील सातव्या विजायची नोंद केली. हैदराबादने 12 सामन्यात 14 गुणांची कमाई करत प्लेऑफच्या दिशेने पाऊल टाकलेय. हैदराबादच्या विशाल विजयानंतर मुंबई इंडियन्सच्या उरल्या सुरल्या प्लेऑफच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. त्याशिवाय पाच संघाची स्थितीही नाजूक झाली आहे. 

मुंबईचा संघ प्लेऑफमधून बाहेर  

लखनौच्या दारुण पराभवानंतर मुंबई इंडियन्सच्या प्लेऑफच्या उरल्यासुरल्या आशाही संपुष्टात आल्या आहेत. प्लेऑफमधून बाहेर जाणारा मुंबई यंदाचा पहिला संघ ठरलाय. आयपीएल 2024 मध्ये मुंबईने आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत. या सामन्यात मुंबईला फक्त 4 सामन्यात विजय मिळवता आलाय. मुंबई इंडियन्सने पुढील दोन्ही सामन्यात विजय मिळवला तरी त्यांचे 12 गुण होतील. पण चेन्नई, लखनौ आणि दिल्ली यांचे आधीच प्रत्येकी 12 गुण आहेत. या सर्वांचे अद्याप सामने शिल्लक आहेत. त्यामध्ये त्यांनी एकजरी विजय मिळवला तर ते मुंबईपेक्षा पुढे जातील. मुंबईला आता 14 गुणापर्यंत पोहचता येणार नाही, त्यामुळे आता त्यांचे आव्हान संपुष्टात आले आहे. 

हैदराबादची मोठी झेप - 

लखनौचा दारुण पराभव करत हैदराबादने गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. 14 गुणांसह हैदराबादचा संघ तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स प्रत्येकी 16 गुणांसह पहिल्या दोन क्रमांकावर आहेत. हैदराबादच्या विजायाचा फटका चेन्नईला बसला आहे. चेन्नईची चौथ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. हैदराबादने विराट विजयानंतर रनरेटही सुधारला आहे. चेन्नईचा संघ 12 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. 

3 संघाची स्थिती बिकट - 

हैदराबादच्या विराट विजयानंतर आरसीबी, पंजाब अन् गुजरात यांची स्थिती आता आणखी खराब झाली आहे. त्याशिवाय दिल्ली आणि लखनौ यांचेही आव्हान अधिक खडतर झालेय.  आतापर्यंत फक्त मुंबईचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेय. पण इतर 5 संघांना अद्याप प्लेऑफच्या आशा आहेत. पाचव्या क्रमांकावर असणाऱ्या दिल्लीकडे 12 गुण आहेत, त्यांचे अद्याप दोन सामने शिल्लक आहेत. त्यांनी दोनी सामन्यात बाजी मारली तर त्यांना संधी मिळू शकते. लखनौ सहाव्या क्रमांकावर आहे, त्यांचेही 12 गुण आहेत. त्यांचेही दोन सामने शिल्लक आहेत. पण त्यांचा एक सामना दिल्लीविरोधात आहे. दिल्ली आणि लखनौ यांच्यातील विजेता संघ प्लेऑफसाठी अधिक भक्कम पाऊल टाकेल. 

त्याशिवाय RCB, PBKS आणि GT यांचे आतापर्यंत 11-11 सामने झाले आहेत. त्यांचे प्रत्येकी 8 गुण आहेत. या तिन्ही संघाकडे प्लेऑफची संधी आहे. पण सर्व सामन्यात बाजी मारावीच लागेल, त्याशिवाय इतरांच्या कामगिरीवर अवलंबून आहे.  आरसीबी आणि पंजाब यांच्यात गुरुवारी सामना होणार आहे, यातील विजेत्या संघाची प्लेऑफची संधी जास्त असेल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

National Award : वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
मर्दानी... कंडक्टरने कॉलेजच्या विद्यार्थीनीची छेड काढली; मैत्रिणींनी दुर्गा बनून चपलेनं धुतला
मर्दानी... कंडक्टरने कॉलेजच्या विद्यार्थीनीची छेड काढली; मैत्रिणींनी दुर्गा बनून चपलेनं धुतला
आचारसंहितेपूर्वीच टेंडर, सोशल मीडियावर जाहिरातीसाठी 90 कोटी खर्च; विरोधकांचा जोरदार हल्लाबोल
आचारसंहितेपूर्वीच टेंडर, सोशल मीडियावर जाहिरातीसाठी 90 कोटी खर्च; विरोधकांचा जोरदार हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : दुपारी 07 च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP MajhaYek Number Movie Interview : राज ठाकरेंवरचा बायोपिक; येक नंबर सिनेमाच्या टीमशी गप्पाGhatkopar Fire : प्लॅस्टिकचे रॅपर बनवणाऱ्या कंपनीला आग, अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळीMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
National Award : वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
मर्दानी... कंडक्टरने कॉलेजच्या विद्यार्थीनीची छेड काढली; मैत्रिणींनी दुर्गा बनून चपलेनं धुतला
मर्दानी... कंडक्टरने कॉलेजच्या विद्यार्थीनीची छेड काढली; मैत्रिणींनी दुर्गा बनून चपलेनं धुतला
आचारसंहितेपूर्वीच टेंडर, सोशल मीडियावर जाहिरातीसाठी 90 कोटी खर्च; विरोधकांचा जोरदार हल्लाबोल
आचारसंहितेपूर्वीच टेंडर, सोशल मीडियावर जाहिरातीसाठी 90 कोटी खर्च; विरोधकांचा जोरदार हल्लाबोल
Supriya Sule: तुतारी चिन्हावर लढण्यासाठी आत्तापर्यंत 1680 अर्ज; बारामतीबाबत सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या 'आमची खास रणनीती...'
तुतारी चिन्हावर लढण्यासाठी आत्तापर्यंत 1680 अर्ज; बारामतीबाबत सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या 'आमची खास रणनीती...'
केवळ शहर नाही, अवघा जिल्हा अहिल्यानगर; महाराष्ट्र शासन राजपत्रात उल्लेख, अधिसूचना जारी
केवळ शहर नाही, अवघा जिल्हा अहिल्यानगर; महाराष्ट्र शासन राजपत्रात उल्लेख, अधिसूचना जारी
दिवाळी आधीच लाडक्या बहिणींची दिवाळी; ऑक्टोबर-नोव्हेंबरचे 3000 जमा; मुख्यमंत्र्यांनीच सांगितला आकडा
दिवाळी आधीच लाडक्या बहिणींची दिवाळी; ऑक्टोबर-नोव्हेंबरचे 3000 जमा; मुख्यमंत्र्यांनीच सांगितला आकडा
Rahul Gandhi : राऊत म्हणाले, जिंकलेल्या डावाचे पराभवात रुपांतर, तृणमूल म्हणते, अहंकार नडला; राहुल गांधी मोजक्याच शब्दात काय म्हणाले?
राऊत म्हणाले, जिंकलेल्या डावाचे पराभवात रुपांतर, तृणमूल म्हणते, अहंकार नडला; राहुल गांधी मोजक्याच शब्दात काय म्हणाले?
Embed widget